Rebellion Against God बद्दल बायबलमधील वचने: Departing from his instituted worship
Departing from his instituted worship बद्दल वचने
मी त्यांना दिलेल्या आज्ञांपासून ते फार लवकरच फिरले आहेत आणि आपल्यासाठी वासराची ओतीव मूर्ती तयार केली आहे. त्यांनी त्याच्यासमोर नमन केले आहे आणि यज्ञ करून म्हटले आहे, ‘हे इस्राएला, ही तुमची दैवते आहेत, ज्यांनी तुम्हाला इजिप्तमधून बाहेर काढले आहे!’ ”
याहवेह मोशेला पुन्हा म्हणाले, “मी या लोकांना पाहिले आहे, ते ताठ मानेचे लोक आहेत.
“याहवेहची सर्व मंडळी असे म्हणते: ‘इस्राएलच्या परमेश्वराचा विश्वासघात तुम्ही कसा करू शकता? याहवेहविरुद्ध बंड करून तुम्ही स्वतःच वेदी बांधून त्यांच्यापासून दूर कसे जाऊ शकता?
पेओराचे पाप आमच्यासाठी पुरेसे नव्हते काय? याहवेहच्या समाजावर मरी पडली त्या पातकापासून आजपर्यंत आम्ही शुद्ध झालेलो नाही.
आणि आता तुम्ही याहवेहपासून दूर जात आहात काय? “ ‘जर तुम्ही आज याहवेहविरुद्ध बंड केले तर उद्या संपूर्ण इस्राएली समाजाविरुद्ध याहवेहचा राग पेटेल.
जर तुमच्या मालकीची जमीन अशुद्ध असेल, तर याहवेहच्या भूमीकडे या, ज्या ठिकाणी याहवेहचा निवासमंडप उभा आहे आणि ती भूमी आमच्याबरोबर वाटून घ्या. परंतु याहवेह आपल्या परमेश्वराच्या वेदीखेरीज आपल्यासाठी वेदी बांधून याहवेहविरुद्ध किंवा आमच्याविरुद्ध बंड करू नका.