The Christ Jesus बद्दल बायबलमधील वचने: Omniscience of Jesus
Omniscience of Jesus बद्दल वचने
सल्ला आणि अचूक न्याय माझे आहेत; माझ्याकडे अंतर्ज्ञान आणि शक्ती आहे.
माझ्याद्वारे राजे राज्य करतात, आणि शासन करणारे योग्य तो हुकूमनामा देतात;
माझ्याच साहाय्याने अधिपती, आणि थोर—पृथ्वीवरील सर्व नीतिमान शासक अधिकार चालवितात.
याहवेहचा आत्मा त्यांच्यावर विसावेल— शहाणपणाचा आणि समंजसपणाचा आत्मा, सल्ला आणि पराक्रमाचा आत्मा, ज्ञानाचा आत्मा आणि याहवेहच्या भयाचा आत्मा—
आणि ते याहवेहचे भय बाळगण्यात आनंद मानतील. ते तोंडदेखला न्याय करणार नाहीत, किंवा कानाने ऐकलेल्या गोष्टीवरून ते निर्णय घेणार नाहीत.
तेव्हा येशूंनी त्यांच्या शिष्यांपैकी दोघांना पाठविले आणि सांगितले, “तुम्ही शहरात जा आणि एक मनुष्य पाण्याने भरलेली मोठी घागर घेऊन जात असलेला तुम्हाला भेटेल, त्याच्यामागे जा.
तो ज्या घरात जाईल त्या घराच्या मालकाला सांगा, ‘गुरुजी विचारत आहेत की, ज्या खोलीत मला माझ्या शिष्यांबरोबर वल्हांडणाचे भोजन करता येईल, ती पाहुण्यांची खोली कुठे आहे?’
तो तुम्हाला माडीवरील मोठी तयार व सुसज्ज असलेली एक खोली दाखवेल. तिथे आपल्यासाठी तयारी करा.”
आपल्यामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण होईल, याबद्दल शिष्यांमध्ये वादविवाद सुरू झाला.
पण येशूंनी, त्यांच्या मनातील विचार ओळखले आणि त्यांनी एका लहान बालकाला आपल्या बाजूला उभे करून,
ते शिष्यांना म्हणाले, “जो कोणी या बालकाचा माझ्या नावाने स्वीकार करतो आणि जो कोणी माझा स्वीकार करतो, तो मला पाठविणार्याचा स्वीकार करतो. जो तुम्हामध्ये सर्वात कनिष्ठ आहे तोच थोर आहे.”
येशूंनी उत्तर दिले, “तुम्ही शहरात जा आणि एक मनुष्य पाण्याने भरलेली मोठी घागर घेऊन जात असलेला तुम्हाला भेटेल. ज्या घरात तो जाईल तिथे त्याच्यामागे जा.
त्या घराच्या मालकाला सांगा, ‘गुरुजी विचारत आहेत की, ज्या ठिकाणी मला माझ्या शिष्यांबरोबर वल्हांडणाचे भोजन करता येईल ती पाहुण्यांची खोली कुठे आहे?’
तो तुम्हाला माडीवरील मोठी तयार असलेली एक खोली दाखवेल. तिथे तयारी करा.”
ते गेले आणि येशूंनी सांगितल्याप्रमाणे त्यांना आढळून आले. तेव्हा त्यांनी वल्हांडणाच्या भोजनाची तयारी केली.
परंतु येशूंनी स्वतःस त्यांच्या अधीन केले नाही, कारण ते सर्व लोकांस ओळखून होते.
त्यांना मनुष्याविषयी कोणाच्याही साक्षीची गरज नव्हती, कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये काय आहे हे त्यांना माहीत होते.
येशूंनी तिला सांगितले, “जा आणि तुझ्या पतीला इकडे बोलावून आण.”
परंतु ती स्त्री म्हणाली, “मला पती नाही.” त्यावर येशू म्हणाले, “मला पती नाही हे जे तू म्हणतेस ते अगदी खरे आहे.
कारण वस्तुस्थिती अशी आहे की तुला पाच पती होते आणि जो पुरुष सध्या तुझ्याबरोबर आहे, तो तुझा पती नाही. तू जे काही सांगितले, ते सर्व सत्य आहे.”
“महाराज,” ती स्त्री उद्गारली, “आपण खरोखर संदेष्टे आहात असे मला दिसते.
मग, तिने आपली पाण्याची घागर तिथेच सोडली आणि नगरात जाऊन लोकांना म्हणाली,
“चला, या मनुष्याला पाहा, मी केलेली प्रत्येक गोष्ट त्याने मला सांगितली. तोच ख्रिस्त असू शकेल का?”
यावर येशू म्हणाले, “ज्यांची आंघोळ झाली आहे त्याला फक्त पाय धुण्याची गरज असते, कारण त्यांचे पूर्ण शरीर स्वच्छ असते. आता तू शुद्ध झाला आहेस, परंतु तुम्ही सर्वच शुद्ध नाहीत.”
आपला विश्वासघात करणारा कोण आहे ते येशूंना माहीत होते आणि म्हणूनच ते म्हणाले, तुम्ही सर्वच शुद्ध नाही.