मुख्य मजकुरावर जा

Red Sea बद्दल बायबलमधील वचने: Israelites camp by

10 वचने · 6 पैलू

"Red Sea" साठी शोधा

Israelites camp by बद्दल वचने

  1. “इस्राएली लोकांस सांग मागे फिरा आणि पी-हाहीरोथ जवळ, मिग्दोल व समुद्र यांच्यामध्ये, समुद्राजवळ तळ द्या, जो थेट बआल-सफोनासमोर आहे.

  2. इजिप्तच्या लोकांनी—फारोहचे सर्व घोडे व रथ, घोडेस्वार व सैन्य यांच्यासह—इस्राएली लोकांचा पाठलाग केला आणि बआल-सफोनासमोर असलेल्या पी-हाहीरोथ, जिथे ते तळ देऊन होते तिथे त्यांना गाठले.

  3. अमालेकी व कनानी लोक खोर्‍यामध्ये राहतात म्हणून, उद्या तुम्ही माघारी फिरा आणि तांबड्या समुद्राच्या वाटेने जा.”

  4. नंतर इस्राएली लोक होर पर्वताकडून प्रवास करीत एदोमाला वळसा घालून तांबड्या समुद्राच्या वाटेने प्रवास करीत निघाले; परंतु लोक वाटेतच अधीर झाले;

  5. त्यांनी एलीम सोडले व तांबड्या समुद्राजवळ तळ दिला.

  6. त्यांनी तांबडा समुद्र सोडून सीनच्या रानात तळ दिला.

  7. परंतु तुम्ही मागे वळून वाळवंटातून तांबड्या समुद्राच्या वाटेने कूच करावे.”

  8. नंतर आम्ही मागे वळून अरण्यामधून तांबड्या समुद्राकडे निघालो, कारण याहवेहनी मला तशी आज्ञा दिली होती आणि अनेक वर्षे आम्ही सेईर पर्वताच्या सभोवतालच्या प्रदेशात भ्रमण करीत राहिलो.

  9. मग याहवेह मला म्हणाले,

  10. “तुम्ही या पर्वताच्या सभोवती दीर्घकाल राहिला आहात, तर आता उत्तरेकडे वळा.