मुख्य मजकुरावर जा

The Christ Jesus बद्दल बायबलमधील वचने

607 वचने · 25 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “जर कोणी माझी वचने ऐकून ती पाळीत नाही, तर मी त्या व्यक्तीचा न्याय करीत नाही. कारण मी या जगाचा न्याय करण्यासाठी आलो नसून, जगाचे तारण करण्यासाठी आलो आहे.

  2. यावर येशू म्हणाले, “ज्यांची आंघोळ झाली आहे त्याला फक्त पाय धुण्याची गरज असते, कारण त्यांचे पूर्ण शरीर स्वच्छ असते. आता तू शुद्ध झाला आहेस, परंतु तुम्ही सर्वच शुद्ध नाहीत.”

  3. आपला विश्वासघात करणारा कोण आहे ते येशूंना माहीत होते आणि म्हणूनच ते म्हणाले, तुम्ही सर्वच शुद्ध नाही.

  4. तुम्ही मला ‘गुरुजी’ आणि ‘प्रभूजी’ असे संबोधता आणि ते खरे आहे, यासाठी की तो मी आहे.

  5. आता ज्याअर्थी मी तुमचा प्रभू व गुरू असूनही तुमचे पाय धुतले, तसेच तुम्ही सुद्धा एकमेकांचे पाय धुतले पाहिजेत.

  6. जसे मी तुम्हासाठी केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हाला नमुना घालून दिला आहे.

  7. “मी तुम्हा सर्वांबद्दल बोलत नाही; मी ज्यांची निवड केली आहे ते मला माहीत आहेत. परंतु यासाठी की, ‘ज्याने माझ्याबरोबर भाकर खाल्ली तो माझ्यावर उलटला आहे.’ हा शास्त्रलेखाचा भाग पूर्ण होण्यासाठी असे झाले आहे.

  8. “मी तुम्हाला हे आताच, घडून येण्यापूर्वी सांगत आहे, ते यासाठी की जेव्हा तसे घडून येईल, तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा की मी तो आहे.

  9. तो निघून गेल्याबरोबर, येशू म्हणाले, “आता मानवपुत्राचे गौरव झाले आहे आणि परमेश्वराचे त्यामध्ये गौरव झाले आहे;

  10. जर परमेश्वराचे गौरव त्यांच्यामध्ये झाले तर परमेश्वर आपल्यामध्ये पुत्राचे गौरव करतील आणि लवकरच गौरव करतील.

  11. “मी द्राक्षवेल आहे; तुम्ही फांद्या आहात. जर तुम्ही मजमध्ये राहाल व मी तुम्हामध्ये, तर तुम्ही मुबलक फळ द्याल; कारण माझ्यापासून वेगळे राहून तुम्हालाही काही करता येणार नाही.

  12. जर तुम्ही माझ्यामध्ये राहत नाही, तर त्या फांदीसारखे आहात जी फेकून देतात व ती वाळते; अशा सर्व फांद्या गोळा करून अग्नीत टाकून जाळतात.

  13. परंतु तुम्ही माझ्यामध्ये राहिलात आणि माझी वचने तुम्हामध्ये राहिली, तर जी काही तुमची इच्छा असेल ते मागा आणि ते तुम्हासाठी करण्यात येईल.

  14. “जेव्हा कैवारी येईल, ज्याला मी पित्यापासून तुम्हाकडे पाठवेन, तो सत्याचा आत्मा जो पित्याकडून येतो—तो माझ्याविषयी साक्ष देईल.

  15. परंतु तुम्हीदेखील साक्ष दिलीच पाहिजे, कारण आरंभापासून तुम्ही मजबरोबर राहिला आहात.

  16. परंतु खरी गोष्ट सांगतो की, माझे जाणे हे तुमच्या हितासाठीच आहे. मी जर गेलो नाही, तर कैवारी तुमच्याकडे येणार नाही; पण मी जर गेलो तर मी त्याला तुमच्याकडे पाठवेन.

  17. जेव्हा तो येईल, तेव्हा पापाविषयी, नीतिमत्त्वाविषयी व न्यायनिवाड्या विषयी जग कशी चूक करत आहे हे तो सिद्ध करेल.

  18. पापाविषयी, कारण जगातले लोक मजवर विश्वास ठेवीत नाहीत;

  19. नीतिमत्त्वाविषयी, कारण मी पित्याकडे जात आहे आणि तुम्ही मला यापुढे पाहणार नाही;

  20. न्यायनिवाड्या विषयी, कारण या जगाच्या अधिपतीला दोषी ठरविण्यात आले आहे.

  21. “मला तुम्हाला बरेच काही सांगावयाचे आहे, पण आता ते तुमच्याने ग्रहण होणार नाही.

  22. परंतु जेव्हा तो सत्याचा आत्मा येईल, तेव्हा तो तुम्हाला मार्गदर्शन करून पूर्ण सत्यात नेईल, कारण तो आपल्या स्वतःचे काहीही सांगणार नाही; तर त्याने जे काही ऐकले आहे, तेच तुम्हाला सांगेल. तो तुम्हाला जे काही घडणार आहे ते सांगेल.

  23. कारण तो माझ्यापासून आहे, म्हणून माझे गौरव करेल आणि माझ्यापासून जे त्याला मिळेल ते तो तुम्हाला प्रकट करेल.

  24. पित्याचे जे सर्व आहे ते माझे आहे. यासाठी मी म्हणालो की आत्मा जे माझ्याकडून स्वीकारेल ते तो तुम्हाला प्रकट करेल.”

  25. येशू वारंवार म्हणत होते, “थोड्या वेळाने मी तुम्हाला दिसणार नाही, परंतु त्यानंतर थोड्या वेळाने तुम्ही मला पुन्हा पाहाल.”