- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Silver बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
चांदी मुशीत आणि सोने भट्टीत पारखले जाते, परंतु अंतःकरणाची पारख याहवेहच करतात.
चांदीतील मळ काढला म्हणजे रौप्यकार पात्र तयार करू शकतो;
योग्य वेळेवर दिलेला सल्ला हा चांदीच्या करंड्यात ठेवलेल्या सोन्याच्या सफरचंदासारखा आहे.
गोड शब्द उच्चारणाऱ्या दुष्टाचे अंतःकरण चांदीचा मुलामा दिलेल्या मातीच्या पात्रासारखे आहे.
मी स्वतःसाठी चांदी आणि सोन्याचा व राजांच्या व प्रांताच्या मौल्यवान वस्तूंचा मोठा संग्रह केला. मी गायक आणि गायिका ठेवल्या, तसेच उपपत्न्यांसाठी जनानखानाही तयार केला—जे मनुष्याचे हृदय हर्षित करते.
आयुष्याचा चांदीचा दोर तुटण्याआधी, आणि सोन्याचे भांडे फुटण्याआधी; झर्यावरील घागर फुटण्याआधी, आणि विहिरीवरील रहाट मोडण्याआधी,
ती जर भिंत असती तर, आम्ही तिच्यावर चांदीचे बुरूज बांधू. ती जर दार असती तर आम्ही तिला, गंधसरूच्या फळ्यांनी झाकून टाकले असते.
तुमची चांदी क्षुद्र झाली आहे, तुमचा उत्तम द्राक्षारस पाणी मिसळून पांचट झाला आहे.
तुमचे राज्यकर्ते बंडखोर आहेत, चोरांचे भागीदार आहेत; त्या सर्वांना लाच घ्यायला आवडते, आणि ते बक्षिसांच्या मागे पळतात. ते अनाथांच्या बाजूचे रक्षण करीत नाहीत; विधवांचा खटल्याचे समर्थन करीत नाहीत.
त्यांची भूमी चांदी आणि सोन्याने भरून गेली आहे; त्यांची संपत्ती अमाप आहे. चांदी व सोने यांचे अमाप खजिने आहेत. त्यांच्या भूमीत असंख्य घोडे आहेत; त्यांच्याकडे असंख्य रथही आहेत.
त्या दिवशी लोक उपासना करण्यासाठी त्यांनी घडविलेल्या त्यांच्या चांदी व सोन्याच्या मूर्ती चिचुंद्र्या आणि वटवाघळे यांच्यापुढे फेकून देतील.
मग तुम्ही तुमच्या चांदीने मढविलेल्या मूर्ती आणि सोन्याने आच्छादित असलेल्या तुमच्या प्रतिमांची विटंबना कराल. तुम्ही त्यांना मासिक पाळीच्या कपड्याप्रमाणे फेकून द्याल आणि त्यांना असे म्हणाल, “आमच्यापासून दूर व्हा!”
एक धातूकाम करणारा ओतीव मूर्ती तयार करतो, आणि सोनार त्याला सोन्याने मढवितो आणि तिची चांदीच्या साखळ्यांनी सजावट करतो.
कास्याच्या ऐवजी मी तुझ्यासाठी सोने, तुझ्या लोखंडाच्या ऐवजी चांदी आणेन, लाकडाच्या ऐवजी कास्य, आणि तुझ्या दगडांच्या ऐवजी लोखंड आणेन. शांतता हे तुझ्यावरील अधिकारी, व कल्याण हे तुझ्यावरील शासक नियुक्त करेन.
ते अशुद्ध चांदीसारखे नाकारलेले आहेत, कारण याहवेहने त्यांचा त्याग केला आहे.”
ते तार्शीशहून चांदीचे पत्रे आणि उफाजहून सोन्याचे पत्रे आणून कुशल कारागीर व सोनारांकडून मूर्ती घडवून घेतात. मग त्यावर ते निळी व जांभळी वस्त्रे चढवितात— हे सर्व निष्णात कारागिरांनी तयार केलेले असते.
“मानवपुत्रा, इस्राएली लोक माझ्यासाठी गाळ असे झाले आहेत; ते सर्व भट्टीत राहिलेले कास्य, कथील, लोखंड व शिसे यासारखे आहेत. ते केवळ चांदीचा गाळ आहेत.
जसे चांदी, कास्य, लोखंड, शिसे व कथील वितळण्यासाठी धगधगत्या आगीच्या भट्टीत टाकली जातात, तसेच मी तुम्हाला माझ्या रागाने व क्रोधाने एकत्र करेन आणि तुम्हाला शहरात ठेवून वितळवीन.
जशी चांदी भट्टीत वितळली जाते, असेच तुम्ही त्या शहरात वितळून जाल आणि तुम्ही जाणाल की मी याहवेहने माझा कोप तुमच्यावर ओतला आहे.’ ”
“ ‘तुझ्या महान संपत्तीमुळे तार्शीशने तुझ्याबरोबर व्यापार केला; तुझ्या मालाच्या मोबदल्यात त्यांनी चांदी, लोखंड, कथील व शिसे दिली.
त्या पुतळ्याचे डोके शुद्ध सोन्याचे होते, त्याची छाती व दंड चांदीचे होते, त्याचे पोट व मांड्या कास्याच्या होत्या,
मग लोखंड, माती, कास्य, चांदी आणि सोने यांचे तुकडे तुकडे झाले आणि ते उन्हाळ्यात खळ्यातील भुशाप्रमाणे झाले. वाऱ्याने त्यांना अशा प्रकारे उडवून दिले की त्यांचा एक छोटासा तुकडाही शिल्लक राहिला नाही. पण ज्या दगडाने पुतळा उलथून टाकला, त्या दगडाचा एक प्रचंड डोंगर झाला व त्याने सर्व पृथ्वी झाकून टाकली.
“तुमच्यानंतर आणखी एक राज्य उदयास येईल जे तुमच्या राज्यापेक्षा कमी दर्जाचे असेल. त्यानंतर, तिसरे राज्य उदयास येईल, एक कास्याची प्रतिमा, जी संपूर्ण पृथ्वीवर राज्य करेल.
बेलशस्सर द्राक्षारस पीत असताना, त्याने आज्ञा दिली की त्याचे पिता नबुखद्नेस्सर यांनी यरुशलेमच्या मंदिरातून आणलेल्या सोन्याची आणि चांदीची पात्रे आणावीत, जेणेकरून राजा, त्याचे अधिकारी, त्याच्या पत्नी आणि त्याच्या उपपत्नी त्यामधून पिऊ शकतील.
तो त्यांचे दैवत, त्यांच्या धातूच्या मूर्ती आणि सोन्या-चांदीच्या मौल्यवान पात्रांना ताब्यात घेऊन इजिप्तला नेईल. काही वर्षे तो उत्तरेकडील राजाला एकटा सोडेल.