मुख्य मजकुरावर जा

Rebellion Against God बद्दल बायबलमधील वचने

148 वचने · 63 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मी तुमची राष्ट्रांमध्ये पांगापांग करेन आणि मी माझी तलवार उगारून तुमच्या पाठीस लागेन. तुमचा देश उजाड होईल आणि तुमच्या शहरांचा नाश होईल.

  2. जेव्हा तुम्ही शत्रूंच्या देशात असाल, तुमचा देश उजाड होईल; तेव्हा भूमीला विश्रांती मिळेल व भूमी तिच्या शब्बाथ वर्षांचा संपूर्ण वेळ आनंद करेल.

  3. अनेक वर्षे ती उजाड होती, तुम्ही तिथे राहत असताना शब्बाथाच्या काळामध्ये तिला विश्रांती मिळाली नाही म्हणून ती आता विश्रांती घेईल.

  4. “ ‘तुमच्यातील जे उर्वरित राहतील, त्यांच्या शत्रूंच्या देशात मी त्यांची अंतःकरणे इतकी भयभीत करेन, की वार्‍याने उडून जाणार्‍या पानांचा आवाजसुद्धा त्यांना असा पळ काढावयास लावील की जणू एखादा तलवार घेऊन त्यांच्या पाठीशी लागला आहे आणि कोणीही त्यांचा पाठलाग करत नसले तरी ते पडतील.

  5. कोणी पाठलाग करीत नसतानाही तलवार पाठीस लागल्याप्रमाणे अडखळून एकमेकांवर पडतील. त्यामुळे तुम्ही तुमच्या शत्रूंसमोर उभे राहू शकणार नाही.

  6. तुम्ही राष्ट्रांत पांगून नाश पावाल; तुमच्या शत्रूंचा देश तुम्हाला गिळून टाकील.

  7. तुमच्यापैकी जे शिल्लक राहतील ते तुमच्या शत्रूंच्या देशात त्यांच्या पापांमुळे नष्ट होतील; आणि ते त्यांच्या पूर्वजांच्या पापांमुळे नष्ट होतील.

  8. मात्र याहवेहविरुद्ध बंड करू नका. आणि तेथील लोकांचे भय बाळगू नका, कारण आम्ही त्यांना नष्ट करणार. त्यांचे संरक्षण नाहीसे झाले आहे, परंतु याहवेह आमच्याबरोबर आहेत. त्यांचे भय बाळगू नका.”

  9. तू व तुझे सर्व अनुयायी असे एकत्र आला ते याहवेहच्या विरोधात आहे. अहरोन कोण आहे की तुम्ही त्याच्या विरोधात कुरकुर करावी?”

  10. परंतु याहवेहने चमत्कार केला आणि या भूमीने आपले तोंड उघडून या लोकांना त्यांच्या सर्व मालमत्तेसह जिवंतपणे अधोलोकात गिळून टाकले, तर या लोकांनी याहवेहला तुच्छ मानले आहे, हे तुम्हाला समजून येईल.”

  11. लोक मोशेशी भांडण करीत म्हणाले, “याहवेहसमोर आमचे भाऊबंद जेव्हा मरून पडले, तेव्हाच आम्हीही मेलो असतो तर बरे होते!

  12. मोशे आणि अहरोन यांनी मंडळीला खडकासमोर एकत्र केले व मोशे त्यांना म्हणाला, “अहो, बंडखोरांनो, तुम्ही ऐका, या खडकातून आम्ही तुमच्यासाठी पाणी काढावे काय?”

  13. परंतु याहवेह मोशे आणि अहरोन यांना म्हणाले, “कारण इस्राएली लोकांच्या दृष्टीत मी पवित्र असावे इतका सन्मान करण्याइतपत तुम्ही माझ्यावर पुरेसा विश्वास ठेवला नाही, मी जो देश त्यांना देऊ करीत आहे त्यात या समुदायाला तुम्ही आणणार नाही.”

  14. “अहरोन आपल्या लोकांशी जाऊन मिळेल. इस्राएली लोकांना मी जो देश देत आहे त्यात तो प्रवेश करणार नाही, कारण मरीबाहच्या पाण्याकडे तुम्ही दोघांनी माझ्या आज्ञेविरुद्ध बंड केले.

  15. तुम्ही त्या रानात याहवेह तुमच्या परमेश्वराला राग येईल असे वागलात, हे तुम्ही विसरू नका आणि याची नेहमी आठवण ठेवा. ज्या दिवशी तुम्ही इजिप्त देश सोडला त्या दिवसापासून या ठिकाणी येईपर्यंत, तुम्ही याहवेहविरुद्ध सतत बंड केले.

  16. आणि जेव्हा याहवेहने तुम्हाला कादेश-बरनेआ येथून पाठविले, तेव्हा ते म्हणाले, “वर जा आणि जो देश मी तुम्हाला दिला आहे त्याचा ताबा घ्या.” पण तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञेविरुद्ध बंड केले. त्यांच्यावर भरवसा ठेवला नाही व त्यांची आज्ञा पाळली नाही.

  17. मी तुम्हाला ओळखतो, त्या दिवसापासून तुम्ही याहवेहविरुद्ध बंड करीत आहात.

  18. याहवेह तुमच्या परमेश्वराच्या ज्या सर्व आज्ञा आज मी तुम्हाला देत आहे, त्या सर्व तुम्ही पाळल्या, तर याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा श्रेष्ठ असे राष्ट्र करतील.

  19. जर तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञा पाळाल तर हे सर्व आशीर्वाद तुम्हावर येतील व तुमच्यासह असतील:

  20. तुम्ही नगरात आणि शेतात आशीर्वादित व्हाल.

  21. तुमची संतती, तुमच्या भूमीतील पिके आणि तुमच्या गुरांचे वत्स, तुमच्या कळपातील वासरे व कोकरे आशीर्वादित होतील.

  22. तुमच्या टोपल्या व तुमची पीठ मळण्याची परात आशीर्वादित होतील.

  23. तुम्ही बाहेर जाल तेव्हा व तुम्ही आत याल तेव्हा आशीर्वादित व्हाल.

  24. तुमचे शत्रू जेव्हा तुम्हावर हल्ला करतील, तेव्हा याहवेह त्यांचा तुमच्यासमोर पराजय करतील. ते एका दिशेकडून तुमच्यावर चालून येतील, परंतु सात दिशांना पळून जातील.

  25. याहवेह तुमच्या धान्याची कोठारे आणि जे काही तुम्ही हाती घ्याल त्यास आशीर्वादित करतील, याहवेह तुमचे परमेश्वर देत असलेल्या देशात तुम्ही जाल तिथे ते तुमची भरभराट करतील.