मुख्य मजकुरावर जा

The Christ Jesus बद्दल बायबलमधील वचने

607 वचने · 25 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. परंतु ते त्यांच्याशी पित्यासंबंधी बोलत होते, हे त्यांना अद्यापि उमगले नव्हते.

  2. म्हणून येशू म्हणाले, “जेव्हा तुम्ही मानवपुत्राला उंच कराल, तेव्हाच मी तो आहे आणि मी स्वतःहून काही करत नाही तर पित्याने मला ज्यागोष्टी शिकविल्या, त्याच बोलतो हे तुम्हाला समजेल.

  3. ज्याने मला पाठविले; ते माझ्याबरोबर आहेत, त्यांनी मला एकटे सोडले नाही, कारण त्यांना जे आवडते ते मी नेहमी करत असतो.”

  4. हे ऐकल्यावर अनेकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला.

  5. पण मी सत्य सांगतो तर तुम्ही मजवर विश्वास ठेवीत नाही!

  6. मी पापी आहे हे तुमच्यापैकी कोणी सिद्ध करू शकेल का? जर मी सत्य सांगतो, तर मजवर विश्वास का ठेवीत नाही?

  7. जो कोणी परमेश्वरापासून आहे तो परमेश्वराचे शब्द ऐकतो. तुम्ही त्यांचे ऐकत नाही, याचे कारण हेच की तुम्ही परमेश्वराचे नाही.”

  8. त्यांच्यापैकी काही परूशी म्हणाले, “हा मनुष्य परमेश्वरापासून आलेला नाही, कारण तो शब्बाथ पाळत नाही.” परंतु इतरांनी विचारले, “पण पातकी मनुष्याला अशी चिन्हे करता येतील का?” यावरून त्यांच्यामध्ये फूट पडली.

  9. शेवटी परूशी पुन्हा आंधळ्या मनुष्याकडे वळले व त्याला म्हणाले, “त्याने तुझे डोळे उघडले तर त्यांच्याविषयी तुला काय म्हणावयाचे आहे?” यावर तो मनुष्य उत्तरला, “तो परमेश्वराचा संदेष्टा आहे.”

  10. मीच दार आहे; जो कोणी माझ्याद्वारे प्रवेश करतो त्याचे तारण होईल. ते आत येतील व बाहेर जातील आणि त्यांना कुरणे आढळतील.

  11. चोर केवळ चोरी, घात आणि नाश करण्यास येतो; मी त्यांना जीवन मिळावे व ते विपुलपणे मिळावे म्हणून आलो आहे.

  12. “मीच उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांकरिता आपला जीव देतो.

  13. पिता मजवर प्रीती करतात, याचे कारण हे आहे की, मी आपला जीव देतो, तो केवळ परत घेण्याकरिता देतो;

  14. तो कोणी मजपासून घेत नाही, तर मी स्वतः होऊनच तो अर्पण करतो. मला तो देण्याचा अधिकार आहे व तो परत घेण्याचाही अधिकार आहे. ही आज्ञा मला माझ्या पित्यापासून प्राप्त झाली आहे.”

  15. त्यांच्यापैकी काहीजण म्हणाले, “तो एकतर भूतग्रस्त अथवा वेडा तरी असावा. अशा माणसाचे तुम्ही का ऐकता?”

  16. तर इतर म्हणाले, “ही वचने ज्याला भूत लागलेले आहे त्या माणसाची नाहीत. भुताला आंधळ्यांचे डोळे उघडता येतील काय?”

  17. परंतु काहीजण परूश्यांकडे गेले आणि येशूंनी काय केले ते त्यांना सांगितले.

  18. मग मुख्य याजकांनी व परूश्यांनी न्यायसभा बोलावली. ते विचारू लागले, “आपण काय साध्य केले आहे? या ठिकाणी हा मनुष्य अनेक चिन्हे करीत आहे.

  19. जर आपण त्याला असेच करत राहू दिले, तर प्रत्येकजण त्याच्यावर विश्वास ठेवेल आणि रोमी येतील व आपले मंदिर व आपले राष्ट्र दोन्ही ताब्यात घेतील.”

  20. जो कोणी आपल्या जिवावर प्रीती करतो, तो आपल्या जीवास मुकेल आणि जो या जगात आपल्या जिवाचा द्वेष करेल, तो त्याला अनंतकाळाच्या जीवनासाठी राखेल.

  21. जर कोणी माझी सेवा करेल तर त्यांनी मला अनुसरावेच; म्हणजे जिथे मी आहे, तिथे माझा सेवक असेल. जे कोणी माझी सेवा करेल त्यांचा सन्मान माझा पिता करतील.

  22. आणि मला, पृथ्वीवर उंच केले जाईल, तेव्हा मी सर्व लोकांना माझ्याकडे ओढेन.”

  23. आपण कोणत्या प्रकारे मरणार आहोत हे सुचविण्यासाठी येशू असे बोलले.

  24. जमावाने म्हटले, “नियमशास्त्रामधून आम्ही ऐकले आहे की ‘ख्रिस्त सर्वदा राहील, तर मानवपुत्राला उंच केले पाहिजेत’ असे तुम्ही कसे म्हणता? हा ‘मानवपुत्र’ कोण आहे?”

  25. मी या जगात प्रकाश म्हणून आलो आहे, यासाठी की जे मजवर विश्वास ठेवतात त्यांनी अंधारात राहू नये.