मुख्य मजकुरावर जा

The Miracles of Christ बद्दल बायबलमधील वचने

193 वचने · 30 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्यांना पाहून येशू म्हणाले, “तुम्ही याजकाकडे जा आणि त्याला दाखवा.” आणि ते वाटेत जात असतानाच त्यांचा कुष्ठरोग नाहीसा झाला.

  2. तेवढ्यात त्यांच्यातील एकाने महायाजकाच्या दासावर वार करून त्याचा उजवा कान कापून टाकला.

  3. येशूंनी शिष्यांना म्हटले, “पुरे करा.” आणि त्यांनी त्या मनुष्याचा कान स्पर्श करून बरा केला.

  4. ते येथे नाही, ते पुन्हा उठले आहेत! गालीलात असताना त्यांनी तुम्हाला काय सांगितले होते याची आठवण करा.

  5. त्या ठिकाणी जवळच पाण्याचे सहा दगडी रांजण होते, ते यहूदीयांच्या शुद्धीकरणासाठी वापरले जात असत आणि त्या प्रत्येकात सुमारे शंभर लीटर पाणी मावत असे.

  6. येशू त्या नोकरांना म्हणाले, “रांजण पाण्याने भरा” त्याप्रमाणे त्यांनी ते पुरेपूर भरले.

  7. नंतर येशू त्यांना म्हणाले, “आता यातील काही काढून भोजन प्रमुखाकडे न्या.” त्यांनी तसे केले,

  8. त्या भोजन प्रमुखाने द्राक्षारसात परिवर्तित झालेल्या पाण्याची चव पाहिली. तो द्राक्षारस कुठून आणला हे त्याला माहीत नव्हते, पण ज्या नोकरांनी पाणी काढले होते त्यांना माहीत होते. म्हणून त्याने वराला बाजूला बोलावून म्हटले,

  9. “प्रत्येकजण उत्तम द्राक्षारस प्रथम वाढतो आणि पाहुणे पिऊन तृप्त झाले की, मग हलक्या प्रतीचा वाढतो; तुम्ही तर उत्तम द्राक्षारस आतापर्यंत ठेवला आहे.”

  10. गालीलातील काना गावी त्यांनी पुन्हा भेट दिली, येथेच त्यांनी पाण्याचा द्राक्षारस केला होता. ते तिथे असताना, कफर्णहूममध्ये एका शासकीय अधिकार्‍याचा मुलगा आजारी होता.

  11. येशू यहूदीयातून गालीलात आले आहेत, हे ऐकून तो त्यांच्याकडे गेला व आपण येऊन माझ्या मुलाला बरे करावे, अशी त्यांना आग्रहाने विनंती केली, कारण तो मुलगा मृत्युशय्येवर होता.

  12. तेव्हा येशू म्हणाले, “मी अद्भुते व चिन्हे केल्याशिवाय तुम्ही लोक मजवर विश्वास ठेवणार नाही.”

  13. तो शासकीय अधिकारी म्हणाला, “प्रभूजी, माझे मूल मरण्यापूर्वी येण्याची कृपा करा.”

  14. येशू त्याला म्हणाले, “जा, तुझा मुलगा जगेल, तो मरणार नाही.” त्या मनुष्याने येशूंच्या वचनावर विश्वास ठेवला आणि निघाला.

  15. तो मार्गावर असतानाच, त्याचे काही दास त्याला भेटले आणि आपला मुलगा जिवंत आहे अशी बातमी त्यांनी त्याला दिली.

  16. मुलाला कोणत्या वेळेपासून बरे वाटू लागले, अशी त्याने त्यांच्याजवळ चौकशी केली असता त्यांनी उत्तर दिले, “काल दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्याचा ताप नाहीसा झाला.”

  17. तेव्हा त्या पित्याला उमगले की त्याच घटकेस येशूंनी, “तुझा मुलगा जगेल तो मरणार नाही.” हे शब्द उच्चारले होते. मग तो व त्याच्या संपूर्ण कुटुंबाने येशूंवर विश्वास ठेवला.

  18. तिथे अडतीस वर्षे अपंग असलेला एक मनुष्य होता.

  19. येशूंनी त्याला तिथे पडलेले पाहिले आणि तो तसाच स्थितीत बराच काळ पडून आहे, असे जाणून त्याला विचारले, “तुला बरे होण्याची इच्छा आहे काय?”

  20. “प्रभूजी,” तो अपंग म्हणाला, “पाणी हालविल्यानंतर तळ्यात उतरण्यास मला मदत करेल असा कोणी नाही. मी प्रयत्न करून आत उतरण्याआधी दुसराच आत उतरलेला असतो.”

  21. तेव्हा येशू त्याला म्हणाले, “ऊठ आणि आपले अंथरूण उचल आणि चालू लाग.”

  22. त्याच क्षणी तो मनुष्य बरा झाला आणि आपले अंथरूण उचलून चालू लागला. ज्या दिवशी हे घडले तो शब्बाथ दिवस होता.

  23. ते येशूंना होडीत घेण्यास तयार झाले आणि लागलीच ती होडी जिथे त्यांना जायचे होते त्या किनार्‍यास पोहोचली.

  24. येशू जात असताना, त्यांनी एका जन्मांध मनुष्यास पाहिले,

  25. तेव्हा त्यांच्या शिष्यांनी त्यांना विचारले, “गुरुजी, कोणी पाप केले, या मनुष्याने की त्याच्या आईवडिलांनी, ज्यामुळे हा आंधळा जन्मला?”