मुख्य मजकुरावर जा

Shimei बद्दल बायबलमधील वचने

53 वचने · 19 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जेव्हा शलोमोनला सांगण्यात आले की शिमी यरुशलेमहून गथला गेला होता आणि परत आला आहे.

  2. तेव्हा राजाने शिमीला बोलावून घेतले आणि त्याला म्हटले, “याहवेहसमोर तुझ्याकडून शपथ घेऊन तुला मी चेतावणी दिली नव्हती काय की, ‘तू यरुशलेम सोडून कुठेही जाशील त्या दिवशी खचितच तू मरशील’? त्यावेळी तू मला म्हणालास, ‘तुम्ही जे काही म्हणता ते बरे आहे, मी त्याप्रमाणे करेन.’

  3. तर मग तू याहवेहला दिलेली शपथ आणि मी दिलेली आज्ञा का पाळली नाही?”

  4. पुढे राजा शिमीला म्हणाला, “माझे पिता दावीदाशी तू किती चुकीचा वागला हे तुला तुझ्या मनात ठाऊक आहे. याहवेहच तुला तुझ्या चुकीचा मोबदला देतील.

  5. परंतु शलोमोन राजा आशीर्वादित राहील आणि दावीदाचे राजासन याहवेहसमोर सदा सुरक्षित राहील.”

  6. तेव्हा यहोयादाचा पुत्र बेनाइयाह याला राजाने आज्ञा दिली आणि त्याने बाहेर जाऊन शिमीवर वार केला आणि तो मेला. आता शलोमोनच्या हातात राज्य प्रस्थापित झाले.

  7. एलाचा पुत्र शिमी हा बिन्यामीन प्रांतावर.

  8. पदायाहचे पुत्र: जरूब्बाबेल व शिमी. जरूब्बाबेलाचे पुत्र: मशुल्लाम, हनन्याह. त्याच्या कन्येचे नाव शेलोमीथ.

  9. मिश्माचा वंशज: त्याचा पुत्र हम्मूएल. हम्मूएलाचा पुत्र जक्कूरचा पुत्र शिमी.

  10. शिमीस सोळा पुत्र व सहा कन्या झाल्या; पण त्याच्या भावास फारशी संतती झाली नाही आणि त्यांचा वंश यहूदाहच्या वंशाप्रमाणे वृद्धी पावला नाही.

  11. योएलाचे वंशज: त्याचा पुत्र शमायाह, त्याचा पुत्र गोग, त्याचा पुत्र शिमी,

  12. ही गेर्षोनच्या पुत्रांची नावे: लिब्नी व शिमी.

  13. मरारीचे वंशज: महली, त्याचा पुत्र लिब्नी, त्याचा पुत्र शिमी, त्याचा पुत्र उज्जाह,

  14. जो एथानचा पुत्र, जो जिम्माहचा पुत्र, जो शिमीचा पुत्र,

  15. अदायाह, बरीयाह व शिम्राथ हे शिमीचे पुत्र.

  16. गेर्षोनीचे विभाग: लादान व शिमी.

  17. शिमीचे पुत्र: शेलोमीथ, हजिएल व हारान; सर्व मिळून तीन. (हे लादानाचे कुटुंबप्रमुख.)

  18. शिमीचे पुत्र: यहथ, जीजा, यऊश आणि बरीयाह. हे शिमीचे पुत्र; सर्व मिळून चार.

  19. दहावी शिमी, त्याचे पुत्र आणि नातेवाईक 12,

  20. रामाही शिमी राजाच्या द्राक्षमळ्यांवर देखरेख करणारा होता. जब्दी शिफमी द्राक्षारस बनविणे व त्याचा साठा करणे यास जबाबदार होता.

  21. हेमानच्या वंशातील: यहीएल आणि शिमी; यदूथूनच्या वंशातील: शमायाह आणि उज्जीएल.

  22. नंतर त्यांनी विश्वासूपणाने वर्गणी, दशांश आणि समर्पित भेटवस्तू आणल्या. कनन्याह नावाचा लेवी या सर्व गोष्टींचा प्रभारी पर्यवेक्षक होता आणि त्याचा भाऊ शिमी त्याच्या नंतरच्या श्रेणीतील अधिकारी होता.

  23. यहीएल, अजज्याह, नहाथ, असाहेल, यरिमोथ, योजाबाद, एलीएल, इस्माकियाह, महथ आणि बेनाइयाह हे कनन्याह आणि त्याचा भाऊ शिमीचे सहायक होते. या सर्वांना राजा हिज्कीयाहने नियुक्त केल्यामुळे त्यांनी सेवा केली आणि अजर्‍याह परमेश्वराच्या मंदिराचा नियुक्त प्रभारी अधिकारी म्हणून सेवा करीत होता.

  24. लेवी मधून: योजाबाद, शिमी, कलायाह (उर्फ कलीता), पथह्याह, यहूदाह, व एलिएजर.

  25. हाशूमाच्या कुळातील: मत्तनई, मत्तथाह, जाबाद, एलिफेलेत, यरेमई, मनश्शेह व शिमी.