मुख्य मजकुरावर जा

Rebellion Against God बद्दल बायबलमधील वचने

148 वचने · 63 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. याहवेहच्या विरुद्ध केलेली बंडखोरी व लबाडी, परमेश्वराकडे फिरविलेली पाठ, बंडखोरी व छळवणूकीस प्रक्षुब्ध करणे, आमच्या अंतःकरणातून प्रसवलेले निखालस असत्य.

  2. तरीही त्यांनी बंड केले व याहवेहच्या पवित्र आत्म्याला खिन्न केले. म्हणून याहवेह मागे वळले व त्यांचे शत्रू झाले आणि याहवेहने स्वतः त्यांच्याविरुद्ध लढा दिला.

  3. ते जे अयोग्य मार्गावरून चालतात, जे स्वतःच्याच कल्पनांचे अनुसरण करतात— त्या हट्टी लोकांसाठी, मी आपले हात दिवसभर पुढे केले आहेत,

  4. “राष्ट्रांना सांगा, यरुशलेमविषयी घोषणा करा: ‘शहराला वेढा घालण्यासाठी दूर देशाचे सैन्य येत आहे, यहूदीयाच्या शहराविरुद्ध रणगर्जना करीत आहेत.

  5. त्यांनी तिला एखाद्या शेताच्या राखणदारांसारखे घेरले आहे, कारण तिने माझ्याविरुद्ध बंड केले आहे,’ ” असे याहवेह म्हणतात.

  6. “तुमच्या वागणुकीमुळे व वाईट कृत्यामुळे हा प्रसंग तुम्ही स्वतःवर ओढवून घेतला आहे. तुमची ही शिक्षा आहे! किती कडू आहे हे! कसे अंतःकरण छेदून टाकले आहे!”

  7. परंतु माझ्या लोकांची अंतःकरणे हट्टी व बंडखोर आहेत; माझ्याकडे पाठ फिरवून ते पथभ्रष्ट झाले आहेत.

  8. म्हणून याहवेह असे म्हणतात: ‘मी तुला पृथ्वीतलावरून काढून टाकणार आहे. याच वर्षी तुला मरण येईल, कारण तू याहवेहशी बंडखोरी करण्याचा संदेश दिला आहेस.’ ”

  9. “याहवेह नीतिमान आहेत, तरीसुद्धा मी त्यांच्या आज्ञेविरुद्ध बंड केले. सर्व लोकांनो, इकडे लक्ष द्या; माझ्या वेदना पाहा. कारण माझे तरुण व तरुणी बंदिवासात गेले आहेत.

  10. “हे याहवेह, माझ्या वेदना पाहा! माझे अंतःकरण यातनाग्रस्त झाले आहे, आणि माझे हृदय अस्वस्थ झाले आहे. कारण मी अत्यंत बंडखोर झाले होते. बाहेर तलवार मला मृत्यू आणते; आत तर केवळ मरणच आहे.

  11. तो म्हणाला, “हे मानवपुत्रा, ज्या राष्ट्राने माझ्याविरुद्ध बंड केले, अशा बंडखोर इस्राएल राष्ट्राकडे मी तुला पाठवित आहे; ते व त्यांचे पूर्वज यांनी आजपर्यंत माझ्याशी फितुरी केली आहे.

  12. ज्या लोकांकडे मी तुला पाठवित आहे ते उद्धट व हट्टी आहेत. त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात.’

  13. ते ऐको किंवा न ऐकोत—कारण ते बंडखोर लोक आहेत—त्यांना कळेल की त्यांच्यामध्ये एक संदेष्टा आहे.

  14. आणि हे मानवपुत्रा, त्यांना किंवा त्यांच्या शब्दांना घाबरू नकोस. तुझ्याभोवती झुडपे व काटे असतील आणि तू विंचवांमध्ये राहशील तरी घाबरू नकोस. जरी ते बंडखोर लोक आहेत तरी ते काय बोलतात त्याला तू घाबरू नकोस किंवा त्यांना भयभीत होऊ नकोस.

  15. तू माझे शब्द त्यांना सांगितले पाहिजे, मग ते ऐको किंवा न ऐकोत, कारण ते बंडखोर आहेत.

  16. परंतु तू हे मानवपुत्रा, मी तुला जे सांगतो ते ऐक. त्या बंडखोर लोकांप्रमाणे तू बंड करू नकोस; तुझे तोंड उघड आणि मी तुला जे देतो ते खा.”

  17. नंतर तो मला म्हणाला, “हे मानवपुत्रा, आता इस्राएली लोकांकडे जा आणि त्यांना माझी वचने सांग.

  18. अस्पष्ट बोलीच्या किंवा अनोळखी भाषेच्या लोकांकडे नाही, तर इस्राएली लोकांकडे तुला पाठवले जात आहे;

  19. दुर्बोध किंवा अनोळखी भाषेचे पुष्कळ लोक, ज्यांची भाषा तुला समजत नाही, त्यांच्याकडे नाही. खचितच जर त्यांच्याकडे मी तुला पाठवले तर त्यांनी तुझे ऐकले असते.

  20. परंतु इस्राएल लोक तुझे ऐकत नाही कारण ते माझे वचन ऐकू इच्छित नाही, कारण सर्व इस्राएली लोक कठोर व हट्टी आहेत.

  21. पण मी तुला त्यांच्यासारखाच निग्रही व कठोर बनवीन.

  22. मी तुझे कपाळ हिऱ्यापेक्षा अधिक कठोर, गारगोटीपेक्षा कठीण करेन, जरी ते बंडखोर लोक आहेत तरी त्यांना भयभीत होऊ नको; किंवा घाबरू नको.”

  23. “बंडखोर लोकांना सांग, ‘या गोष्टींचा अर्थ तुम्हाला माहीत नाही काय?’ त्यांना सांग: ‘बाबेलचा राजा यरुशलेमात गेला आणि तिचा राजा व सरदारांना घेऊन त्याच्याबरोबर परत बाबिलोनात आणले.

  24. परंतु राजाने त्याच्याविरुद्ध बंड केले आणि आपले घोडे व मोठे सैन्य आणण्यासाठी इजिप्तला त्याचे राजदूत पाठवले. तो यशस्वी होईल काय? अशा प्रकारचे काम करणारा वाचेल काय? करार तोडला तरी वाचेल काय?

  25. “ ‘परंतु त्यांनी माझ्याविरुद्ध बंड केले आणि माझा शब्द मानला नाही; ज्या घृणास्पद मूर्तींवर त्यांनी आपली नजर लावली होती, त्यांना त्यांनी टाकून दिले नाही, ना त्यांनी इजिप्तच्या मूर्तींचा त्याग केला. त्यामुळे मी म्हणालो मी त्यांच्यावर माझा क्रोध ओतेन आणि इजिप्तमध्ये मी त्यांच्यावर माझा कोप दाखवेन.