मुख्य मजकुरावर जा

Resurrection बद्दल बायबलमधील वचने

194 वचने · 3 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तेव्हा एपिकूरपंथी व स्तोयिकपंथी यांच्यातील काही तत्वज्ञानी लोक त्याच्याशी वाद घालू लागले. त्यांच्यापैकी काहीजण म्हणाले, “हा बडबड्या काय सांगण्याचा प्रयत्न करीत आहे?” इतर म्हणाले, “हा परक्या परमेश्वराचा प्रचारक दिसतो.” ते असे बोलत, कारण पौल येशू व पुनरुत्थान या विषयीच्या शुभवार्तेचा प्रचार करीत होता.

  2. मरण पावलेल्यांच्या पुनरुत्थानाबद्दल पौल बोलला, तेव्हा ऐकणार्‍यांपैकी काहींनी टोमणे मारले, परंतु इतर म्हणाले, “आम्हाला याविषयी पुढे कधी तरी ऐकावयास आवडेल.”

  3. नंतर पौलाला, समजले की तिथे उपस्थित असलेल्या लोकांमध्ये काही सदूकी आहेत आणि इतर परूशी आहेत, तेव्हा पौल न्यायसभेच्या समोर म्हणाला, “बंधूंनो, माझे पूर्वज परूशी होते, त्यांच्याप्रमाणे मी परूशी आहे आणि माझी आशा व मृतांचे पुनरुत्थान यामुळे माझी चौकशी होत आहे.”

  4. कारण सदूकी लोक म्हणत की पुनरुत्थान नाही, देवदूत नाहीत आणि आत्मेही नाहीत, परंतु परूश्यांचा या सर्वांवर विश्वास होता.

  5. तरी एक गोष्ट कबूल करतो की मी आपल्या पूर्वजांच्या परमेश्वराची उपासना करतो व त्या मार्गाचा अनुयायी आहे ज्याला हे लोक पंथ असे म्हणतात. त्याबरोबरच जे नियमशास्त्राला धरून आहे त्या प्रत्येक गोष्‍टीवर व संदेष्ट्यांच्या लिखाणात जे लिहिले आहे, त्या प्रत्येक वचनावर माझा विश्वास आहे,

  6. परमेश्वरामध्ये या लोकांची जी आशा आहे तीच माझीसुद्धा आहे, ती ही की नीतिमान व अनीतिमान या दोघांचेही पुनरुत्थान होईल.

  7. परमेश्वराने आपल्या पूर्वजांना दिलेल्या अभिवचनांवर माझी आशा आहे म्हणून माझी आज चौकशी होत आहे व मी येथे उभा आहे.

  8. आमचे बारा वंश अभिवचन पूर्ण होण्याची आशा बाळगत परमेश्वराची सेवा मनःपूर्वक रात्रंदिवस करीत आहेत. तरी महाराज अग्रिप्पा, त्याच आशेमुळे मजवर यहूद्यांनी आरोप ठेवला आहे.

  9. परंतु मृतांचे पुनरुत्थान हे तुम्हापैकी कोणालाही अविश्वसनीय का वाटावे?

  10. यास्तव, अभिवचन विश्वासाच्याद्वारे कृपा म्हणून अब्राहामाच्या सर्व वंशजाला मिळते. जे केवळ नियमांच्या अधीन आहेत त्यांनाच नव्हे, तर ज्यांचा विश्वास अब्राहामाच्या विश्वासासारखा आहे त्या सर्वांना, कारण अब्राहाम आपल्या सर्वांचा पिता आहे.

  11. असे लिहिले आहे: “मी तुला अनेक राष्ट्रांचा पिता केले.” परमेश्वराच्या दृष्टीने अब्राहाम आमचा पिता आहे, ज्यावर त्याने विश्वास ठेवला, जो परमेश्वर मेलेल्यांना जीवन देतो आणि ज्यागोष्टी नाही त्या गोष्टी अस्तित्वात याव्या अशी आज्ञा देतो.

  12. आशा धरण्यास काही आधार नसताना, अब्राहामाने आशेने विश्वास ठेवला व तो अनेक राष्ट्रांचा पिता झाला, आणि “तुझी संततीही होईल.” असे त्याला सांगण्यात आले होते त्याचप्रमाणे झाले.

  13. त्याचे शरीर जणू काही मृत अवस्थेत असताना—तो अंदाजे शंभर वर्षाचा होता—व साराहचे गर्भाशय मृत झालेले असताना, त्याने आपला विश्वास डळमळू दिला नाही

  14. परमेश्वराच्या अभिवचनाबद्दल अब्राहाम कधीही अविश्वासाने डळमळला नाही, परंतु विश्वासामध्ये दृढ झाला आणि त्याने परमेश्वराला गौरव दिले.

  15. अभिवचन दिल्याप्रमाणे परमेश्वर करावयास समर्थ आहे ही त्याची पूर्ण खात्री होती.

  16. यास्तव बाप्तिस्म्याद्वारे मरणाने आपण ख्रिस्ताबरोबर पुरले गेलो यासाठी की, ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवी शक्तीने मरणातून उठविले गेले, त्याचप्रमाणे आपणही पूर्णतः नवीन जीवन जगावे.

  17. जर ख्रिस्त तुम्हामध्ये आहे, आणि पापामुळे तुमचे शरीर मरण पावले; पण नीतिमत्वामुळे तुमचा आत्मा जिवंत राहील.

  18. आणि ज्यांनी येशूंना मेलेल्यातून उठविले, त्यांचा आत्मा जर तुम्हामध्ये वास करीत असेल, तर ज्यांनी ख्रिस्ताला मरणातून उठविले ते तुमच्यामध्ये राहत असणार्‍या त्याच पवित्र आत्म्याद्वारे तुमची मर्त्य शरीरे जिवंत करतील.

  19. कारण परमेश्वर आपल्या लेकरांना प्रकट करेल, त्या दिवसाची अखिल सृष्टी वाट पाहत आहे.

  20. यासाठी की स्वतः सृष्टी विनाशाच्या दास्यत्वातून मोकळी होईल आणि परमेश्वराच्या मुलांना मिळणार्‍या स्वतंत्रेत व गौरवात सहभागी होईल.

  21. कारण आपल्याला ठाऊक आहे की संपूर्ण सृष्टी प्रसूती वेदनांच्या क्लेशांप्रमाणे आतापर्यंत कण्हत आहे.

  22. ज्या आपणाला आत्म्याचे प्रथमफळ मिळाले आहे, ते आपणही कण्हत आहोत, आपण देखील त्या परमेश्वराची दत्तक मुले म्हणून आपल्या शरीराचा उद्धार होईल त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहोत,

  23. ज्याप्रमाणे प्रभूला परमेश्वराने आपल्या शक्तीने मरणातून उठविले, त्याप्रमाणेच तो आपल्यालाही उठवेल.

  24. परंतु जर ख्रिस्त मरणातून पुन्हा उठविले गेले असा आम्ही प्रचार करतो, तर मग मेलेल्यांचे पुनरुत्थान होणार नाही, असे तुमच्यापैकी काहीजण का म्हणतात?

  25. जर मेलेल्यांचे पुनरुत्थान होत नाही, तर ख्रिस्तही अजून उठविले गेले नाही.