मुख्य मजकुरावर जा

Red Sea बद्दल बायबलमधील वचने

47 वचने · 6 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. शलोमोन राजाने एदोम देशात तांबड्या समुद्रतीरी एलोथजवळ एजिओन-गेबेर येथे सुद्धा गलबते बांधली.

  2. “इजिप्तमध्ये आमच्या पूर्वजांच्या हालअपेष्टा तुम्ही पाहिल्या; तांबड्या समुद्राच्या जवळ त्यांनी केलेला तुमचा धावा तुम्ही ऐकला.

  3. फारोह व त्याच्या अधिकाऱ्याविरुद्ध व त्याच्या प्रदेशातील सर्व लोकांविरुद्ध तुम्ही चिन्ह व चमत्कार केले, कारण ते लोक त्यांना किती कठोरपणाची वागणूक देत होते, हे तुम्हाला ठाऊक होते. तुमच्या नावाचा महिमा तुम्ही प्रकट केला आणि तो आजवर आहे.

  4. तुम्ही त्यांच्यासमोर समुद्र दुभागला, म्हणजे त्यांनी कोरड्या जमिनीवरून चालत जावे. परंतु त्यांचा पाठलाग करणार्‍यांना असे खोलात फेकले, जणू प्रचंड जलाशयात एखादा दगड फेकला जावा.

  5. त्यांनी समुद्रात त्यांच्यासाठी कोरडी भूमी तयार केली; ते जलातून पायी पलीकडे गेले— यास्तव त्यांच्यामध्ये आपण हर्ष करू या.

  6. परमेश्वराने समुद्र दुभागला आणि त्यातून त्यांना पार नेले; त्यांच्या दोन्ही बाजूंना पाणी भिंतीसारखे उभे राहिले.

  7. त्यांनीच त्यांचे सुरक्षित मार्गदर्शन केले, म्हणून ते भयभीत झाले नाहीत; परंतु त्यांच्या शत्रूंना मात्र समुद्रात बुडवून टाकले.

  8. जेव्हा ते इजिप्तमध्ये होते, तेव्हा तुम्ही केलेल्या अद्भुत चमत्कारांकडे त्यांनी लक्ष दिले नाही; तुम्ही केलेली अनेक दयाळूपणाची कृत्ये ते विसरले; उलट, तांबड्या समुद्राकाठी त्यांनी तुमच्याविरुद्ध बंड केले.

  9. तरीसुद्धा आपल्या नामासाठी, आपले सामर्थ्य प्रगट करण्यासाठी परमेश्वराने त्यांचे तारण केले.

  10. तांबड्या समुद्राला दरडावताच तो कोरडा झाला; वाळवंटातून चालत असल्यासारखे त्यांना खोल समुद्रातून चालविले.

  11. त्यांना त्यांच्या शत्रूपासून सोडविले; शत्रूंच्या अधिकारातून त्यांची सुटका केली.

  12. त्यांच्या शत्रूंना जलसमाधी मिळाली; त्यापैकी एकजणही वाचला नाही.

  13. हामच्या भूमीत आश्चर्यकर्म केले, आणि तांबड्या समुद्राकाठी चमत्कार केले.

  14. तांबडा समुद्र दुभागला, त्यांची करुणा सनातन आहे.

  15. आणि इस्राएली लोकांना त्यामधून सुखरुपपणे पार नेले, त्यांची करुणा सनातन आहे.

  16. परंतु फारोह आणि त्याचे सैन्य तांबड्या समुद्रात बुडवून टाकले; त्यांची करुणा सनातन आहे.

  17. याहवेह असे म्हणतात— ज्यांनी समुद्रातून मार्ग काढला, महासागरामधून रस्ता तयार केला,

  18. ज्यांनी इजिप्तच्या सैन्याला व त्याच्या रथांसह व घोड्यांसह व त्यांच्या मजबूतीच्या ज्यादा कुमकीसह बुडविले, तेव्हा तेवत्या वाती मालवाव्या तशा, त्यांच्या प्राणज्योती अशा मालविल्या, कि ते परत कधीही न उठण्यासाठी तिथेच गारद झाले:

  19. आणि अनेक अद्भुत कृत्ये व चिन्हे करून त्याने त्यांना इजिप्त देशामधून, तांबड्या समुद्रातून आणि चाळीस वर्षे रानातून बाहेर काढले.

  20. बंधू व भगिनींनो, आपल्या पूर्वजांनी मेघाखाली कूच केली. ते सर्वजण समुद्रातूनही पार गेले, याबद्दल आपण अज्ञानी असू नये.

  21. मेघात आणि समुद्रात त्यांचा व मोशेमध्ये बाप्तिस्मा झाला.

  22. विश्वासाद्वारे इस्राएली लोक तांबड्या समुद्रातून कोरड्या जमिनीवरून चालत गेले. त्यांचा पाठलाग करणार्‍या इजिप्तच्या लोकांनी तसेच करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते सर्व बुडून मेले.