The Miracles of Christ बद्दल बायबलमधील वचने: Tempest stilled
Tempest stilled बद्दल वचने
मग त्यांचे शिष्य होडीत बसून त्यांच्याबरोबर गेले.
तेव्हा, एकाएकी सरोवरात भयंकर वादळ सुटले, लाटा होडीवर आदळू लागल्या व त्यांची होडी बुडू लागली. पण येशू झोपी गेले होते.
तेव्हा शिष्यांनी त्यांना उठविले आणि ते त्यांना म्हणाले, “प्रभूजी, आम्हाला वाचवा! आपण सर्वजण बुडत आहोत!”
येशू त्यांना म्हणाले, “अहो, अल्पविश्वासी, तुम्ही इतके का घाबरला?” मग ते उठले आणि त्यांनी वार्याला व लाटांना धमकाविले आणि सर्वकाही शांत झाले.
मग जेव्हा ते होडीत चढले तेव्हा वादळ शांत झाले.