The Christ Jesus बद्दल बायबलमधील वचने: Worship of Jesus
Worship of Jesus बद्दल वचने
“कोणाच्याही बाजूचा नाही,” त्याने उत्तर दिले, “परंतु याहवेहचा सेनानायक म्हणून मी आलो आहे.” तेव्हा यहोशुआने आदराने त्याच्यासमोर लोटांगण घातले आणि त्याला विचारले, “माझ्या प्रभूकडून त्याच्या सेवकासाठी काय आदेश आहे?”
याहवेहच्या सेनानायकाने उत्तर दिले, “तुझ्या पायातील पायतण काढ, कारण ज्या भूमीवर तू उभा आहेस ती पवित्र आहे.” तेव्हा यहोशुआने त्याप्रमाणे केले.
यानंतर येशूंचे अकरा शिष्य गालीलातील ज्या डोंगरावर येशूंनी त्यांना जमावयास सांगितले होते, त्या डोंगरावर गेले.
त्यांनी त्यांना पाहिले आणि त्यांची उपासना केली. परंतु काहींनी संशय धरला.
येशूंना त्याने दूर अंतरावरून पाहिले व तो धावत आला आणि त्यांच्यासमोर गुडघे टेकून पाया पडला,
तो मोठ्याने ओरडून म्हणाला, “हे येशू, परात्पर परमेश्वराच्या पुत्रा, तुला माझ्याशी काय काम? परमेश्वराची शपथ मला छळू नकोस.”
मग जे त्यांच्यापुढे गेले आणि जे त्यांच्यामागून चालले ते मोठ्याने ओरडून म्हणाले: “होसान्ना!” “प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो!”
“आमचा पिता दावीदाचे येणारे राज्य आशीर्वादित होवो!” “सर्वोच्च स्वर्गात होसान्ना!”
ते स्तेफनाला दगडमार करीत असताना, स्तेफनाने प्रार्थना केली, “प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार करा.”
आणि मग गुडघ्यावर टेकून मोठ्याने ओरडून म्हणाला, “हे प्रभू, हे पाप त्यांच्या हिशेबी धरू नका.” असे बोलल्यानंतर तो मरण पावला.
मी प्रभूला तीन वेळा हे माझ्यापासून काढून घ्यावे म्हणून विनंती केली.
त्यांनी म्हटले, “माझी कृपा तुला पूर्ण आहे. कारण माझे सामर्थ्य अशक्तपणात पूर्णत्वास येते.” कारण माझ्या अशक्तपणाबद्दल मी प्रौढी मिरवीन, म्हणजे ख्रिस्ताचे सामर्थ्य माझ्यावर राहील.
यासाठी की येशूंच्या नावाने प्रत्येक गुडघा टेकला जावा, स्वर्गात, पृथ्वीवर आणि पृथ्वीच्या खाली,
परमेश्वर पित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जीभ कबूल करेल की येशू ख्रिस्त हेच प्रभू आहेत.
कोकर्याने ती गुंडाळी घेतली, तेव्हा त्या चार सजीव प्राणी व चोवीस वडीलजनांनी कोकर्याच्या पुढे दंडवत केले. त्या प्रत्येकाजवळ एकएक वीणा आणि धूपद्रव्याने भरलेले सोन्याचे धूपपात्र होते. यातील धूप म्हणजे पवित्रजनांच्या प्रार्थना आहेत.
ते नवे गीत गाऊ लागले. गीताचे शब्द असे: “ती गुंडाळी घ्यावयास व त्याचे शिक्के फोडून तो उघडण्यास तुम्ही पात्र आहात, कारण तुमचा वध करण्यात आला होता आणि तुम्ही आपल्या रक्ताने परमेश्वरासाठी प्रत्येक वंश, भाषा, लोक व राष्ट्रे विकत घेतले आहे,
ते मोठ्याने म्हणत होत: “ज्यांचा वध करण्यात आला होता, तो कोकरा सामर्थ्य, संपत्ती, सुज्ञता, बल, सन्मान, गौरव आणि उपकारस्तुती स्वीकारण्यास पात्र आहे!”
मग स्वर्गातील, पृथ्वीवरील, पृथ्वीच्या खालील व समुद्रातील प्राण्यांना गाताना मी ऐकले. ते गात होते: “जे राजासनावर बसले आहेत, त्यांना व कोकर्याला उपकारस्तुती, सन्मान, गौरव आणि सामर्थ्य
तेव्हा ते चार सजीव प्राणी म्हणाले, “आमेन,” आणि त्या चोवीस वडीलजनांनी साष्टांग नमस्कार घालून आराधना केली.