- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Paul बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
तेव्हा त्या सर्वांनी फार मोठा आकांत केला व त्यांनी पौलाच्या गळ्यात मिठी मारून त्याची चुंबने घेतली.
तुम्ही माझे तोंड पुन्हा पाहणार नाही हे जे वाक्य त्याने म्हटले होते, याचे त्या सर्वात जास्त दुःख झाले होते. मग त्यांनी त्याला तारवापर्यंत पोहोचविले.
शेवटी आम्ही अतिदुःखाने रडून त्यांचा निरोप घेतल्यावर, जहाजातून प्रवास करीत सरळ कोस येथे गेलो. दुसर्या दिवशी आम्ही रुदा येथे गेलो आणि तिथून पातराला गेलो.
तिथे आम्हाला फेनिके प्रांताकडे जाणारे जहाज दिसल्यावर, आम्ही त्या जहाजात बसून पुढे प्रवासाला निघालो.
जाताना आम्हाला सायप्रस बेट दिसले आणि त्याच्या दक्षिणेकडे जाऊन आम्ही पुढे सीरियातील सोर बंदरात उतरलो, कारण तिथे जहाजातील सामान खाली करावयाचे होते.
तिथे आम्ही शिष्यांना शोधून काढले, मग तिथे त्यांच्याबरोबर आम्ही सात दिवस राहिलो. त्यांनी आत्म्याद्वारे पौलाला यरुशलेमकडे न जाण्याचा आग्रह केला.
परंतु जेव्हा आम्हाला जाण्याची वेळ आली, तेव्हा तेथील सर्वजण पत्नी आणि लेकरांसोबत आमच्याबरोबर चालत शहराच्या सीमेपर्यंत आले आणि तिथे समुद्रकिनार्यावर आम्ही गुडघे टेकून प्रार्थना केली.
एकमेकांचा निरोप घेतल्यानंतर आम्ही जहाजात चढलो आणि ते घरी परत गेले.
सोरापासूनचा जलप्रवास आम्ही चालू ठेवला व त्यानंतर आम्ही प्टोलेमाईस येथे उतरलो. तेथील बंधू, भगिनींची आम्ही भेट घेतली आणि एक दिवस त्यांच्याबरोबर राहिलो.
दुसर्या दिवशी आम्ही निघालो व कैसरीया येथे पोहोचलो आणि सुवार्तिक फिलिप्पाच्या घरी राहिलो, तो सात जणांपैकी एक होता.
त्याला चार अविवाहित कन्या होत्या, त्या भविष्यवाणी करीत असत.
आम्ही अनेक दिवस तिथे राहिल्यानंतर, एक अगब नावाचा संदेष्टा यहूदीया येथून तिथे आला.
आम्हाकडे येऊन त्याने पौलाचा कमरबंद घेतला व स्वतःचे हातपाय बांधून तो म्हणाला, “पवित्र आत्मा म्हणतो, ‘हा कमरबंद ज्या मनुष्याचा आहे त्याला यरुशलेममधील यहूदी पुढारी असेच बांधून गैरयहूदीयांच्या हाती देतील.’ ”
हे ऐकल्यानंतर आम्ही आणि लोकांनी पौलाला यरुशलेमला न जाण्याची विनंती केली.
पौल म्हणाला, “तुम्ही रडून माझे हृदय का तोडता? यरुशलेममध्ये केवळ तुरुंगात पडण्याचीच माझी तयारी नाही, तर प्रभू येशूंच्या नावासाठी मरण्यास देखील मी तयार आहे.”
त्याचे मन वळत नाही हे पाहून आम्ही म्हणालो, “प्रभूच्या इच्छेप्रमाणे होवो.”
यानंतर आम्ही यरुशलेमकडे जाण्यास निघालो.
आम्ही यरुशलेममध्ये आल्यावर विश्वासणार्यांनी आमचे प्रेमाने स्वागत केले.
दुसर्या दिवशी पौल व आम्ही याकोबास भेटण्यास गेलो. तिथे सर्व वडीलजनही उपस्थिती होते.
क्षेमकुशल विचारल्यानंतर पौलाने आपल्या सेवेद्वारे परमेश्वराने गैरयहूद्यांमध्ये जे कार्य केले होते त्याचा सविस्तर अहवाल दिला.
त्यांनी हे ऐकले व परमेश्वराची स्तुती केली. नंतर ते पौलाला म्हणाले: “हे पाहा बंधू, हजारो यहूद्यांनी विश्वास ठेवला आहे आणि ते सर्वजण नियमशास्त्राच्या बाबतीत उत्साही आहेत.
तुझ्याविषयी त्यांना असे कळविण्यात आले आहे की, तू गैरयहूदी लोकांमध्ये राहणार्या सर्व यहूदीयांस मोशेपासून फिरा आणि आपल्या मुलांची सुंता करू नका किंवा आपल्या रूढी व प्रथांप्रमाणे राहू नका असे शिकवितोस.
तर आम्ही आता काय करावे? कारण तू येथे आला आहेस हे ते खात्रीने ऐकतील,
तेव्हा आम्ही सांगतो ते कर. नवस केलेले असे आमच्यात चौघेजण आहेत.
तर तू या माणसांना घेऊन शुद्धीकरणाचा विधी पूर्ण कर आणि त्यांच्या मुंडणाचा खर्च कर, म्हणजे ते त्यांच्या डोक्यांचे मुंडण करू शकतील व प्रत्येकाला समजेल की तू स्वतःसुद्धा नियमशास्त्र पाळतोस आणि तुझ्याबद्दलच्या अहवालात जे सांगितलेले आहे, त्यात काही तथ्य नाही.