Silver बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
अब्राम जनावरांचे मोठे कळप, सोने व चांदी यांनी खूप श्रीमंत झाला होता.
“महाराज, त्या जागेची किंमत केवळ चांदीची चारशे शेकेल आहे; पण तुमच्या आणि माझ्यामध्ये त्याचे काय? तिथे आपल्या मृताला मूठमाती द्या.”
तेव्हा अब्राहामाने कबूल केल्याप्रमाणे एफ्रोनाने हेथी लोकांच्या समक्ष सांगितलेली किंमत, म्हणजे चारशे शेकेल चांदी, त्या काळातील व्यापार्यांच्या परिमाणानुसार अब्राहामाने त्याला दिली.
याहवेहने माझ्या धन्याला फार आशीर्वाद दिले आहेत आणि तो थोर पुरुष झाला आहे. त्यांनी त्याला मेंढरांचे कळप, गुरांची खिल्लारे, सोने चांदी, पुष्कळ दास आणि दासी, उंट आणि गाढवे दिली आहेत.
मिद्यानी व्यापार्यांचा काफिला म्हणजे इश्माएली लोक जवळ आले, तेव्हा त्यांनी योसेफाला त्या विहिरीतून बाहेर काढले आणि वीस शेकेल चांदी घेऊन भावांनी योसेफाला विकून टाकले; आणि व्यापार्यांनी योसेफाला आपल्याबरोबर इजिप्त देशाला नेले.
याखेरीज धाकट्याच्या पोत्यामध्ये धान्याच्या पैशाबरोबरच माझा चांदीचा प्यालाही ठेवा.” असे सांगितले आणि घरकारभार्याने योसेफाच्या आदेशाप्रमाणे केले.
इजिप्त देशातील स्त्रियांकडून व तुमच्या शेजारणीकडून प्रत्येक इस्राएली स्त्रीने सोन्याचे व चांदीचे दागिने व उत्तमोत्तम वस्त्रे मागून घ्यावीत व तुम्ही ते आपल्या मुलांवर व मुलींवर चढवावे, याप्रकारे तुम्ही इजिप्त देशातील लोकांना लुटाल.”
माझ्या खेरीज इतर कोणतेही देव बनवू नका; तुमच्यासाठी चांदीच्या किंवा सोन्याच्या मूर्त्या बनवू नका.
“त्यांच्यापासून तू जी अर्पणे स्वीकारावी ती ही आहेत: “सोने, चांदी आणि कास्य;
आणि त्या फळ्यांखाली ठेवण्यासाठी चांदीच्या चाळीस बैठका कराव्यात—प्रत्येक फळीसाठी दोन बैठका, प्रत्येक कुसाखाली एक.
एका फळीखाली दोन; अशा प्रकारे एकूण आठ फळ्या आणि चांदीच्या सोळा बैठका असतील.
हा पडदा, बाभळीच्या लाकडाचे बनविलेले सोन्याचे आवरण देऊन चांदीच्या बैठकावर उभ्या असलेल्या चार खांबावर चार सोन्याच्या बैठकावर टांगावा.
अंगणाच्या सभोवती असलेल्या सर्व खांबांना चांदीच्या पट्ट्या, कड्या व कास्याच्या बैठकी असाव्या.
चांदी किंवा कास्याची अर्पणे आणणार्यांनी ती याहवेहसाठी आणली आणि ज्या कोणाकडे बाभळीचे लाकूड होते, ते त्यांनी बांधकामाच्या कोणत्याही भागात उपयोगी पडेल असे म्हणून आणले.
आणि त्या फळ्यांखाली ठेवण्यासाठी चांदीच्या चाळीस बैठका केल्या—प्रत्येक फळीसाठी दोन बैठका, प्रत्येक कुसाखाली एक.
आणि प्रत्येक फळीखाली दोन, अशा चांदीच्या चाळीस बैठका केल्या.
एका फळीखाली दोन; अशा प्रकारे एकूण आठ फळ्या आणि चांदीच्या सोळा बैठका होत्या.
त्यासाठी त्यांनी बाभळीच्या लाकडाचे चार खांब केले व त्यावर सोन्याचे आवरण घातले. त्यासाठी त्यांनी सोन्याच्या कड्या व चांदीच्या चार बैठका बनविल्या.
त्याला चार खांब व कास्याच्या चार बैठका होत्या. त्यांच्या कड्या व पट्ट्या चांदीच्या होत्या आणि त्याच्या वरच्या भागाला चांदीचे आवरण दिले होते.
त्याचे अर्पण हे: पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;
जेव्हा वेदीचा अभिषेक झाला तेव्हा इस्राएलच्या पुढार्यांकडून तिच्या समर्पणाची अर्पणे ही होती: बारा चांदीची ताटे, बारा शिंपडण्याचे भांडे आणि बारा सोन्याची पात्रे होती.
चांदीचे प्रत्येक ताट एकशे तीस शेकेल वजनाचे होते आणि शिंपडण्याचे प्रत्येक भांडे सत्तर शेकेल वजनाचे होते. ते सर्व मिळून, चांदीची भांडी पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार दोन हजार चारशे शेकेल वजनाची होती.
“तू घडीव चांदीचे दोन कर्णे घडवून घे आणि समुदायाला एकत्र जमविण्यासाठी आणि छावण्या पुढे प्रवासास निघण्यासाठी त्यांचा उपयोग कर.
सोने, चांदी, तांबे लोखंड, कथील, शिसे
आणि त्या प्रत्येक वस्तू ज्या अग्नीत टिकतात त्या अग्नीत टाकाव्या, मग त्या शुद्ध होतील. परंतु त्या शुद्धीकरणाच्या पाण्यानेही शुद्ध कराव्या. ज्या वस्तू अग्नीत टिकत नाहीत, त्या शुद्धीकरणाच्या पाण्यात घालून काढाव्या.