मुख्य मजकुरावर जा

The Christ Jesus बद्दल बायबलमधील वचने

607 वचने · 25 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मी तुम्हाला निश्चित सांगतो की, जग आनंद करेल पण तुम्ही रडाल व शोक कराल. तुम्ही दुःख कराल परंतु तुमच्या दुःखाचे रूपांतर आनंदात होईल.

  2. जी स्त्री बाळाला जन्म देते तिला वेदना होतात कारण तिची वेळ आलेली असते; परंतु जेव्हा तिचे बाळ जन्मास येते तेव्हा ती तिच्या बाळाला या जगात जन्मलेले पाहून आनंद करते व सर्व यातना विसरून जाते.

  3. त्याच प्रकारे आता दुःख करण्याची तुमची वेळ आहे, परंतु मी तुम्हाला पुन्हा भेटेन तेव्हा तुमचे हृदय आनंदी होईल आणि तुमचा आनंद तुमच्यापासून कोणीही हिरावून घेणार नाही.

  4. त्या दिवशी तुम्ही माझ्याजवळ काही मागणार नाही. मी तुम्हाला खरोखर सांगतो की, तुम्ही जे काही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते तो तुम्हाला देईल.

  5. आतापर्यंत तुम्ही माझ्या नावाने काही मागितले नाही. माझ्या नावाने मागा म्हणजे मिळेल आणि तुमचा आनंद पूर्ण होईल.

  6. “जरी मी अलंकारिक रीतीने बोलत आहे, तरी अशी वेळ येईल की मी तुम्हाबरोबर अशा भाषेमध्ये आणखी बोलणार नाही, तर पित्याविषयी तुम्हाला स्पष्टरीतीने सांगेन.

  7. त्या दिवसात तुम्ही माझ्या नावाने मागाल. मी असे म्हणत नाही की मी तुमच्यावतीने पित्याजवळ मागेन.

  8. हे पित्या, तुम्ही मजमध्ये व मी तुम्हामध्ये आहे, तसेच त्या सर्वांनी एक व्हावे, म्हणजे तुम्ही मला पाठविले असा जग विश्वास ठेवेल.

  9. तुम्ही जे गौरव मला दिले ते मी त्यांना दिले, यासाठी की जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे,

  10. शिमोन पेत्र आणि आणखी एक शिष्य येशूंच्या मागे आले. कारण हा शिष्य महायाजकाच्या ओळखीचा असल्यामुळे, त्याने येशूंबरोबर महायाजकाच्या अंगणात प्रवेश केला.

  11. परंतु पेत्राला बाहेर दाराजवळ थांबावे लागले. तो दुसरा शिष्य, ज्याला मुख्य याजकाची ओळख होती, तो परत आला व दारावर राखण ठेवणार्‍या दासीशी बोलला व त्यांनी पेत्राला आत आणले.

  12. मग त्या दासीने पेत्राला विचारले, “तू खात्रीने या माणसाच्या शिष्यांपैकी एक नाहीस ना?” त्याने उत्तर दिले, “मी नाही.”

  13. थंडी पडल्यामुळे शिपाई व वाड्यातील दास ऊब मिळावी म्हणून शेकोटी पेटवून त्याच्याभोवती शेकत उभे राहिले. पेत्रसुद्धा त्यांच्याबरोबर शेकत उभा राहिला.

  14. दरम्यान, महायाजकाने येशूंना त्यांच्या शिष्यांविषयी आणि त्यांचे शिक्षण त्याविषयी प्रश्न विचारले.

  15. येशूने त्याला उत्तर दिले, “मी जगापुढे उघडपणे बोलतो, कारण मी सभागृहांमध्ये व मंदिरात जिथे सर्व यहूदी एकत्रित येतात तिथे नियमितपणे शिक्षण दिले आहे. मी गुप्तपणे काहीही बोललो नाही.

  16. मला का विचारता? ज्यांनी माझे ऐकले त्यांना विचारा. मी काय बोललो ते त्यांना माहीतच असेल.”

  17. येशूने असे म्हटल्यावर, जवळ असणार्‍या अधिकार्‍यांपैकी एकाने येशूंच्या तोंडावर चापट मारली व “अशा रीतीने तू महायाजकाला उत्तर देतो काय?” त्याने दरडावून मागणी केली.

  18. येशूने उत्तर दिले, “मी जर काही चुकीचे बोललो असेल तर तसे सिद्ध करा. परंतु मी सत्य बोललो असेन, तर तुम्ही मला का मारले?”

  19. मग हन्नाने येशूंना बांधलेल्या अवस्थेतच महायाजक कयफा याजकडे पाठविले.

  20. दरम्यान, इकडे शिमोन पेत्र अजूनही शेकोटीजवळ शेकत उभा असताना त्यांनी त्याला विचारले, “तू खरोखर त्यांच्या शिष्यांपैकीच एक नाहीस का आहेस ना?” पेत्र नाकारून म्हणाला, “मी तो नाही.”

  21. परंतु ज्याचा कान पेत्राने कापून टाकला होता, त्याचा एक नातलग, महायाजकाच्या दासांपैकी एक होता. त्याने पेत्राला विचारले, “मी तुला येशूंबरोबर बागेत पाहिले नाही का?”

  22. पेत्राने पुन्हा नकार दिला आणि तेवढ्यात कोंबडा आरवला.

  23. सैनिकांनी येशूंना क्रूसावर खिळल्यानंतर, त्यांनी त्यांची वस्त्रे घेतली आणि एकाएका सैनिकाला एक असे त्याचे चार विभागामध्ये वाटप केले, फक्त अंतर्वस्त्रे ठेवली. हा अंगरखा शिवलेला नसून वरपासून खालपर्यंत संपूर्ण विणलेला होता.

  24. ते एकमेकांना म्हणाले, “त्याचा अंगरखा आपण फाडू नये, आपणापैकी तो कोणाला मिळावा, हे पाहण्यासाठी आपण चिठ्ठ्या टाकू या.” यामुळे पुढील शास्त्रलेख पूर्ण झाला: “त्यांनी माझी वस्त्रे आपसात वाटून घेतली, आणि माझ्या वस्त्रासाठी चिठ्ठ्या टाकल्या.” म्हणूनच त्या सैनिकांनी याप्रमाणे केले.

  25. यानंतर सर्वगोष्टी पूर्ण झाल्या आहेत हे जाणून शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून येशूंनी म्हटले, “मला तहान लागली आहे.”