Skip to content

Silver बद्दल बायबलमधील वचने

103 वचने · 57 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. राजाने यरुशलेमात चांदी व सोने धोंड्याप्रमाणे व गंधसरू डोंगर तळवटीतील उंबराच्या झाडांप्रमाणे सर्वसाधारण असे केले.

  2. शलोमोनचे सर्व प्याले सोन्याचे होते. लबानोनच्या वाळवंटातील राजवाड्यात असलेली सर्व पात्रे सुद्धा शुद्ध सोन्याची होती. चांदीचे काहीही बनविले नव्हते, कारण शलोमोनच्या काळात चांदीचे मोल कमी मानले जात असे.

  3. हीरामच्या सेवकांद्वारे चालविलेल्या गलबतांबरोबर शलोमोन राजाचाही व्यापारी गलबतांचा तांडा होता. तीन वर्षातून एकदा ही गलबते सोने, चांदी, हस्तिदंत, वानरे आणि मोर घेऊन परत येत असत.

  4. राजाने यरुशलेमात चांदीला धोंड्याप्रमाणे व गंधसरू डोंगर तळवटीतील उंबराच्या झाडांप्रमाणे सर्वसाधारण असे केले.

  5. काही पलिष्ट्यांनी यहोशाफाट याला भेटवस्तू आणि खंडणी म्हणून चांदी आणली आणि अरब लोकांनी त्याच्यासाठी कळप आणले: सात हजार सातशे मेंढ्या आणि सात हजार सातशे शेळ्या.

  6. जेव्हा त्यांनी ते काम संपविले, त्यांनी उरलेले पैसे राजा आणि यहोयादा यांच्याकडे आणले आणि त्यातून याहवेहच्या मंदिरासाठी वस्तू बनविल्या: विधीसाठी आणि होमार्पणासाठी वस्तू, आणि ताटेसुद्धा व सोन्या-चांदीच्या इतर वस्तू. जोपर्यंत यहोयादा जिवंत होता, तोपर्यंत याहवेहच्या मंदिरात निरंतर होमार्पण केले जात होते.

  7. सर्व शेजाऱ्यांनी दिलेल्या स्वेच्छेने दिलेल्या देणग्यांबरोबरच सोने, चांदी, गुरे याशिवाय इतर मोलवान भेटवस्तूही देऊन त्यांची मदत केली.

  8. नबुखद्नेस्सर राजाने परमेश्वराच्या मंदिराची जी सोन्याचांदीची पात्रे यरुशलेमाच्या मंदिरातून काढून नेली व बाबेलच्या मंदिरात ठेवली होती, ती कोरेश राजाने परत केली. ती पात्रे त्याने नेमलेला यहूदाहचा राज्यपाल शेशबस्सरच्या ताब्यात दिली.

  9. आणि जी सोन्याचांदीची पात्रे नबुखद्नेस्सर राजाने परमेश्वराच्या मंदिरातून बाबेलला नेली होती, ती सर्व यरुशलेमला परत नेण्यात येतील व पूर्वीसारखी परमेश्वराच्या मंदिरात ठेवली जातील.

  10. याप्रकारे मी त्यांचे वजन केले, 650 तालंत चांदी, 100 तालंत चांदीची पात्रे, 100 तालंत सोने,

  11. पण माझ्यापूर्वी असलेल्या राज्यपालांनी लोकांवर फारच जड ओझी लादली आणि त्यांच्याकडून अन्न व द्राक्षारसाशिवाय चांदीची चाळीस शेकेल यांची मागणी ते करीत असत. त्यांचे उपाधिकाराही प्रजेचे शोषण करीत. परंतु मी परमेश्वराच्या भयात राहून त्यांच्याप्रमाणे वागलो नाही.

  12. सजावटीचे पडदे पांढर्‍या आणि निळ्या रंगांचे होते आणि ते पांढर्‍या रंगाच्या कापडी फितींनी व जांभळ्या कापडांनी रुपेरी कड्यांना बसविलेल्या संगमरवरी खांबांना बांधलेले होते. संगमरवरी पाषाणांच्या फरशीवर सोन्याचे व रुप्याची लाल-जांभळी रत्ने, संगमरवरी, मौल्यवान मोती व इतर रत्नजडित आसने ठेवलेली होती.

  13. चांदीसाठी खाण असते आणि सोने शुद्ध करण्याचे एक ठिकाण असते.

  14. अतिशुद्ध सोन्याने ते विकत घेता येत नाही, किंवा चांदीच्या मापातही त्याचे मोल करता येत नाही.

  15. शुद्ध केलेल्या चांदीप्रमाणे, सात वेळेस शुद्ध केलेल्या सोन्याप्रमाणे, याहवेहची वचने शुद्ध आहेत.

  16. हे परमेश्वरा, तुम्ही आमची परीक्षा घेतली; चांदी शुद्ध करतात, तसे तुम्ही आम्हाला शुद्ध केले आहे.

  17. जेव्हा तुम्ही मेंढवाड्यात पडून राहता, तेव्हा असे दिसते की जणू कबुतराच्या पंखांना चांदी असते आणि त्यांचे पाय चमकणार्‍या सोन्याने मढविलेले असतात.”

  18. सर्वसमर्थाने, सलमोन पर्वतावर वितळून जाणार्‍या हिमकणांसारखी राजांची पांगापांग केली.

  19. पण त्या तर मानवी हातांनी बनविलेल्या चांदीच्या व सोन्याच्या मूर्ती आहेत.

  20. आणि जसा चांदीचा शोध घेतात तसा तू त्याचा शोध घेशील आणि गुप्त खजिना शोधतात तसा त्याचा शोध घेशील,

  21. कारण ती चांदीपेक्षा फारच लाभदायक आहे, आणि ती सोन्यापेक्षा अधिक फायदा मिळवून देते.

  22. चांदीऐवजी माझ्या शिक्षणाची, आणि उत्कृष्ट सोन्यापेक्षा ज्ञानाची निवड कर.”

  23. माझे फळ शुद्ध सोन्यापेक्षा चांगले आहे; आणि माझ्याद्वारे उत्पन्न झालेले उत्कृष्ट चांदीपेक्षा उत्तम आहे.

  24. नीतिमान मनुष्याची जिव्हा उत्तम चांदीप्रमाणे असते; परंतु दुष्टाच्या अंतःकरणास क्षुल्लक किंमत असते.

  25. सोन्यापेक्षा सुज्ञता मिळविणे कितीतरी पटीने चांगले आहे, आणि समंजसपणा, चांदी मिळविण्यापेक्षा चांगले आहे!