Skip to content

Silver बद्दल बायबलमधील वचने

103 वचने · 57 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. सर्व चांदी आणि सोने, तसेच मिश्र धातूची वेगवेगळी पात्रे आणि लोखंडाची पात्रे याहवेहला समर्पित आहेत आणि ती त्यांच्या भांडारात आणली पाहिजे.”

  2. तेव्हा त्याने आपला पुत्र योरामला दावीदाला आशीर्वाद देऊन अभिनंदन करण्यासाठी दावीद राजाकडे पाठवले, कारण दावीदाने हादादेजरशी युद्ध करून त्याच्यावर विजय मिळविला होता. कारण हादादेजर आणि तोई यांच्यातही युद्ध होते. योरामने त्याच्याबरोबर चांदी, सोने आणि कास्याच्या वस्तू आणल्या.

  3. दावीद राजाने या वस्तू, सर्व राष्ट्रांतून लुटून आणलेल्या चांदी सोन्याबरोबर याहवेहला समर्पित केल्या, दावीदाने ताब्यात घेतलेली राष्ट्रे ही:

  4. शलोमोनचे सर्व प्याले सोन्याचे होते. लबानोनच्या वाळवंटातील राजवाड्यात असलेली सर्व पात्रे सुद्धा शुद्ध सोन्याची होती. चांदीचे काहीही बनविले नव्हते, कारण शलोमोनच्या काळात चांदीचे मोल कमी मानले जात असे.

  5. हीरामच्या गलबतांबरोबर शलोमोन राजाचाही व्यापारी गलबतांचा समुद्रावर तांडा होता. तीन वर्षातून एकदा ही गलबते सोने, चांदी, हस्तिदंत, वानरे आणि मोर घेऊन परत येत असत.

  6. आणि जे लोक येत असत, ते वर्षानुवर्षे चांदी व सोन्याच्या वस्तू, झगे, शस्त्रे व सुगंधी द्रव्ये व घोडे व खेचरे भेटी म्हणून आणत असत.

  7. राजाने यरुशलेमात चांदीला धोंड्याप्रमाणे व गंधसरू डोंगर तळवटीतील उंबराच्या झाडांप्रमाणे सर्वसाधारण असे केले.

  8. त्याने व त्याच्या पित्याने समर्पित केलेले चांदी व सोन्याचे सामान त्याने याहवेहच्या मंदिरात आणले.

  9. त्याने शेमेर नावाच्या व्यक्तीकडून शोमरोन डोंगर चांदीचे दोन तालांत देऊन विकत घेतले आणि त्या डोंगरावर नगर बांधले व त्या डोंगराचा आधीचा मालक शेमेर याच्या नावानुसार शोमरोन असे नाव दिले.

  10. तेव्हा अरामचा राजा म्हणाला, “मग आता जा आणि मी इस्राएलाच्या राजाला पत्र पाठवितो.” मग नामान आपल्याबरोबर चांदीचे दहा तालांत, सोन्याची सहा हजार सोन्याची नाणी आणि उंची पोशाखांचे दहा जोड घेऊन निघाला.

  11. नामान म्हणाला, “तू आनंदाने दोन तालांत घेऊन जा.” त्याने ते स्वीकारण्याची त्याला विनंती केली आणि मग ती चांदी आणि पोशाखांच्या दोन थैल्या बांधून दिल्या. त्याने ते आपल्या दोन सेवकांना दिले आणि ते त्याच्यापुढे निघाले.

  12. जो पैसा मंदिरामध्ये आणत होते याच्यात याहवेहच्या मंदिरात वापरण्यात येणारे चांदीचे पेले, कातऱ्या, वाट्या, कर्णे किंवा सोन्या-चांदीच्या इतर साहित्य यावर खर्च करण्यात आला नाही;

  13. तेव्हा त्याने आपला पुत्र हादोरामला दावीदाला आशीर्वाद देऊन अभिनंदन करण्यासाठी दावीद राजाकडे पाठवले, कारण दावीदाने हादादेजरशी युद्ध करून त्याच्यावर विजय मिळविला होता. कारण हादादेजर आणि तोऊ यांच्यातही युद्ध होते. हदोरामने त्याच्याबरोबर चांदी, सोने आणि कास्याच्या सर्वप्रकारच्या वस्तू आणल्या.

  14. “मी अत्यंत परिश्रम करून याहवेहच्या मंदिरासाठी एक लाख तालांत सोने, दहा लाख तालांत चांदी जमा केली आहे. कास्य आणि लोखंड अगणित प्रमाणात आहेत आणि लाकूड आणि दगडही आहेत. आणि तुलाही त्यात भर घालता येईल.

  15. त्याने वजन करून निरनिराळ्या सेवेसाठी लागणाऱ्या सोन्याच्या पात्रांसाठी लागणारे पुरेसे सोने व निरनिराळ्या सेवेसाठी लागणाऱ्या चांदीच्या पात्रांसाठी लागणारी पुरेशी चांदी दिली.

  16. दिव्यांना व दिवठणींना लागणारे ठराविक वजनाचे सोनेही त्याने दिले. त्याने चांदीच्या बैठकींसाठी व दिव्यांसाठी प्रत्येकाच्या कामाप्रमाणे पुरेल एवढी चांदी दिली.

  17. त्याने समक्षतेच्या भाकरीच्या मेजासाठी व इतर सोन्याच्या मेजांसाठी सोने तोलून दिले. त्याने चांदीच्या मेजांसाठीसुध्दा चांदी तोलून दिली.

  18. माझ्या उपलब्धींचा उपयोग करून परमेश्वराच्या मंदिरासाठी जितक्या वस्तू गोळा करता येतील, तितक्या मी केल्या आहेत—सोन्याच्या कामासाठी सोने, चांदीच्या कामासाठी चांदी, कास्याच्या कामासाठी कास्य, लोखंडाच्या कामासाठी लोखंड, लाकडाच्या कामासाठी लाकूड, गोमेद आणि जडावाच्या कामासाठी रंगीबेरंगी पाचूरत्न, उत्तम रत्ने, संगमरवरी पाषाण—मी गोळा केले आहेत.

  19. माझा भक्तिभाव माझ्या परमेश्वराच्या मंदिरावर आहे, म्हणून माझ्या व्यक्तिगत खजिन्यातून जो सोने आणि चांदीचा मी संग्रह केला आहे, तो मी परमेश्वराच्या मंदिरासाठी देतो. याव्यतिरिक्त या पवित्र मंदिरासाठी मी दिले आहे:

  20. ओफीराचे तीन हजार तालांत सोने आणि मंदिराच्या भिंती मढविण्यासाठी सात हजार तालांत शुद्ध चांदी.

  21. सर्व सोने आणि चांदीची कामे कारागिरांकडून करण्यात येतील. आता स्वेच्छेने याहवेहसाठी स्वतःचे पवित्रीकरण करण्यास कोण तयार आहे?”

  22. मग कुटुंबप्रमुख, इस्राएल गोत्राचे अधिकारी, हजार सैनिकांचे अधिकारी, आणि शंभर सैनिकांचे अधिकारी, राजाचे शासकीय अधिकारी यांनी स्वेच्छेने दान दिले.

  23. परमेश्वराच्या मंदिराच्या कामासाठी त्यांनी पाच हजार तालांत आणि दहा हजार दारिक सोने, दहा हजार तालांत चांदी, अठरा हजार तालांत कास्य आणि एक लाख तालांत लोखंड दिले.

  24. ज्यांच्याकडे रत्ने होती ती त्यांनी खजिन्यामध्ये जमा करण्यासाठी याहवेहच्या मंदिरातील खजिनदार गेर्षोनी यहीएलकडे सोपविली.

  25. पुढाऱ्यांच्या या स्वेच्छेने दिलेल्या प्रतिसादाने सर्व लोक आनंदित झाले, कारण त्यांनी स्वयंस्फुर्तीने व पूर्ण अंतःकरणाने, आनंदाने याहवेहच्या सेवेला दिले, दावीद राजालाही मोठा आनंद झाला.