Skip to content

Resurrection बद्दल बायबलमधील वचने

194 वचने · 3 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जेव्हा मी तुमच्या कबरा उघडेन आणि त्यातून तुम्हाला बाहेर आणेन तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.

  2. मी माझा आत्मा तुमच्यात घालेन आणि तुम्ही जिवंत व्हाल आणि मी तुम्हाला तुमच्या देशात स्थायिक करेन. तेव्हा तुम्ही जाणाल की मी याहवेह जे बोललो आहे, तेच मी केले आहे, असे याहवेह जाहीर करतात.’ ”

  3. पृथ्वीच्या धुळीत झोपलेले बरेच लोक जागे होतील: काहीजण सर्वकाळच्या जीवनासाठी तर काही निर्लज्जता व सर्वकाळच्या अपमानासाठी उठतील.

  4. जे सुज्ञ आहेत ते आकाशातील प्रकाशासारखे प्रज्वलित होतील. तसेच अनेकांना नीतिमार्गाकडे वळवणारे सदासर्वकाळ तार्‍यांप्रमाणे चकाकतील.

  5. “आता तू शेवटपर्यंत तुझ्या मार्गाने जा. तू विसावा घेशील आणि तुझ्यासाठी राखून ठेवण्यात आलेले तुझे संपूर्ण वतन घेण्यासाठी तू पुन्हा उठशील.”

  6. “मी या लोकांना कबरेच्या सामर्थ्यापासून सुटका देईन; मी त्यांना मृत्यूपासून वाचवेन. अरे मरणा, तुझ्या पीडा कुठे आहे? हे कबरे, तुझा नाश कुठे आहे? “मला काहीही कळवळा येणार नाही,

  7. त्याच दिवशी, पुनरुत्थान नाही असे म्हणणारे सदूकी त्यांच्याकडे आले व प्रश्न करू लागले.

  8. “गुरुजी, मोशेने आम्हाला सांगितले आहे की, एखादा मनुष्य, मूल न होता मरण पावला, तर त्याच्या भावाने त्याच्या विधवेशी लग्न करून त्याच्यासाठी संतती वाढवावी.

  9. आता सात भाऊ होते. त्यातील पहिल्याने लग्न केले, पण एकही मूल न होता तो मरण पावला. तेव्हा त्याची विधवा त्याच्या धाकट्या भावाची पत्नी झाली.

  10. पण हीच गोष्ट दुसर्‍या व तिसर्‍या भावापासून सातव्या भावापर्यंत झाली.

  11. सर्वात शेवटी ती स्त्री मरण पावली.

  12. जेव्हा, पुनरुत्थान होईल तेव्हा ती कोणाची पत्नी होईल, कारण त्या सातही जणांनी तिच्याशी लग्न केले होते?”

  13. येशूंनी उत्तर दिले, “तुम्ही चुकत आहात, कारण ना तुम्ही धर्मशास्त्र जाणता, ना परमेश्वराचे सामर्थ्य ओळखता.

  14. पुनरुत्थानामध्ये लग्न करत नाही किंवा लग्न करूनही देत नाही; तर ते स्वर्गातील देवदूतांप्रमाणे असतील.

  15. पण आता मृतांच्या पुनरुत्थाना संदर्भात परमेश्वर तुमच्याशी काय बोलत आहे हे तुम्ही वाचले नाही काय?

  16. ‘मी अब्राहामाचा परमेश्वर, इसहाकाचा परमेश्वर आणि याकोबाचा परमेश्वर आहे,’ तो मृतांचा परमेश्वर नसून जिवंतांचा आहे.”

  17. तो कर्ण्यांच्या महानादाबरोबर आकाशांच्या या टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत आणि चारही दिशेकडून त्याच्या निवडलेल्या लोकांना एकत्र करण्यासाठी आपल्या दूतांस पाठवेल.

  18. “त्यावेळी स्वर्गाचे राज्य, आपआपले दिवे घेऊन वराला सामोर्‍या जाणार्‍या दहा कुमारींसारखे होईल.

  19. त्यांच्यापैकी पाच मूर्ख होत्या व पाच शहाण्या होत्या.

  20. मूर्ख कुमारींनी दिव्यांबरोबर आपले तेल घेतले नाही.

  21. शहाण्यांनी मात्र दिव्यांबरोबरच आपआपल्या कुपीत तेलही घेतले.

  22. वराला येण्यास उशीर लागला म्हणून सर्वांना डुलक्या लागल्या व त्या झोपी गेल्या.

  23. “मध्यरात्री, ‘वर येत आहे; त्याच्या स्वागतासाठी बाहेर यावे!’ अशी हाक त्यांच्या कानी आली.

  24. “मग सर्व कुमारी गडबडीने उठल्या आणि त्यांनी दिवे तयार केले.

  25. मूर्ख कुमारी शहाण्या कुमारींना म्हणाल्या, ‘तुमच्या तेलामधून आम्हाला थोडे द्या; कारण आमचे दिवे विझू लागले आहेत.’