Skip to content

The Scriptures बद्दल बायबलमधील वचने

159 वचने · 108 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. नवीन जन्मलेल्या बालकांसारखे शुद्ध, आध्यात्मिक दुधाची इच्छा धरा म्हणजे तुम्ही तुमच्या तारणाच्या अनुभवामध्ये वाढत जाल.

  2. आणि, “लोकांना ठेच लागण्याचा एक दगड व अडखळण्याचा एक खडक ठेवतो.” ते अडखळतात, कारण ते परमेश्वराच्या वचनाप्रमाणे चालत नाहीत, ज्या शिक्षेसाठी ते पूर्वीच नेमलेले सुद्धा होते.

  3. जर कोणी संदेश देतो तर त्याने असा संदेश द्यावा की, तो परमेश्वराचेच शब्द बोलत आहे. जर कोणी सेवा करतात, तर परमेश्वर जशी शक्ती पुरवितात त्याप्रमाणे करावी, म्हणजे सर्व गोष्टीमध्ये येशू ख्रिस्ताद्वारे परमेश्वराचे गौरव होईल. त्यांना गौरव आणि सामर्थ्य सदासर्वकाळ असो. आमेन!

  4. आमच्याकडे संदेष्ट्यांचा निश्चित संदेश आहे, तो अंधारात प्रकाशणार्‍या दिव्याप्रमाणे आहे. तुमच्या अंतःकरणात दिवस उजाडेपर्यंत व पहाटेचा तारा उगवेपर्यंत तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्याल तर बरे होईल.

  5. सर्वात महत्त्वाचे, प्रथम हे ध्यानात ठेवा की, धर्मशास्त्रातील कोणत्याही संदेशाचा उलगडा संदेष्ट्यांच्या स्वतःच्या कल्पनेने करता येत नाही.

  6. कारण भविष्यकथन मनुष्यांच्या इच्छेने कधी झालेले नाही, तर संदेष्ट्यांनी, जरी ते मनुष्य होते तरी पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन परमेश्वराकडून आलेला संदेश सांगितला आहे.

  7. या विषयाचे वर्णन करून तो त्याच्या सर्व पत्रात त्याच प्रकारे लिहितो. त्याच्या पत्रातील काही गोष्टी समजावयास कठीण अशा आहेत. अज्ञानी व अस्थिर माणसे इतर धर्मशास्त्रलेखांचा जसा विपरीत अर्थ करतात तसा या पत्राचाही करतात. अशाने ते स्वतःच्या नाशाला कारणीभूत होतात.

  8. या पुस्तकातील संदेश ऐकणार्‍या प्रत्येकाला मी सावध करतो: या ग्रंथपटात जे लिहिले आहे त्यात कोणी भर घातली, तर परमेश्वर त्याच्यावर या पुस्तकात लिहिलेल्या पीडा आणेल.

  9. तसेच जो कोणी या भविष्यकथनच्या पुस्तकात वर्णन केलेल्या वचनांतून काही काढून टाकील, परमेश्वर त्याचा वाटा या पुस्तकात वर्णिलेल्या जीवनाच्या झाडातून व पवित्र नगरीतून काढून टाकील.