मुख्य मजकुरावर जा

Resurrection बद्दल बायबलमधील वचने: Figurative of regeneration

6 वचने · 3 पैलू

Figurative of regeneration बद्दल वचने

  1. यास्तव बाप्तिस्म्याद्वारे मरणाने आपण ख्रिस्ताबरोबर पुरले गेलो यासाठी की, ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवी शक्तीने मरणातून उठविले गेले, त्याचप्रमाणे आपणही पूर्णतः नवीन जीवन जगावे.

  2. तुम्ही स्वतःच्या पातकांमध्ये व अपराधांमध्ये मृत झालेले होता.

  3. आपण आपल्या अपराधांमध्ये मृत झालो असताना त्यांनी ख्रिस्तामध्ये आपणास जिवंत केले व कृपेनेच तुमचे तारण झाले आहे.

  4. आणि परमेश्वराने आपल्याला ख्रिस्त येशूंमध्ये उठवून स्वर्गीय राज्यात त्यांच्याबरोबर बसविले आहे.

  5. कारण तुम्ही बाप्तिस्म्यामध्ये त्यांच्यासह पुरला गेलात व ज्यांना त्यांनी मरणातून उठविले यांच्याबरोबर तुम्हीही परमेश्वराच्या कृतीवरील विश्वासाद्वारे उठविण्यात आले आहात.

  6. यास्तव, ख्रिस्ताबरोबर तुम्ही उठविले गेला आहात, तर जिथे ख्रिस्त परमेश्वराच्या उजवीकडे बसले आहे, तेथील वरील गोष्टींकडे आपली मने लावा.