मुख्य मजकुरावर जा

The Christ Jesus बद्दल बायबलमधील वचने: Rejected

231 वचने · 25 पैलू

"The Christ Jesus" साठी शोधा

Rejected बद्दल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. राष्ट्रे कट का रचत आहेत, आणि लोक व्यर्थच कुटिल योजना का करीत आहेत?

  2. याहवेह आणि त्यांच्या अभिषिक्ताविरुद्ध पृथ्वीवरील राजे एकत्र येऊन उठाव करीत, असे म्हणत आहेत,

  3. “चला, आपण त्यांची बंधने तोडून टाकू, आणि त्यांच्या बेड्या काढून फेकून देऊ.”

  4. ते म्हणाले, “जा आणि या लोकांना सांग: “ ‘ते नेहमी पाहत राहिले, तरी त्यांना दिसत नाही, ते नेहमी कानांनी ऐकत असले, तरी त्यांना ऐकू येत नाही व ते ग्रहण करत नाहीत.’

  5. या लोकांचे अंतःकरण असंवेदनशील करा; त्यांचे कान मंद आणि त्यांचे डोळे बंद करा. नाहीतर ते त्यांच्या डोळ्यांनी पाहतील, त्यांच्या कानांनी ऐकतील, अंतःकरणापासून समजतील, आणि ते मागे वळतील आणि बरे होतील.”

  6. याहवेह असे म्हणतात: “मी तुमच्या आईला घटस्फोट दिला, जो दाखला देऊन मी तिला पाठविले, तो कुठे आहे? मी तुम्हाला माझ्या कोणत्या कर्जदारांना विकून टाकले? तुमच्या पापांमुळेच तुम्ही विकले गेले आहात; आणि तुमच्या अपराधांमुळे तुमच्या आईला पाठविण्यात आले.

  7. मी जेव्हा आलो, तेव्हा तिथे कोणीही का नव्हते? मी जेव्हा हाक मारली, तेव्हा कोणीही उत्तर का दिले नाही? तुम्हाला सोडविण्यासाठी माझा हात फारच आखूड होता काय? तुमचे तारण करण्यास माझ्याकडे सामर्थ्य नाही काय? मी केवळ धमकाविले तरी समुद्र आटून जाईल! नद्यांचे मी वाळवंटात रूपांतर करतो; त्यातील मासे पाण्याच्या अभावी सडतात आणि तहानेने मरतात.

  8. मी आकाशास अंधकार परिधान करवितो आणि गोणपाट त्याचे आच्छादन करतो.”

  9. सार्वभौम याहवेहने माझ्या मुखात उपदेशात्मक जीभ दिली आहे, त्यावर थकलेल्या लोकांना पडू न देणारी वचने आहेत, ते मला रोज सकाळी जागे करतात, शिक्षण प्राप्त करणाऱ्यासाठी उघडावे, तसे ते माझे कान उघडतात.

  10. सार्वभौम याहवेहनी माझे कान उघडले आहेत; मी बंडखोर नव्हतो, मी मागे फिरलो नाही.

  11. जे मला चाबकाचे फटकारे मारतात, त्यांना मी आपली पाठ देऊ केली, जे माझी दाढी उपटतात, त्यांना मी आपले गाल देऊ केले; उपहास करणारे व थुंकणाऱ्यांपासून मी तोंड लपवित नाही.

  12. मी लज्जित होणार नाही, कारण सार्वभौम याहवेह मला साहाय्य करतात. म्हणूनच मी माझा चेहरा गारगोटीसारखा कठीण केला आहे आणि मी लज्जित होणार नाही, हे मला माहीत आहे.

  13. मला न्याय देणारे माझ्या निकट आहेत. मग माझ्याविरुद्ध कोण आरोप करेल? चला आपण एकमेकांचा सामना करू या! माझ्यावर आरोप करणारा कोण आहे? त्याने माझा सामना करावा!

  14. सार्वभौम याहवेह मला साहाय्य करतात. मला कोण दोषी ठरविणार? माझ्यावर आरोप करणारे सर्व जुन्या कपड्याप्रमाणे विरून जातील; कसर त्यांना खाऊन टाकेल.

  15. तुमच्यामध्ये कोण आहे जो याहवेहचे भय बाळगतो आणि त्यांच्या सेवकाच्या आज्ञा पाळतो? जो अंधारात चालतो, ज्याच्याकडे प्रकाश नाही, त्याने याहवेहच्या नावावर विश्वास ठेवावा आणि त्याने आपल्या परमेश्वरावर विसंबून राहावे.

  16. परंतु आता, तुम्ही जे अग्नी प्रज्वलित करता आणि स्वतःला जळत्या मशालीचा पुरवठा करता, जा, तुम्ही स्वतः प्रज्वलित केलेल्या, आणि तुम्ही ज्वलंत केलेल्या मशालीच्या प्रकाशात चला, माझ्यापासून मात्र तुम्हाला हे प्राप्त होईल: तुम्ही यातनामध्ये पडून राहाल.

  17. आमच्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आणि याहवेहचा भुज कोणाला प्रकट झाला आहे?

  18. त्यांच्यासमोर तो कोवळ्या अंकुरासारखा वाढला, शुष्क भूमीतून उगविलेल्या मुळासारखा होता. आम्हाला आकर्षित करेल असे कोणतेही सौंदर्य वा वैभव त्याच्यामध्ये नव्हते, तो आम्हाला हवासा वाटेल असे त्याच्या स्वरुपात काहीही नव्हते.

  19. मनुष्यांनी त्याला तुच्छ लेखले आणि त्याला नाकारले, कारण क्लेशांनी व्यापलेला व व्याधींशी परिचित असा तो पुरुष होता. जणू एखाद्याला पाहून लोकांनी आपली तोंडे लपवावी तसा तो तिरस्कृत व खालच्या दर्जात गणलेला होता.

  20. तरी देखील त्याने आमचे दुःख स्वतःवर घेतले, आणि आमचे क्लेश वाहिले, आम्हाला मात्र वाटले की परमेश्वरानेच त्याला ही शिक्षा दिली, त्यांनीच दुःखी केले व ही पीडा दिली.

  21. जो कोणी माझी वचने ऐकतो पण ती आपल्या आचरणात आणत नाही, तो पाया न घालता आपले घर वाळूवर बांधण्यार्‍या मूर्ख माणसासारखा आहे.

  22. मग पाऊस पडला, पूर आला, वारेही सुटले आणि त्या घरावर जोराने आदळले आणि ते घर कोसळून पडले.”

  23. जर कोणी तुमचे स्वागत केले नाही किंवा तुमचे शब्द ऐकले नाही, तर त्या घरातून किंवा शहरातून निघा आणि तुमच्या पायाची धूळ तिथेच झटकून टाका.

  24. मी तुम्हाला निश्चित सांगतो की, न्यायाचा दिवस सदोम व गमोराला त्या नगरापेक्षा अधिक सुसह्य असेल.

  25. “या पिढीच्या लोकांची तुलना मी कशाशी करू? बाजारात बसून इतरांना हाक मारणार्‍या लहान मुलांसारखी ही पिढी आहे: