मुख्य मजकुरावर जा

The Christ Jesus बद्दल बायबलमधील वचने

607 वचने · 25 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्याला कोणी विचारले, ‘तुझ्या छातीवर आणि पाठीवर हे घाव कशाचे आहेत?’ तेव्हा तो म्हणेल, ‘माझ्या मित्राच्या घरी या जखमा मला दिल्या आहेत!’

  2. “अगे तलवारी, माझ्या मेंढपाळाविरुद्ध जागी हो, माझ्या घनिष्ठ सोबत्याविरुद्ध ऊठ!” सर्वसमर्थ याहवेह म्हणतात, “मेंढपाळावर प्रहार कर, म्हणजे मेंढरांची पांगापांग होईल, आणि मी माझा हात कोकरांविरुद्ध उगारेन.”

  3. पण त्यांच्या येण्याचा दिवस कोण सहन करू शकेल? त्यांच्या आगमनास कोण सामोरा जाऊ शकेल? कारण तो मौल्यवान धातू शुद्ध करणार्‍या धगधगत्या अग्नीसारखा आहे आणि मलीन वस्त्रे धुणाऱ्या साबणासारखा असेल.

  4. रुपे शुद्ध करणार्‍यासारखा तो बसेल; तो लेवींना सोने व रुप्याप्रमाणे शुद्ध करेल. मग याहवेहकडे नीतिमत्तेने अर्पणे वाहणारे पुरुष असतील,

  5. योहान म्हणाला, “पश्चात्तापासाठी मी तुमचा पाण्याने बाप्तिस्मा करतो, परंतु ज्यांची पादत्राणे वाहण्यासही माझी पात्रता नाही, जे माझ्यापेक्षा फार सामर्थ्यवान आहेत, असे दुसरे कोणीतरी येत आहे. ते तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने आणि अग्नीने करतील.

  6. खळे स्वच्छ करण्यास त्यांच्या हातात धान्य पाखडण्याचे सूप आहे, ते गहू कोठारात साठवतील आणि न विझणार्‍या अग्नीमध्ये भुसा जाळून टाकतील.”

  7. मग सैतानाकडून येशूंची परीक्षा व्हावी म्हणून पवित्र आत्म्याने त्यांना अरण्यात नेले.

  8. चाळीस दिवस व चाळीस रात्र त्यांनी उपवास केला, तेव्हा त्यांना भूक लागली.

  9. मग परीक्षक येशूंकडे आला व म्हणाला, “तू परमेश्वराचा पुत्र असशील तर या दगडांना भाकरीत रूपांतर होण्यास सांग.”

  10. तेव्हा येशूंनी उत्तर दिले, “ ‘मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्वराच्या मुखातून निघणार्‍या प्रत्येक वचनाने जगेल’ असे लिहिले आहे.”

  11. मग सैतानाने पवित्र नगरीतील मंदिराच्या सर्वात उंच टोकावर त्यांना उभे केले.

  12. तो म्हणाला, “तू परमेश्वराचा पुत्र आहेस, तर खाली उडी टाक, कारण असे लिहिले आहे: “तो आपल्या देवदूतांना तुझ्यासंबंधाने आज्ञा देईल, आणि तुझ्या पायाला दगडाची ठेच लागू नये म्हणून ते तुला आपल्या हातांवर उचलून धरतील.”

  13. तेव्हा येशूंनी प्रत्युत्तर दिले, “असेही लिहिले आहे: ‘प्रभू तुमच्या परमेश्वराची परीक्षा पाहू नका.’ ”

  14. मग सैतानाने येशूंना एका उंच पर्वतावर नेले. तिथून त्याने त्यांना जगातील सर्व राज्ये व त्याचे गौरव दाखविले.

  15. “जर तू पाया पडून माझी उपासना करशील,” तो म्हणाला, “तर हे सर्व मी तुला देईन.”

  16. येशूंनी त्याला म्हटले, “अरे सैताना, माझ्यापासून दूर जा! असे लिहिले आहे: ‘केवळ प्रभू परमेश्वरालाच नमन कर आणि त्यांचीच सेवा कर.’”

  17. मग सैतान त्यांना सोडून निघून गेला आणि देवदूतांनी येऊन त्यांची सेवा केली.

  18. जो कोणी माझी वचने ऐकतो पण ती आपल्या आचरणात आणत नाही, तो पाया न घालता आपले घर वाळूवर बांधण्यार्‍या मूर्ख माणसासारखा आहे.

  19. मग पाऊस पडला, पूर आला, वारेही सुटले आणि त्या घरावर जोराने आदळले आणि ते घर कोसळून पडले.”

  20. जर कोणी तुमचे स्वागत केले नाही किंवा तुमचे शब्द ऐकले नाही, तर त्या घरातून किंवा शहरातून निघा आणि तुमच्या पायाची धूळ तिथेच झटकून टाका.

  21. मी तुम्हाला निश्चित सांगतो की, न्यायाचा दिवस सदोम व गमोराला त्या नगरापेक्षा अधिक सुसह्य असेल.

  22. तुम्ही सावध असले पाहिजे. तुम्हाला न्यायालयाकडे सोपविले जाईल आणि सभागृहामध्ये तुम्हाला फटके मारण्यात येईल.

  23. तुम्हाला माझ्या नावासाठी त्यांना व गैरयहूदीयांना साक्ष व्हावी म्हणून अधिकारी व राजांसमोर आणले जाईल.

  24. तुम्हाला अटक करून नेल्यावर न्यायालयासमोर काय बोलावे व कसे बोलावे याविषयी चिंता करू नका. त्यावेळी तुम्हाला काय बोलावे ते सुचविले जाईल.

  25. कारण तुम्ही बोलणार नाही पण तुमच्या पित्याचा आत्मा तुमच्याद्वारे बोलेल.