मुख्य मजकुरावर जा

The Christ Jesus बद्दल बायबलमधील वचने

607 वचने · 25 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यावर येशूंनी खुलासा केला, “स्वर्गाच्या राज्याची रहस्ये जाणून घेण्याचे ज्ञान तुम्हाला दिले आहे, परंतु त्यांना ते दिलेले नाही.

  2. कारण ज्यांच्याजवळ आहे त्यांना अधिक दिले जाईल, म्हणजे त्यांच्याकडे विपुल असेल. ज्यांच्याजवळ नाही, त्यांच्याजवळ जे असेल ते देखील त्यांच्यापासून काढून घेतले जाईल.

  3. “ते नेहमी पाहत असले, तरी त्यांना दिसत नाही, ते नेहमी कानांनी ऐकत असले, तरी त्यांना ऐकू येत नाही व ते ग्रहण करत नाहीत. म्हणूनच मी त्यांच्याशी दाखल्यांनी बोलतो!

  4. त्यांच्याविषयी यशायाह संदेष्ट्याची ही भविष्यवाणी पूर्ण होत आहे: “ ‘ते नेहमी पाहत राहिले, तरी त्यांना दिसत नाही, ते नेहमी कानांनी ऐकत असले, तरी त्यांना ऐकू येत नाही व ते ग्रहण करत नाहीत.

  5. नंतर येशूंनी तो प्रांत सोडला आणि सोर व सीदोन या प्रांतात गेले.

  6. एक कनानी स्त्री त्या भागातून येशूंकडे आली आणि त्यांना विनवणी करून म्हणाली, “प्रभू, दावीद राजाचे पुत्र, माझ्यावर दया करा! माझी मुलगी भूतग्रस्त झाली असून, ती पुष्कळ छळ सहन करीत आहे.”

  7. पण येशूंनी एका शब्दानेही तिला उत्तर दिले नाही; तेव्हा त्यांच्या शिष्यांनी त्यांना विनंती केली, “प्रभूजी, तिला पाठवून द्या, कारण ती आपल्यामागे सारखी ओरडत येत आहे.”

  8. तेव्हा येशू त्या स्त्रीला म्हणाले, “हरवलेल्या इस्राएली मेंढराकडेच मला पाठविले आहे.”

  9. परंतु ती बाई पुढे आली आणि त्यांच्या पाया पडून म्हणाली, “प्रभूजी, मला मदत करा.”

  10. येशू म्हणाले, “लेकरांची भाकर काढून कुत्र्यांना घालणे बरोबर नाही.”

  11. “हे प्रभू आपले म्हणणे अगदी बरोबर आहे!” स्त्रीने उत्तर दिले, “स्वामीच्या मेजाखाली जे तुकडे पडतात ते कुत्रेही खातात.”

  12. ते ऐकून येशू तिला म्हणाले, “बाई, तुझा विश्वास फार मोठा आहे! म्हणून तुझी विनंती मान्य करण्यात आली आहे.” आणि त्याच क्षणी तिची मुलगी बरी झाली.

  13. पण मी तुम्हाला सांगतो, एलीयाह आधीच आलेला आहे आणि त्यांनी त्याला ओळखले नाही, परंतु त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांनी त्याला वाटेल तसे वागविले आहे.” अशाच प्रकारे मानवपुत्रालाही त्यांच्या हातून यातना भोगावयास लागतील.

  14. तेव्हा येशू बाप्तिस्मा करणार्‍या योहानाविषयी बोलत आहेत, हे शिष्यांच्या लक्षात आले.

  15. ते गालीलात एकत्र आले असताना, येशूंनी शिष्यांना सांगितले, “मानवपुत्राला, मनुष्यांच्या हाती दिले जाईल.

  16. ते त्याला जिवे मारतील. पण तिसर्‍या दिवशी तो पुन्हा जिवंत केला जाईल.” हे ऐकून शिष्यांची अंतःकरणे दुःखाने व्यापून गेली.

  17. मानवपुत्र हरवलेले शोधावयास आणि उद्धार करावयास आला आहे.

  18. “तुम्हाला काय वाटते? एखाद्याजवळ शंभर मेंढरे आहेत आणि त्यातील एक हरवले, तर तो मनुष्य काय करेल? तो आपली नव्याण्णव मेंढरे डोंगरावर सोडून ते हरवलेले मेंढरू शोधण्यास जाणार नाही काय?

  19. आणि मी तुम्हाला खचित सांगतो, ते सापडल्यावर, आपली नव्याण्णव मेंढरे सुखरुप आहेत त्यापेक्षा, आपले हरवलेले मेंढरू सापडले म्हणून तो अधिक आनंद करेल.

  20. त्याच प्रकारे या लहान बालकातील एकाचाही नाश होऊ नये अशी तुमच्या स्वर्गीय पित्याची इच्छा आहे.

  21. आता एक मनुष्य येशूंकडे आला व त्यांना विचारले, “गुरुजी, सार्वकालिक जीवन मिळविण्याकरिता मी कोणत्या चांगल्या गोष्टी कराव्या?”

  22. तेव्हा येशूंनी त्याला म्हटले, “तू मला उत्तम काय आहे हे का विचारतोस? फक्त परमेश्वरच खर्‍या अर्थाने उत्तम आहेत. पण तू आज्ञा पाळ म्हणजे तुला जीवनात प्रवेश मिळेल.”

  23. “कोणत्या आज्ञा?” त्याने विचारले. येशूंनी उत्तर दिले, “ ‘तू खून करू नको, तू व्यभिचार करू नको, तू चोरी करू नको, तू खोटी साक्ष देऊ नको,

  24. तुझ्या आई आणि वडिलांचा मान राख,’ आणि ‘जशी तुम्ही स्वतःवर तशी तुमच्या शेजार्‍यावर प्रीती करा.’ ”

  25. तो तरुण म्हणाला, “या सर्व मी पाळल्या आहेत. मी अजून कशात उणा आहे?”