Skip to content

Self-Denial बद्दल बायबलमधील वचने

198 वचने · 41 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. म्हणून आपल्यातील ऐहिक स्वभाव कायमचा ठार करा: जसे लैंगिक अनैतिकता, अशुद्धता, कामवासना, दुष्ट इच्छा आणि लोभ जी मूर्तिपूजा आहे.

  2. एकमेकांशी लबाडी करू नका, कारण तुमचा जुना मनुष्य त्याच्या कृतींसह तुम्ही काढून टाकला आहे.

  3. कोणताही सैनिक स्वतःला संसाराच्या व्यवहारात गुंतवून घेत नाही. यासाठी की ज्याने त्याला सैन्यात घेतले त्याला संतुष्ट करावे.

  4. ती कृपा आपल्याला असे शिकविते की, आम्ही अभक्ती व ऐहिक वासनांना “नाही” म्हणून, आताच्या युगात आत्मसंयमाने, नीतीने व सुभक्तीने जगावे;

  5. जेव्हा परमेश्वराने त्याला वारसाचे अभिवचन दिलेल्या देशात जाण्यास सांगितले, तेव्हा अब्राहामाने आपण कुठे जात आहोत हे माहीत नसतानाही विश्वासाने आज्ञापालन केले.

  6. तो विश्वासाने त्या वचनदत्त देशात पोहोचला, तरीही तिथे एखाद्या परदेशी उपर्‍यासारखा तंबूतच राहिला. तसेच इसहाक व याकोब, ज्यांना परमेश्वराने हेच वारसाचे अभिवचन दिले होते, तेही पुढे तसेच तंबूत राहिले.

  7. ही सर्व विश्वासाने जगणारी माणसे, परमेश्वराने त्यांना देऊ केलेली सर्व वचनफळे मिळण्यापूर्वीच मरण पावले; परंतु त्यांनी ती वचनफळे दुरून पाहिली व त्याचे स्वागत केले. ही पृथ्वी आपले खरे घर नाही; येथे आपण केवळ परके व प्रवासी आहोत, असे त्यांनी मानले होते.

  8. त्यांच्या या बोलण्यावरून ते आपल्या खर्‍या देशाची वाट पाहत होते असे ते दाखवितात.

  9. त्यांची इच्छा असती तर त्यांनी मागे सोडलेल्या देशात ते परत जाऊ शकले असते,

  10. मोशे मोठा झाल्यावर त्यानेही विश्वासाद्वारे फारोह राजाचा नातू म्हणवून घेण्यास नाकारले,

  11. व पापाची क्षणभंगुर सुखे उपभोगण्याऐवजी परमेश्वराच्या लोकांबरोबर त्यांना मिळत असलेल्या वाईट वागणुकीच्या दुःखात सहभागी होण्याचे विश्वासाने निवडले.

  12. तेव्हा आपणही त्याच्याकडे, त्याने सहन केलेला अपमान घेऊन छावणीच्या बाहेर जाऊ या.

  13. प्रिय मित्रांनो, जे तुम्ही या जगात परदेशीय व बंदिवासात आहात त्या तुम्हाला मी विनंती करतो की, ज्या पापी वासना तुमच्या आत्म्याविरुद्ध लढतात त्यापासून दूर राहा.

  14. अनीतिमान लोकांमध्ये अशा प्रकारचे चांगले जीवन जगा, की अयोग्य कृत्ये करण्याचा ते तुमच्यावर आरोप करीत असतील, तरी ते तुमची चांगली कामे पाहतील आणि परमेश्वराच्या येण्याच्या दिवशी ते त्यांचे गौरव करतील.

  15. तुम्ही प्रभूकरिता मनुष्यांमध्ये स्थापित केलेल्या प्रत्येक अधिकार्‍याच्या अधीन असा: मग तो सर्वोच्च अधिकारी म्हणून राजासुद्धा असेल

  16. अथवा राज्यपाल असेल, कारण जे अयोग्य गोष्टी करतात त्यांना शिक्षा करण्यासाठी आणि जे योग्य गोष्टी करतात, त्यांची प्रशंसा करण्यासाठी ते परमेश्वराकडून पाठविलेले आहेत.

  17. कारण परमेश्वराची अशी इच्छा आहे की चांगली कार्ये करून तुम्ही मूर्ख लोकांची अज्ञानी बोलणी बंद करावीत.

  18. तुम्ही मुक्त आहात, परंतु तुमचे स्वातंत्र्य वाईट कृत्यांवर पांघरूण घालण्यासाठी वापरू नका, तर परमेश्वराच्या दासासारखे जगा.

  19. म्हणून, ज्याअर्थी ख्रिस्ताने त्यांच्या शरीरामध्ये दुःख सहन केले, त्याअर्थी तुम्ही सुद्धा तीच मनोवृत्ती धारण केली पाहिजे, कारण जो कोणी शरीरामध्ये दुःख सहन करतो तो पापाचा त्याग करतो.

  20. याचा परिणाम असा होतो की, त्यांचे उरलेले ऐहिक जीवन ते मानवाच्या वाईट इच्छेप्रमाणे नव्हे तर परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जगतात.

  21. याद्वारे त्यांनी आपल्याला त्यांची अतिमहान आणि मोलवान अभिवचने दिली आहेत, यासाठी की त्याद्वारे त्यांच्या दैवीस्वभावात आपण सहभागी व्हावे व जगाच्या भ्रष्टतेतून निर्माण होणार्‍या वाईट वासनेपासून आपली सुटका व्हावी.

  22. ते गैरयहूदी लोकांकडून कोणतीही मदत न घेता सेवेसाठी बाहेर निघाले हे परमेश्वराच्या नावाच्या गौरवासाठीच होते.

  23. पण आमच्या बंधुजनांनी कोकराच्या रक्ताने आणि आपल्या साक्षीच्या वचनाने त्याचा पाडाव केला. स्वतःच्या जिवावर प्रेम न करता त्यांनी मरण सोसले.