मुख्य मजकुरावर जा

Self-Denial बद्दल बायबलमधील वचने: General references

145 वचने · 41 पैलू

"Self-Denial" साठी शोधा

General references बद्दल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. काही वेळेनंतर परमेश्वराने अब्राहामाची परीक्षा घेतली. परमेश्वराने त्यास म्हटले, “अब्राहामा!” “हा, मी इथे आहे,” तो उत्तरला.

  2. मग परमेश्वर म्हणाले, “तुझा पुत्र, ज्याच्यावर तू प्रीती करतोस तो तुझा एकुलता एक पुत्र इसहाकाला बरोबर घे आणि मोरिया प्रदेशात जा आणि त्या ठिकाणी मी तुला जो डोंगर दाखवेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर.”

  3. अब्राहामाने दुसर्‍या दिवशी पहाटेस उठून गाढवावर खोगीर लादले आणि आपला पुत्र इसहाक व दोन सेवकांना व होमार्पणासाठी पुरेशी लाकडे बरोबर घेऊन तो परमेश्वराने सांगितलेल्या ठिकाणी जावयास निघाला.

  4. तिसर्‍या दिवशी अब्राहामाने आपली दृष्टी वर करून ते ठिकाण दुरून पाहिले.

  5. तेव्हा अब्राहाम सेवकांना म्हणाला, “तुम्ही येथे गाढवाजवळ थांबा, मी आणि माझा पुत्र पलीकडे जातो. परमेश्वराची उपासना करून तुमच्याकडे परत येतो.”

  6. अब्राहामाने होमार्पणासाठी घेतलेले लाकूड इसहाकाच्या खांद्यावर ठेवले आणि स्वतः सुरा व विस्तव घेतला. जसे ते चालत पुढे गेले,

  7. इसहाकाने अब्राहामाला विचारले, “बाबा?” “काय माझ्या मुला?” अब्राहामाने उत्तर दिले. “आपण लाकडे व विस्तव घेतले,” इसहाक म्हणाला, “पण होमार्पणासाठी कोकरू कुठे आहे?”

  8. अब्राहामाने उत्तर दिले, “परमेश्वर होमार्पणासाठी कोकरू पुरवतील, माझ्या मुला.” आणि ते दोघे एकत्र पुढे गेले.

  9. परमेश्वराने ज्या ठिकाणी जाण्यास सांगितले होते त्या जागी आल्यावर अब्राहामाने एक वेदी बांधली आणि त्यावर त्याने लाकडे रचून ठेवली. त्याने आपला पुत्र इसहाकाला बांधले आणि वेदीवरील लाकडांवर ठेवले;

  10. मग अब्राहामाने आपल्या मुलाचा बळी देण्याकरिता आपल्या हातातील सुरा उंचाविला.

  11. त्याच क्षणाला याहवेहचा दूत स्वर्गातून ओरडून म्हणाला, “अब्राहामा, अब्राहामा!” “हा मी इथे आहे,” तो उत्तरला.

  12. “मुलावर आपला हात उगारू नको.” तो म्हणाला, “त्याला काहीही करू नकोस. तुला परमेश्वराचे भय आहे हे मला समजले आहे, कारण तुझा पुत्र, एकुलता एक पुत्र मला अर्पिण्याचे तू नाकारले नाहीस.”

  13. परंतु राजा अरवनाहला म्हणाला, “नाही, मी त्याबद्दल तुला किंमत मोजून देणार. फुकट मिळालेले होमार्पण याहवेह माझ्या परमेश्वराला मी अर्पिणार नाही.” म्हणून दावीदाने जात्याचे खळे आणि बैल चांदीचे पन्नास शेकेल देऊन विकत घेतले.

  14. “मी ना माझ्या घरात प्रवेश करेन अथवा ना अंथरुणात पडेन,

  15. माझ्या डोळ्यास झोप लागू देणार नाही, वा डुलकीही घेणार नाही,

  16. जेव्हापर्यंत याहवेहसाठी मी एक जागा उपलब्ध करीत नाही, याकोबाच्या सर्वसमर्थासाठी एक निवासस्थान बांधत नाही.”

  17. योद्धा असण्यापेक्षा शांत स्वभावी असणे बरे, शहर जिंकून घेणार्‍यापेक्षा स्वतःवर ताबा ठेवणारा उत्तम.

  18. आणि जर तू खादाड असशील तर तुझ्या गळ्यावर सुरी लाव.

  19. मी माझे आवडते भोजन केले नाही; मी मांस खाल्ले नाही वा द्राक्षारस आपल्या ओठाला लावले नाही; तीन आठवडे पूर्ण होईपर्यंत मी तेलाचा अभ्यंगसुद्धा केले नाही.

  20. जर तुमचा उजवा डोळा तुम्हाला अडखळण करीत असेल तर तो उपटून फेकून द्या. तुमचे संपूर्ण शरीर नरकात जाण्यापेक्षा शरीराचा एक भाग गमविणे अधिक उत्तम आहे;

  21. आणि जर तुमचा उजवा हात तुम्हाला अडखळण करीत असेल, तर तो कापून टाक. संपूर्ण शरीर नरकात जाण्याऐवजी तुम्ही तुमच्या शरीराच्या एका भागाला मुकणे अधिक हिताचे होईल.

  22. तेवढ्यात एक नियमशास्त्र शिक्षक येशूंकडे येऊन म्हणाला, “आपण जिथे कुठे जाल, तिथे मी तुमच्यामागे येईन.”

  23. येशूंनी उत्तर दिले, “कोल्ह्यांना बिळे आणि आकाशातील पक्ष्यांना घरटी आहेत, परंतु मानवपुत्राला डोके टेकण्यासही जागा नाही.”

  24. त्यांच्या शिष्यांपैकी दुसर्‍या एकाने म्हटले, “प्रभूजी, प्रथम मला माझ्या वडिलांना पुरावयास जाऊ द्या.”

  25. येशूंनी त्याला म्हटले, “मला अनुसर आणि जे मेलेले आहेत, त्यांना आपल्या मृतांना मूठमाती देऊ दे.”