मुख्य मजकुरावर जा

Select Readings बद्दल बायबलमधील वचने

802 वचने · 47 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आणि त्यांनी योसेफाला त्याच्या सर्व संकटातून सोडविले. परमेश्वराने योसेफाला ज्ञान दिले आणि इजिप्तचा राजा फारोहची त्याच्यावर कृपादृष्टी होईल असे केले. म्हणून फारोहने त्याची इजिप्तवर शासक आणि त्याच्या राजवाड्यातील सर्व कार्यभार पाहण्यासाठी नेमणूक केली.

  2. “तेव्हा इजिप्त आणि कनान देशामध्ये दुष्काळ पडला आणि सर्वठिकाणी हाहाकार माजला, तेव्हा आपल्या पूर्वजांना अन्न मिळेना.

  3. जेव्हा याकोबाने ऐकले की इजिप्त देशामध्ये धान्य आहे, तेव्हा त्याने आपल्या पूर्वजांना प्रथम भेटीसाठी त्या देशात पाठविले.

  4. त्यांच्या दुसर्‍या भेटीच्या वेळी योसेफाने आपण कोण आहोत याची ओळख आपल्या भावांना करून दिली व योसेफाच्या घराण्याविषयी फारोह राजाला सर्वकाही कळले.

  5. यानंतर, योसेफाने त्याचा पिता याकोबाला आणि त्याच्या सर्व कुटुंबीयांनी बोलावून घेतले. ते सर्वजण मिळून पंचाहत्तर लोक होते.

  6. नंतर याकोब खाली इजिप्तमध्ये आला आणि तिथेच तो आणि आपले पूर्वज मरण पावले.

  7. त्यांचे मृतदेह शेखेमात आणण्यात आले व अब्राहामाने हमोराच्या पुत्रांना पैसे देऊन विकत घेतलेल्या कबरेत पुरण्यात आले.

  8. “अब्राहामाला दिलेले परमेश्वराचे वचन पूर्ण करण्याचा काळ जवळ आला, त्यावेळेस इजिप्तमध्ये आपल्या लोकांची संख्या खूपच झपाट्याने वाढलेली होती.

  9. नंतर ‘एक नवीन राजा इजिप्तच्या गादीवर आला. त्याच्या दृष्टीने योसेफ कोणीही नव्हता.’

  10. हा राजा आपल्या लोकांशी दगाबाजीने व निष्ठुरपणाने वागला व त्याने त्यांची नवजात बालके जगू नयेत, म्हणून त्यांना बाहेर फेकण्यास भाग पाडले.

  11. “याच सुमारास मोशेचा जन्म झाला आणि तो असाधारण बालक होता. तीन महिने त्याच्या घरातील लोकांनी त्याची काळजी घेतली,

  12. त्याला बाहेर ठेवले असताना, फारोहच्या कन्येने त्याला घेतले आणि स्वतःचा पुत्र म्हणून त्याचे पालनपोषण करून त्याला वाढवले.

  13. मोशेला इजिप्तमधील सर्व विद्यांचे शिक्षण मिळाले व तो एक प्रभावी वक्ता आणि कृतीतही प्रभावी झाला.

  14. “जेव्हा मोशे चाळीस वर्षाचा झाला, त्यावेळी त्याने आपल्या इस्राएली बांधवांना भेटण्याचे मनात ठरविले.

  15. तिथे त्याने पाहिले की, एका इस्राएली मनुष्यास इजिप्तचा मनुष्य अन्यायाने वागवित आहे, म्हणून मोशेने त्याचे रक्षण करण्यास त्या इजिप्तच्या माणसाची हत्या करून त्याचा सूड घेतला.

  16. मोशेला वाटले की त्याच्या बांधवांस समजेल की परमेश्वर त्यांची सुटका करण्यासाठी त्याचा उपयोग करून घेत आहे, परंतु ते त्यांना समजले नाही.

  17. दुसर्‍या दिवशी मोशेला दोन इस्राएली माणसे एकमेकांशी भांडताना दिसले. त्यांचा समेट करीत तो त्यांना म्हणाला, ‘गृहस्थांनो, तुम्ही भाऊबंद आहात; तुम्ही एकमेकांबरोबर का भांडत आहात?’

  18. “परंतु जो मनुष्य दुसर्‍यावर अन्याय करीत होता, त्याने मोशेला बाजूला होण्यास सांगितले. ‘तुला आमच्यावर अधिकारी व न्यायाधीश कोणी नेमले?

  19. काल जसे तू इजिप्त देशाच्या मनुष्याला मारून टाकलेस, तसे मलाही ठार करणार आहेस काय?’

  20. जेव्हा मोशेने हे ऐकले तेव्हा तो मिद्यानी लोकांच्या देशात पळून गेला व तिथे तो परकीय म्हणून राहिला आणि तिथे त्याला दोन पुत्र झाले.

  21. “चाळीस वर्षे झाल्यानंतर सीनाय पर्वताजवळ असलेल्या जंगलामध्ये एक दूत मोशेला जळत्या ज्वालाच्या झुडूपामधून प्रकट झाला.

  22. मोशेने ते दृश्य पाहिले, तेव्हा त्याने आश्चर्य केले. ते नीट पाहण्याकरिता तो जवळ गेला, तेव्हा त्याने प्रभूची वाणी बोलताना ऐकली:

  23. ‘मी तुझ्या पूर्वजांचा म्हणजे अब्राहाम, इसहाक आणि याकोबाचा परमेश्वर आहे.’ हे ऐकताच मोशे भीतीने कापू लागला आणि त्याला तिथे पाहण्याचे धैर्य झाले नाही.

  24. “मग प्रभूने त्याला म्हटले, ‘तुझी पायतणे काढ, कारण ज्या भूमीवर तू उभा आहेस ती पवित्र भूमी आहे.

  25. इजिप्तमध्ये असलेल्या माझ्या लोकांचे अत्याचार मी खरोखरच पाहिले आहेत. त्यांचे कळवळणे मी ऐकले आहे आणि त्यांना त्यांच्या त्रासातून सोडविण्यासाठी मी खाली आलो आहे. आता ये, मी तुला परत इजिप्तकडे पाठवितो.’