मुख्य मजकुरावर जा

Rebellion Against God बद्दल बायबलमधील वचने

148 वचने · 63 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “पण त्यांनी आज्ञाभंग केला आणि तुमच्याविरुद्ध बंड केले; त्यांनी तुमच्या नियमांकडे पाठ फिरविली. लोकांनी तुमच्याकडे परत यावे असे त्यांना सांगणार्‍या संदेष्ट्यांना ठार मारले आणि इतर अनेक तऱ्हेने महाभयंकर ईशनिंदा केली.

  2. म्हणून तुम्ही त्यांना शत्रूंच्या हाती दिले, ज्यांनी त्यांचा छळ केला. पण जेव्हा त्यांचा छळ होऊ लागला, त्यावेळी त्यांनी तुमचा धावा केला. तो तुम्ही स्वर्गातून ऐकला. त्यांच्यावर महान कृपा करून, शत्रूपासून मुक्त करणारे रक्षक त्यांच्याकडे पाठविले.

  3. “काहीजण प्रकाशाविरुद्ध बंड करतात, ज्यांना तो मार्ग अवगत नाही ते त्या मार्गात टिकूनही राहत नाहीत.

  4. कारण परमेश्वराचे अनुसरण करण्यापासून ते फिरले आहेत आणि त्यांच्या कोणत्याही मार्गाविषयी दुष्टाला आदर नाही.

  5. परमेश्वर, त्यांना दोषी घोषित करा! त्यांच्या कारस्थानामुळेच त्यांचे पतन होवो. त्यांच्या अनेक अपराधांमुळे त्यांना तुमच्यापासून दूर घालवून द्या, कारण त्यांनी तुमच्याविरुद्ध बंड केले आहे.

  6. आपल्या सामर्थ्याने ते सदासर्वकाळ राज्य करतात, प्रत्येक राष्ट्रांना ते न्याहाळून पाहतात— की बंडखोरांनी त्यांच्याविरुद्ध विद्रोह करू नये. सेला

  7. एकाकी लोकांना ते कुटुंबात वसवितात, कैद्यांना ते तुरुंगातून मुक्त करतात, तेव्हा ते आनंदाने गाऊ लागतात; परंतु बंडखोरांच्या वाट्याला दुष्काळ आणि दुःखच येणार.

  8. जेव्हा तुम्ही उच्चस्थानी आरोहण करता, तुम्ही अनेक बंदिवान नेले; मनुष्यासाठी तुम्ही नजराणे स्वीकारता; अगदी एकेकाळच्या बंडखोरांपासून सुद्धा— जेणेकरून येथे याहवेह परमेश्वर आमच्यामध्ये वस्ती करतील.

  9. कारण त्यांनी आपले नियम याकोबाला दिले, आणि इस्राएलात कायदे प्रस्थापित केले, जे त्यांनी आपल्या मुलाबाळांना शिकवावे अशी पूर्वजांना आज्ञा दिली.

  10. ते त्यांच्या पूर्वजांसारखे नसतील— जे हट्टी व बंडखोर पिढीसारखे होते, ज्यांचे हृदय परमेश्वराशी एकनिष्ठ नव्हते, ज्यांचे आत्मे त्यांच्याशी विश्वासू नव्हते.

  11. वचनदत्त देशास त्या लोकांनी तुच्छ लेखले; त्यांनी दिलेल्या अभिवचनांवर त्यांचा विश्वास नव्हता.

  12. त्यांनी आपल्या तंबूत कुरकुर केली, आणि याहवेहची आज्ञा झिडकारली.

  13. तेव्हा परमेश्वराने आपले हात उंचावून शपथ घेतली, की या रानात ते त्यांना नष्ट करतील.

  14. त्यांच्या वंशजांना दूरदूरच्या राष्ट्रात पाठवतील, आणि समस्त पृथ्वीवर त्यांना विखरून टाकतील.

  15. कारण त्यांनी परमेश्वराच्या आदेशाविरुद्ध बंडखोरी केली आणि परमोच्चाच्या योजनेला तुच्छ मानले.

  16. मग त्यांनी त्यांना कठोर परिश्रम करण्यास भाग पाडले; ते पडले आणि त्यांचे साहाय्य करण्यास कोणीही नव्हते.

  17. हे आकाशा, माझे ऐक! हे पृथ्वी ऐक! कारण याहवेह असे म्हणाले: “मी मुलांचे संगोपन केले आणि त्यांना वाढविले, परंतु त्यांनी माझ्याविरुद्ध बंड केले आहे.

  18. बैल त्याच्या मालकाला ओळखतो, गाढव त्याच्या मालकाचा गोठा ओळखतो, परंतु इस्राएल ओळखत नाही, माझ्या लोकांना समजत नाही.”

  19. तुम्हाला आणखी मार का दिला जावा? तुम्ही विद्रोह का करीत राहावे? तुमच्या संपूर्ण डोक्याला दुखापत झाली आहे, तुमचे संपूर्ण अंतःकरण ग्रस्त झाले आहे.

  20. परंतु जर तुम्ही विरोध कराल आणि विद्रोह कराल, तर तुमचा तलवारीने नाश केला जाईल.” कारण हे शब्द याहवेहच्या मुखातील आहेत.

  21. तुमचे राज्यकर्ते बंडखोर आहेत, चोरांचे भागीदार आहेत; त्या सर्वांना लाच घ्यायला आवडते, आणि ते बक्षिसांच्या मागे पळतात. ते अनाथांच्या बाजूचे रक्षण करीत नाहीत; विधवांचा खटल्याचे समर्थन करीत नाहीत.

  22. याहवेह असे घोषित करतात, “दुराग्रही संततीचा धिक्कार असो, ज्या योजना माझ्या नाहीत, त्या ते पूर्ण करतात, नाते जोडतात, परंतु माझ्या आत्म्याने नाही, पापावर पापाचा ढीग रचतात;

  23. आता जा, त्यांच्यासाठी ते एका पाटीवर लिहा, चर्मपत्राच्या गुंडाळीवर ते कोरून टाका, म्हणजे येणाऱ्या दिवसात ते सर्वकाळासाठी साक्षीदार असेल.

  24. कारण हे बंडखोर लोक आहेत, फसवणारी मुले आहेत, याहवेहची शिकवण ऐकायला तयार नसलेली मुले.

  25. अहो तुम्ही इस्राएली लोकांनो, ज्यांच्याविरुद्ध तुम्ही फार मोठेपणाने बंड केले आहे त्याच्याकडे परत या.