मुख्य मजकुरावर जा

The Christ Jesus बद्दल बायबलमधील वचने

607 वचने · 25 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. राजाला खूपच राग आला. त्याने आपले सैन्य पाठवून दासांना ठार करणार्‍यांचा नाश केला. त्यांची शहरे जाळून टाकली.

  2. “यानंतर राजा आपल्या दासांना म्हणाला, ‘लग्नाची मेजवानी तयार आहे, पण ज्यांना मी आमंत्रण दिले ते लोक या बहुमानास पात्र नाहीत.

  3. तेव्हा तुम्ही रस्त्यांच्या चौकामध्ये जा आणि तिथे जे दिसतील, त्यांना मेजवानीस घेऊन या.’

  4. राजाच्या आज्ञेप्रमाणे दास बाहेर गेले आणि चांगले वाईट, असे जे कोणी त्यांना रस्त्यांत सापडले, त्या सर्वांना ते मेजवानीस घेऊन आले आणि मेजवानीचा कक्ष आमंत्रितांनी भरून गेला.

  5. “राजा पाहुणे मंडळीस भेटावयास आला, त्यावेळी एक मनुष्य विवाहोत्सवाचा पोशाख न घालताच आलेला दिसला.

  6. राजाने त्या मनुष्याला विचारले, ‘मित्रा, लग्नाच्या पोषाखाशिवाय तू आत कसा आलास?’ तो मनुष्य स्तब्ध झाला.

  7. “मग राजा आपल्या नोकरास म्हणाला, ‘या मनुष्याचे हातपाय बांधा आणि त्याला बाहेरच्या अंधारात फेकून द्या. त्या ठिकाणी रडणे आणि दातखाणे चालेल.’

  8. “हे यरुशलेम, यरुशलेम! संदेष्ट्यांना ठार मारणारे आणि तुझ्याकडे पाठविलेल्यांना धोंडमार करणारे! जशी कोंबडी आपल्या पिलांना पंखाखाली एकवटते, तसे तुझ्या लेकरांना एकवटण्याची माझी कितीतरी इच्छा होती. पण तुमची नव्हती.

  9. आणि पाहा! आताच तुझे घर ओसाड पडले आहे.

  10. मी तुला सांगतो की, ‘प्रभूच्या नावाने येणारे धन्यवादित असो, असे तू म्हणेपर्यंत मी तुझ्या दृष्टीस पडणार नाही.’ ”

  11. मग येशू शिष्यांना म्हणाले, “आज रात्री तुम्ही सर्वजण मला एकट्याला सोडून पळून जाल, कारण धर्मशास्त्रात असे लिहिले आहे: “ ‘मी मेंढपाळावर प्रहार करेन, आणि कळपातील मेंढरांची पांगापांग होईल.’

  12. परंतु मी पुन्हा जिवंत झाल्यावर, तुमच्या आधी गालीलात जाईन आणि तिथे तुम्हाला भेटेन.”

  13. यावर पेत्राने त्यांना म्हटले, “जरी सर्वांनी सोडले, तरी मी तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही.”

  14. येशू म्हणाले मी तुला निश्चित सांगतो, “आज रात्रीच, कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील.”

  15. परंतु पेत्र जाहीरपणे म्हणाला, “मला तुमच्याबरोबर मरावे लागले, तरी मी तुम्हाला नाकारणार नाही.” आणि बाकीचे सर्व शिष्यही असेच म्हणाले.

  16. मी माझ्या पित्याला विनंती केली तर, ते देवदूतांच्या बारापेक्षा अधिक सैन्यतुकड्या ताबडतोब पाठविणार नाहीत काय?

  17. पण मी तशी विनंती केली तर जे काही घडत आहे, त्याविषयाचे धर्मशास्त्रात लिहिलेले भविष्य कसे पूर्ण होईल?”

  18. हे सर्व होत असताना, पेत्र अंगणात बाहेर बसला होता आणि एक दासी त्याच्याकडे आली व ती त्याला म्हणाली, “तू गालीलकर येशूंबरोबर होतास.”

  19. परंतु पेत्राने सर्वांच्यासमोर नकार दिला. तो म्हणाला, “तू कशाबद्दल बोलतेस हे मला समजत नाही.”

  20. मग तो बाहेरील आवाराच्या दाराजवळ गेला, तिथे त्याला दुसर्‍या एका दासीने पाहिले आणि ती लोकांना म्हणाली, “हा मनुष्य नासरेथच्या येशूंबरोबर होता.”

  21. या खेपेसही पेत्र नाकारून आणि शपथ घेऊन म्हणाला, “मी त्या मनुष्याला ओळखत नाही!”

  22. थोड्या वेळाने जी माणसे तिथे उभी होती, ती पेत्राला म्हणाली, “तू खरोखर त्यांच्यापैकीच आहेस हे आम्हाला माहीत आहे. तुझ्या भाषा-शैलीवरून आम्ही हे सांगू शकतो.”

  23. हे ऐकून पेत्र शाप देऊ लागला व शपथ घेऊन त्यांना म्हणू लागला, “मी त्या मनुष्याला ओळखत नाही.” तेवढ्यात कोंबडा आरवला.

  24. त्याच क्षणाला पेत्राला येशूंचे शब्द आठवले, “पेत्रा, कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील.” पेत्र दूर निघून गेला आणि अतिशय दुःखाने रडला.

  25. ज्या यहूदाहने, त्यांचा घात केला होता, त्याने पाहिले की येशूंना दोषी ठरविण्यात आले, तेव्हा त्याला खेद झाला आणि त्याने चांदीची तीस नाणी महायाजक व वडीलजन यांच्याकडे परत केली.