Skip to content

Silver बद्दल बायबलमधील वचने

103 वचने · 57 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आता ते अधिकाधिक पाप करीत आहेत; ते आपल्या चांदीपासून स्वतःसाठी मूर्ती बनवतात, हुशारीने तयार केलेल्या प्रतिमा, त्या सर्व कारागिरांची हस्तकृती आहेत. या लोकांबद्दल असे म्हटले जाते, “हे नरबली देतात! ते वासराच्या मूर्तीचे चुंबन घेतात!”

  2. हा तिसरा भाग अग्नीत घालून चांदी शुद्ध करतात तसा मी शुद्ध करेन. आणि सोन्यासारखी त्यांची परीक्षा करेन. ते मला माझ्या नावाने हाक मारतील आणि मी त्यांच्या हाकेला उत्तर देईन; मी म्हणेन, ‘ते माझे लोक आहेत,’ आणि ते म्हणतील, ‘याहवेह आमचे परमेश्वर आहेत.’ ”

  3. देमेत्रिय नावाच्या चांदीच्या कारागिराने अर्तमीस देवीचे चांदीचे देव्हारे तयार करून तेथील कारागिरांना पुष्कळ उद्योग मिळवून दिला होता.