मुख्य मजकुरावर जा

Rebellion Against God बद्दल बायबलमधील वचने: Man is prone to

6 वचने · 63 पैलू

"Rebellion Against God" साठी शोधा

Man is prone to बद्दल वचने

  1. कारण तुम्ही किती बंडखोर आणि ताठ मानेचे आहात हे मला माहीत आहे. मी तुम्हाबरोबर असताना, तुम्ही जर याहवेहविरुद्ध बंडखोरी करीत आहात, तर माझ्या मृत्यूनंतर तुम्ही किती अधिक बंडखोरी कराल!

  2. नियमशास्त्र आध्यात्मिक आहे; हे आपल्याला माहीत आहे. पण मी तर पापाला गुलाम म्हणून विकलेला दैहिक प्राणी आहे.

  3. मी काय करतो हे मला समजत नाही. कारण जे मला करावेसे वाटते, ते मी करत नाही, जे करण्याचा मला तिटकारा येतो, तेच मी करीत असतो.

  4. जर मी जे करू नये ते करतो, तर नियमशास्त्र चांगले आहे, हे मी मान्य करतो.

  5. कारण या गोष्टी करणारा मी स्वतः नाही, तर माझ्यामध्ये वसत असलेले पाप करते.

  6. माझ्या देहस्वभावा मध्ये काहीच चांगले वसत नाही. वास्तविक जे चांगले ते करण्याची मला इच्छा असते पण मला ते करता येत नाही.