Skip to content

Resurrection बद्दल बायबलमधील वचने: General references

187 वचने · 3 पैलू

General references बद्दल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तसा मनुष्य पडल्यावर पुन्हा उठत नाही; आकाश नाहीसे होईपर्यंत लोक पुन्हा उठणार नाहीत, ते झोपेतून जागे केले जाणार नाहीत.

  2. “तुम्ही केवळ मला कबरेमध्ये लपविले असते तुमचा क्रोध संपेपर्यंत मला गुप्त ठेवले असते! आपण माझ्यासाठी समय नेमून ठेवावा आणि मग माझी आठवण करावी!

  3. जर कोणी मेला तर पुन्हा जिवंत होईल का? माझ्या सर्व कठीण श्रमाच्‍या दिवसात माझ्या सुटकेची मी वाट पाहीन.

  4. मग तुम्ही मला आवाज द्याल आणि मी तुम्हाला उत्तर देईन; आपली हस्तकृती पुन्हा पाहावी असे तुम्हाला वाटेल.

  5. मला ठाऊक आहे की माझा उद्धारक जिवंत आहे, आणि अखेरीस ते पृथ्वीवर उभे राहील;

  6. आणि हे शरीर कुजून गेल्यानंतरही, आपल्या देहाशिवाय मी परमेश्वराला पाहीन;

  7. होय, मी स्वतः त्यांना पाहीन दुसरा कोणी नाही; तर मी स्वतःच्या डोळ्यांनी मी त्यांना पाहीन. त्यासाठी माझ्या हृदयात मी किती उतावळा झालो आहे!

  8. यास्तव माझे अंतःकरण उल्हासित आहे आणि माझी जीभ स्तुतिगान करीत आहे; माझे शरीर देखील सुरक्षिततेत विसावा घेईल.

  9. कारण तुम्ही मला अधोलोकात राहू देणार नाही; किंवा तुमच्या विश्वासणार्‍याला तुम्ही कुजणे पाहू देणार नाही.

  10. मी तर नीतिमत्वामुळे तुमच्या मुखाचे दर्शन करणार; मी जागा होईन, तेव्हा तुमच्या दर्शनाने माझे पूर्ण समाधान होईल.

  11. परंतु परमेश्वर मला मृत्यूच्या सामर्थ्यापासून सोडवतील आणि माझा स्वीकार करतील. सेला

  12. सर्वकाळासाठी ते मृत्यूला गिळून टाकतील. सार्वभौम याहवेह सर्वांच्या चेहऱ्यावरील अश्रू पुसून टाकतील; ते त्यांच्या लोकांची अप्रतिष्ठा सर्व पृथ्वीवरून काढून टाकतील. याहवेह असे बोलले आहेत.

  13. याहवेह, परंतु तुमचे मेलेले जगतील; त्यांची शरीरे उठतील— जे धुळीमध्ये पडून राहतात त्यांना जागे होऊ द्या आणि हर्षनाद करू द्या— तुमचे दव प्रातःकाळच्या दवासारखे आहे; पृथ्वी तिच्या मृत लोकांना जन्म देईल.

  14. याहवेहचा हात माझ्यावर होता आणि त्यांनी मला याहवेहच्या आत्म्याच्या द्वारे बाहेर आणले आणि खोर्‍याच्या मधोमध ठेवले; ते हाडांनी भरलेले होते.

  15. त्याने मला त्यातून चहूकडून फिरविले आणि मी पाहिले की खोर्‍याच्या भूमीवर पुष्कळ हाडे होती, ती हाडे तर शुष्क होती.

  16. याहवेहने मला विचारले, “मानवपुत्रा, ही हाडे जिवंत होतील काय?” मी म्हणालो, “सार्वभौम याहवेह, ते तर केवळ तुम्हीच जाणता.”

  17. तेव्हा याहवेहने मला म्हटले, “या हाडांना भविष्यवाणी करून त्यांना सांग, ‘शुष्क हाडांनो, याहवेहचे वचन ऐका!

  18. या हाडांना सार्वभौम याहवेह म्हणतात: मी तुमच्यात श्वास घालेन आणि तुम्ही जिवंत व्हाल.

  19. मी तुम्हावर स्नायू लावेन आणि तुम्हावर मांस चढवेन आणि तुम्हाला कातडीने आच्छादेन; मी तुम्हामध्ये श्वास घालेन आणि तुम्ही जिवंत व्हाल. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.’ ”

  20. तेव्हा मला आज्ञा झाल्याप्रमाणे मी भविष्यवाणी केली. आणि मी भविष्यवाणी करीत असता, मोठा आवाज, खडखडाट झाला, तेव्हा एक हाड दुसऱ्या हाडाशी, अशी हाडे एकत्र जडली.

  21. तेव्हा मी पाहिले, स्नायू आणि मांस त्यांच्यावर आले आणि कातडीने त्यांना आच्छादले, पण त्यांच्यात श्वास नव्हता.

  22. तेव्हा याहवेहने मला म्हटले, “श्वासाला भविष्य करून सांग; मानवपुत्रा, भविष्यवाणी कर आणि त्याला सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: हे श्वासा, चारही बाजूंनी ये आणि या वधलेल्यांवर फुंकर घाल, म्हणजे ते जिवंत होतील.’ ”

  23. याहवेहने मला आज्ञा केल्याप्रमाणे मी भविष्यवाणी केली आणि श्वास त्यांच्यात आला; ते जिवंत झाले आणि एक मोठे सैन्य त्यांच्या पायांवर उभे राहिले.

  24. तेव्हा याहवेहने मला म्हटले: “मानवपुत्रा, ही हाडे म्हणजे इस्राएली लोक आहेत. ते म्हणतात, ‘आमची हाडे शुष्क झाली आहेत आणि आमची आशा नाहीशी झाली आहे; आम्ही नाश पावलो आहोत.’

  25. यास्तव भविष्यवाणी कर आणि त्यांना सांग: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: माझ्या लोकांनो मी तुमच्या कबरा उघडून त्यातून तुम्हाला बाहेर काढणार आहे; मी तुम्हाला इस्राएल देशात परत आणेन.