The Christ Jesus बद्दल बायबलमधील वचने: Perfections of (Not classified under foregoing topics)
Perfections of (Not classified under foregoing topics) बद्दल वचने
न्यायाच्या दिवशी निनवेहचे लोक उठून या पिढीला दोषी ठरवतील, कारण योनाहचा उपदेश ऐकून त्यांनी पश्चात्ताप केला; आणि पाहा, योनाहपेक्षाही श्रेष्ठ असा एकजण येथे आहे.
दक्षिणेची राणी न्यायकाळी या पिढीबरोबर उठेल आणि त्यांना दंडपात्र ठरवेल, कारण ती शलोमोनाचे ज्ञान ऐकण्यास पृथ्वीच्या टोकाकडून आली; आणि पाहा, आता तर शलोमोनापेक्षा थोर असा कोणी येथे आहे.
ज्या यहूदाहने, त्यांचा घात केला होता, त्याने पाहिले की येशूंना दोषी ठरविण्यात आले, तेव्हा त्याला खेद झाला आणि त्याने चांदीची तीस नाणी महायाजक व वडीलजन यांच्याकडे परत केली.
“मी पाप केले आहे.” तो म्हणाला, “मी निर्दोष रक्ताचा विश्वासघात केला आहे.” “त्याचे आम्हाला काय? तू स्वतःच त्याला जबाबदार आहेस,” त्यांनी प्रत्युत्तर केले.
त्याचा संदेश हा होता: “माझ्यानंतर एकजण येत आहे, जे माझ्यापेक्षा फार सामर्थ्यवान आहेत व त्यांच्या पादत्राणाचे बंद सोडणारा एक गुलाम होण्याची सुद्धा माझी पात्रता नाही.
मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो, पण ते तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करतील.”