- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Rebellion Against God बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञा पाळल्या व त्यांच्या मार्गात चालला तर ते तुम्हाला त्यांच्या शपथेनुसार, त्यांचे पवित्र लोक म्हणून प्रतिष्ठित करतील.
मग पृथ्वीवरील सर्व लोक पाहतील की तुम्हाला याहवेहच्या नावाने संबोधित करण्यात येते, ती तुम्हाला भिऊ लागतील.
याहवेह तुम्हाला अत्यंत संपन्न करतील—तुमची संतती, तुमच्या गुरांची पिल्ले आणि तुमच्या भूमीतील उपज—जसे त्यांनी तुमच्या पूर्वजांना वचन दिले होते.
प्रत्येक ॠतूत उत्तम पिके मिळावीत यासाठी याहवेह त्यांच्या आकाशातील अद्भुत असे पावसाचे भांडार तुम्हासाठी उघडतील व तुम्ही हाती घ्याल ती प्रत्येक गोष्ट ते आशीर्वादित करतील. अनेक राष्ट्रांना तुम्ही उसने द्याल, पण तुम्हाला उसने कधीही घ्यावे लागणार नाही.
याहवेह तुम्हाला मस्तक करतील, शेपूट नव्हे. मी तुम्हाला आज देत असलेल्या याहवेह तुमच्या परमेश्वराच्या सर्व आज्ञा जर तुम्ही प्रामाणिकपणे पाळल्या, तर तुम्ही सतत उच्चस्थानी राहाल व कधीही खाली राहणार नाही.
कारण तुम्ही किती बंडखोर आणि ताठ मानेचे आहात हे मला माहीत आहे. मी तुम्हाबरोबर असताना, तुम्ही जर याहवेहविरुद्ध बंडखोरी करीत आहात, तर माझ्या मृत्यूनंतर तुम्ही किती अधिक बंडखोरी कराल!
जो कोणी तुझ्या शब्दाविरुद्ध बंड करेल आणि त्याचे पालन करणार नाही, त्याला मरणदंड दिला जाईल. फक्त खंबीर हो आणि धैर्यवान हो!”
“याहवेहची सर्व मंडळी असे म्हणते: ‘इस्राएलच्या परमेश्वराचा विश्वासघात तुम्ही कसा करू शकता? याहवेहविरुद्ध बंड करून तुम्ही स्वतःच वेदी बांधून त्यांच्यापासून दूर कसे जाऊ शकता?
पेओराचे पाप आमच्यासाठी पुरेसे नव्हते काय? याहवेहच्या समाजावर मरी पडली त्या पातकापासून आजपर्यंत आम्ही शुद्ध झालेलो नाही.
आणि आता तुम्ही याहवेहपासून दूर जात आहात काय? “ ‘जर तुम्ही आज याहवेहविरुद्ध बंड केले तर उद्या संपूर्ण इस्राएली समाजाविरुद्ध याहवेहचा राग पेटेल.
जर तुमच्या मालकीची जमीन अशुद्ध असेल, तर याहवेहच्या भूमीकडे या, ज्या ठिकाणी याहवेहचा निवासमंडप उभा आहे आणि ती भूमी आमच्याबरोबर वाटून घ्या. परंतु याहवेह आपल्या परमेश्वराच्या वेदीखेरीज आपल्यासाठी वेदी बांधून याहवेहविरुद्ध किंवा आमच्याविरुद्ध बंड करू नका.
“याहवेहच्या विरुद्ध बंड करणे आणि त्यांच्या निवासमंडपासमोर उभ्या असलेल्या याहवेह आपल्या परमेश्वराची होमवेदी सोडून धान्यार्पण आणि यज्ञांसाठी दुसरी वेदी बांधून त्यांच्यापासून दूर जाणे हे आमच्याकडून कधी ना होवो.”
तेव्हा याहवेहने शमुवेलला सांगितले: “लोक तुला जे सांगत आहेत ते सगळे ऐक; त्यांनी तुझा नकार नाही तर त्यांचा राजा म्हणून त्यांनी माझा नकार केला आहे.
जर तुम्ही याहवेहचे भय धरून त्यांची सेवा कराल, त्यांचे आज्ञापालन कराल आणि त्यांच्या आदेशांविरुद्ध बंड करणार नाही आणि तुमच्यावर राज्य करतो तो तुमचा राजा व तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराचे अनुसरण कराल, तर बरे!
परंतु जर तुम्ही याहवेहचे ऐकणार नाही, आणि त्यांच्या आदेशांविरुद्ध बंड कराल, तर याहवेहचा हात जसा तुमच्या पूर्वजांच्या विरुद्ध होता, तसाच तुमच्याही विरोधात जाईल.
परंतु शौलाने व त्याच्या सैन्याने अगाग राजाला जिवंत ठेवले, तसेच उत्तम मेंढरे, गुरे, पुष्ट वासरे व कोकरे; व सर्वकाही जे चांगले होते त्यांचा नाश करावा असे त्यांना वाटले नाही, म्हणून त्यांनी ते राखून ठेवले. मात्र जे टाकाऊ व कुचकामी होते त्यांचा त्यांनी नाश केला.
कारण बंडखोरी ही शकुनविद्येच्या पापासारखी आहे, आणि हट्टीपणा मूर्तिपूजेसारखा वाईट आहे. तू याहवेहचे वचन धिक्कारले यामुळे, त्यांनी तुला राजा म्हणून धिक्कारले आहे.”
आपल्याबरोबरच्या लोकांचा सल्ला घेतल्यानंतर, राजाने दोन सोन्याची वासरे बनविली. तो लोकांना म्हणाला, “तुम्ही वर यरुशलेमकडे जाणे तुम्हाला अतिशय कठीण आहे, हे इस्राएला, ही पाहा तुमची दैवते, ज्यांनी तुम्हाला इजिप्तमधून बाहेर आणले.”
एक वासरू त्याने बेथेलमध्ये व दुसरे दानमध्ये प्रतिष्ठापीत केले.
आणि ही बाब पाप अशी झाली; एका वासराची उपासना करण्यासाठी काही लोक बेथेलात येत होते आणि दुसर्या वासराची उपासना करण्यासाठी काही दूर दानपर्यंत गेले.
यरोबोअमने उच्च स्थानावर मंदिरे बांधली आणि जरी ते लेवी घराण्यातील नव्हते, प्रत्येक प्रकारच्या लोकांमधून याजक नेमले.
आठव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी, जसा यहूदीयामध्ये पाळला जात असे तसेच त्याने एका सणाची स्थापना केली. आणि वेदीवर यज्ञार्पणे केली. बेथेलमध्ये बनविलेल्या वासरांसाठी अर्पणे त्याने केली. बेथेलमध्ये यरोबोअमने बनविलेल्या पूजास्थानांवर सुद्धा त्याने याजक नेमले.
आठव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी, त्याने स्वतःच निवडलेल्या महिन्यात, त्याने बेथेलमध्ये बांधलेल्या वेदीवर यज्ञार्पणे केली. त्याने इस्राएली लोकांसाठी सण स्थापित करून वरती वेदीवर जाऊन अर्पणे सादर केली.
ज्याने त्याला परमेश्वराच्या नावाने शपथ घ्यायला लावली होती, त्या बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरविरुद्धही त्याने बंड केले. तो ताठ मानेचा झाला आणि त्याने त्याचे हृदय कठोर केले आणि याहवेह इस्राएलचे परमेश्वर यांच्याकडे तो वळला नाही.
त्यांनी तुमचे ऐकण्याचे नाकारले आणि तुम्ही त्यांच्यामध्ये केलेल्या चमत्कारांची आठवण ठेवली नाही. उलट त्यांनी बंडखोरी केली आणि परत गुलामगिरीत आपल्याला न्यावे म्हणून एक पुढारी नेमला. पण तुम्ही क्षमाशील परमेश्वर आहात, दयाळू आणि कृपाळू, मंदक्रोध व प्रेमाने ओतप्रोत भरलेले आहात. तुम्ही त्यांचा त्याग केला नाही,