मुख्य मजकुरावर जा

Resurrection बद्दल बायबलमधील वचने

194 वचने · 3 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “त्यांनी उत्तर दिले, ‘नाही, ते तुम्हास व आम्हास पुरणार नाही. तुम्ही तेल विकणार्‍यांकडे जा आणि स्वतःसाठी विकत आणा.’

  2. “त्या तेल विकत आणावयास गेल्या. वाटेत असतानाच, वर आला आणि ज्या कुमारी तयारीत होत्या, त्या वराबरोबर लग्नाच्या मेजवानीस आत गेल्या आणि दरवाजा बंद करण्यात आला.

  3. “काही वेळाने त्या दुसर्‍याही कुमारी आल्या व म्हणू लागल्या, ‘प्रभू, प्रभू, आम्हासाठी दार उघडा!’

  4. “पण वराने उत्तर दिले, ‘मी तुम्हाला खरेच सांगतो, मी तुम्हाला ओळखत नाही.’

  5. “म्हणून तुम्ही जागृत राहा, कारण तो दिवस व ती घटका तुम्हाला माहीत नाही.

  6. आणि कबरा उघडल्या. मृत पावलेल्या अनेक पवित्र लोकांची शरीरे पुन्हा उठविली गेली.

  7. येशूंच्या पुनरुत्थानानंतर ते कबरेच्या बाहेर आले आणि पवित्र शहरात गेले आणि पुष्कळ लोकांनी त्यांना पाहिले.

  8. मग पुनरुत्थान नाही असे म्हणणारे सदूकी, आपला प्रश्न घेऊन त्यांच्याकडे आले.

  9. त्यांनी विचारले, “गुरुजी, मोशेने आपल्यासाठी असे लिहिले आहे की, एखादा मनुष्य मूलबाळ न होता मरण पावला, तर त्याच्या भावाने त्याच्या विधवेशी विवाह करून त्याच्यासाठी संतती वाढवावी.

  10. आता, सात भाऊ होते. त्यातील पहिल्याने लग्न केले परंतु संतती न होता तो मरण पावला.

  11. मग दुसर्‍या भावाने विधवेशी लग्न केले, पण तोही काही मूलबाळ न होताच मरण पावला. तिसर्‍याचेही तसेच झाले.

  12. ते सातही भाऊ मूलबाळ न होता मरण पावले. सर्वांच्या शेवटी ती स्त्री मरण पावली.

  13. आता पुनरुत्थान होईल त्यावेळी ती स्त्री कोणाची पत्नी होईल, कारण त्या सातही जणांनी तिच्याशी विवाह केला होता?”

  14. येशूंनी उत्तर दिले, “तुम्ही चुकत नाहीत काय, कारण ना तुम्ही धर्मशास्त्र जाणता, नाही परमेश्वराचे सामर्थ्य ओळखता?

  15. जेव्हा मृत लोक उठतील, ते विवाह करत नाही किंवा विवाह करूनही देत नाही; तर ते स्वर्गातील देवदूतांप्रमाणे असतील.

  16. पण आता मृतांच्या पुनरुत्थानासंबंधी, मोशेच्या पुस्तकात जळत्या झुडूपांच्या संदर्भात वाचले नाही काय? परमेश्वराने त्याला असे सांगितले, ‘मी अब्राहामाचा परमेश्वर, इसहाकाचा परमेश्वर आणि याकोबाचा परमेश्वर आहे?’

  17. ते मृतांचे नसून जिवंतांचे परमेश्वर आहेत, तुम्ही फार मोठी चूक करत आहात.”

  18. म्हणजे नीतिमानांच्या पुनरुत्थानासमयी, ज्यांना परतफेड करता येत नाही, अशा लोकांना दिल्याबद्दल तुम्हाला आशीर्वाद दिला जाईल.”

  19. पुनरुत्थान नाही असे मानणार्‍या सदूकी लोकांपैकी काहीजण येशूंकडे आले आणि त्यांनी त्यांना विचारले,

  20. “गुरुजी, मोशेने आम्हासाठी असे लिहिले आहे की, एखादा मनुष्य मूलबाळ न होता मरण पावला, तर त्याच्या भावाने त्याच्या विधवेशी विवाह करून त्याच्यासाठी संतती वाढवावी.

  21. आता एका कुटुंबात सात भाऊ होते. त्यातील पहिल्याने लग्न केले पण काही मूलबाळ न होता, तो मरण पावला.

  22. मग दुसर्‍या आणि तिसर्‍यानेही तिच्याशी लग्न केले आणि याप्रमाणे ते सातही भाऊ संतान न होताच मरण पावले.

  23. And the third took her; and in like manner the seven also: and they left no children, and died.

  24. शेवटी ती स्त्री मरण पावली.

  25. आता पुनरुत्थान होईल त्यावेळी ती स्त्री कोणाची पत्नी होईल, कारण त्या सातही जणांनी तिच्याशी लग्न केले होते?”