Skip to content

Parables बद्दल बायबलमधील वचने

452 वचने · 74 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्याने आपल्या दहा दासांना बोलाविले व त्यांना दहा मीना दिल्या व म्हणाला, ‘मी परत येईपर्यंत यावर व्यापार करा.’

  2. “परंतु त्याच्या प्रजेने त्याचा द्वेष केला व त्यांनी त्याच्या पाठोपाठ एक प्रतिनिधीमंडळ हे सांगण्यासाठी पाठविले, ‘हा मनुष्य आमचा राजा असावा अशी आमची इच्छा नाही.’

  3. “तरीपण त्याचा राज्याभिषेक करण्यात येऊन तो घरी परतला. मग त्याने ज्या दासांना पैसे दिले होते, त्यांनी त्या पैशावर किती नफा मिळविला, हे पाहण्याकरिता बोलाविले.

  4. “पहिला सेवक म्हणाला, ‘महाराज, मी तुमच्या एका मीनावर आणखी दहा मीना मिळविल्या आहेत.’

  5. “त्याचा धनी म्हणाला, ‘शाबास, चांगल्या दासा! अतिशय थोडक्या बाबतीत तू विश्वासू राहिलास, म्हणून तू दहा शहरांची जबाबदारी घे.’

  6. “नंतर दुसरा दास आला आणि म्हणाला, ‘महाराज, मी तुमच्या मीनावर आणखी पाच मीना मिळविल्या आहेत.’

  7. “त्याचा धनी त्याला म्हणाला, ‘तू पाच शहरांची जबाबदारी घे.’

  8. “मग तिसरा दास पुढे येऊन म्हणाला, ‘महाराज, ही तुमची मीना घ्या; मी ती एका कापडात गुंडाळून जपून ठेवली होती,

  9. तुम्ही एक कठोर गृहृस्थ आहात, म्हणून मला तुमची भीती वाटली. जिथे तुम्ही ठेवले नाही, तिथे घेता आणि जे पेरलेले नाही, ते कापून नेता.’

  10. “यावर त्याचा धनी म्हणाला, ‘अरे दुष्ट दासा! मी आता तुझ्या शब्दाप्रमाणेच तुझा न्याय करतो, तुला माहीत होते की मी कठोर स्वभावाचा आहे, जे माझे नाही ते बळकावितो आणि मी स्वतः पेरले नाही ते कापून नेतो,

  11. तर माझे रुपये सावकाराकडे गुंतवून ठेवावयास हवे होते, म्हणजे मी परत आल्यावर त्यावर काही व्याज तरी मिळाले असते?’

  12. “नंतर तो त्याच्याजवळ जे उभे होते त्यांना म्हणाला, ‘त्याच्याकडून त्याची मीना घ्या आणि ज्याच्याजवळ दहा मीना आहेत त्याला द्या.’

  13. “पण ‘महाराज,’ ते म्हणाले, ‘त्याच्याजवळ आधीच दहा मीना आहेत.’

  14. “यावर त्याने उत्तर दिले, ‘मी तुम्हाला सांगतो, कारण ज्याला आहे त्याला अधिक दिले जाईल व ज्याच्याजवळ नाही त्याच्याजवळ जे असेल ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल.’

  15. आणि आता ज्यांनी मला त्यांचा राजा मानण्याचे नाकारले आहे, त्या माझ्या शत्रूंना येथे आणा आणि माझ्यासमोर त्यांचा वध करा.”

  16. “परूश्यांनो मी तुम्हाला निश्चित सांगतो की, जो कोणी मेंढवाड्यात दारातून आत प्रवेश करत नाही आणि दुसरीकडून चढून जातो, तो चोर व लुटारू असला पाहिजे.

  17. जो दाराने आत जातो तो मेंढरांचा मेंढपाळ आहे.

  18. दारावरचा पहारेकरी त्याच्यासाठी दार उघडतो आणि मेंढरे त्यांची वाणी ओळखतात. तो आपल्या मेंढरांना त्यांच्या नावाने हाक मारतो व त्यांना बाहेर घेऊन जातो.

  19. आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर, तो त्यांच्यापुढे चालतो व मेंढरे त्याला अनुसरतात, कारण ती त्याची वाणी ओळखतात.

  20. ती परक्याच्या मागे कधीच जाणार नाहीत; उलट ती त्याच्यापासून दूर पळून जातील, कारण ती त्या परक्याची वाणी ओळखीत नाहीत.”

  21. येशू हे अलंकारिकरित्या बोलले, परंतु परूश्यांना ते समजले नाही.

  22. “मी खरी द्राक्षवेल आहे आणि माझे पिता माळी आहेत.

  23. माझ्यातील प्रत्येक फांदी जी फळ देत नाही ती ते छाटून टाकतात आणि फळ न देणार्‍या प्रत्येक फांदीला अधिक फळ यावे म्हणून ते तिची छाटणी करतात.

  24. जे वचन मी तुम्हाला सांगितले आहे त्यामुळे तुम्ही आधी शुद्ध झालाच आहात.

  25. म्हणून मजमध्ये राहा व मी तुम्हामध्ये राहीन. कोणतीही फांदी स्वतःहून फळ देऊ शकत नाही; तिला वेलीमध्येच राहणे भाग आहे. तसेच माझ्यामध्ये राहिल्यावाचून तुम्हालाही फळ देता येणे शक्य नाही.