Skip to content

Parables बद्दल बायबलमधील वचने

452 वचने · 74 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आता तुमचा पुत्र म्हणवून घेण्यास लायक राहिलो नाही; मला एका चाकरांसारखे ठेवा.’

  2. तेव्हा तो उठला आपल्या पित्याकडे निघाला. “तो अजून दूर अंतरावर असतानाच वडिलांनी त्याला पाहिले आणि वडिलांचे हृदय कळवळले. ते धावत त्याच्याकडे गेले, त्याला मिठी मारून त्याचे चुंबन घेतले.

  3. “मुलगा म्हणाला, ‘बाबा, मी स्वर्गाविरुद्ध आणि तुमच्याविरुद्ध पाप केले आहे. तुमचा मुलगा म्हणवून घेण्यास लायक राहिलो नाही. मला तुमच्या नोकरासारखे ठेवा.’

  4. “परंतु त्याच्या वडिलांनी मात्र आपल्या चाकरांना आज्ञा केली, ‘त्वरा करा, सर्वात उत्तम झगा आणून त्याला घाला. त्याचप्रमाणे त्याच्या बोटात अंगठी घाला आणि पायात पायतण घाला.

  5. खास पोसलेले एक वासरू कापा. हा आनंदाचा प्रसंग आपण मेजवानीने साजरा करू.

  6. कारण हा माझा मुलगा मरण पावला होता, आता तो जिवंत झाला आहे, हरवला होता, आणि आता तो सापडला आहे.’ त्यांनी अशा रीतीने आनंद केला.

  7. “तेवढ्यात थोरला मुलगा शेतातील आपले काम आटोपून घरी आला आणि त्याला घरातून येणारे नृत्यसंगीत ऐकू आले.

  8. तेव्हा त्याने एका नोकराला बोलावून विचारले, ‘हे काय चालले आहे?’

  9. यावर त्याला सांगण्यात आले, ‘तुझा भाऊ परत आला आहे. तो सुखरुपपणे घरी आला म्हणून तुमच्या वडिलांनी एक पोसलेले वासरू कापले आहे!’

  10. “हे ऐकताच थोरला भाऊ खूप रागावला. तो घरात जाईना. तेव्हा त्याचे वडील बाहेर आले आणि त्याला विनंती करू लागले.

  11. परंतु त्याने वडिलांना उत्तर दिले, ‘बाबा, मी इतकी वर्षे सेवा केली आणि तुमची एकही आज्ञा मोडली नाही, तरी तुम्ही आजपर्यंत मी माझ्या मित्रांबरोबर आनंद करावा म्हणून एक करडूही दिले नाही.

  12. पण आता हा तुमचा पुत्र आपली सर्व संपत्ती वेश्यांवर उधळून घरी आला, तेव्हा तुम्ही त्याच्यासाठी धष्टपुष्ट वासरू कापले आहे!’

  13. “यावर त्याचे वडील त्याला म्हणाले, ‘माझ्या मुला, तू माझ्याबरोबर नेहमीच असतोस आणि जे माझे आहे, ते सर्व तुझेच आहे.

  14. हा आनंदाचा प्रसंग हर्षाने साजरा करावयाचा आहे कारण तुझा भाऊ मरण पावला होता, तो आज परत जिवंत झाला आहे. तो हरवला होता, पण आता सापडला आहे.’ ”

  15. येशूंनी आपल्या शिष्यांना सांगितले: “एक श्रीमंत मनुष्य होता, त्याचा कारभारी संपत्तीचा दुरुपयोग करतो असा आरोप त्याच्यावर होता.

  16. त्याच्या धन्याने त्याला बोलावून विचारले, ‘तुझ्याबद्दल मी हे काय ऐकत आहे? तू तुझ्या कारभाराचा हिशोब कर, कारण आता तू कारभारी म्हणून राहणार नाहीस.’

  17. “त्या कारभार्‍याने मनाशी विचार केला, ‘आता मी काय करावे? माझे महाराज माझ्याकडून कारभार काढून घेत आहे! खड्डे खणण्याची तर माझ्यात ताकद नाही, भीक मागण्याची मला लाज वाटते—

  18. मला समजले आहे की मी काय करावे, म्हणजे मला कारभारावरून काढले, तरी लोक त्यांच्या घरांमध्ये माझे स्वागत करतील.’

  19. “मग त्याने आपल्या धन्याच्या प्रत्येक कर्जदाराला बोलाविले. त्याने पहिल्यास विचारले, ‘माझ्या धन्याचे तुझ्यावर किती कर्ज आहे?’

  20. “तो म्हणाला, ‘नऊशे बथ जैतुनाचे तेल.’ ” यावर कारभारी म्हणाला, “हा तुझा सहीचा करारनामा घे आणि तो फाडून टाक, व दुसरा करारनामा घेऊन त्यावर चारशे पन्नास आकडा मांड.

  21. “नंतर त्याने दुसर्‍याला विचारले, ‘तुझ्यावर किती कर्ज आहे?’ “ ‘एक हजार पोती गहू,’ तो म्हणाला. “त्याने त्याला सांगितले ‘हा तुझा करारनामा घे आणि त्यावर फक्त आठशे पोती लिही.’

  22. “त्या लबाड कारभार्‍याची ही धूर्तता पाहून धन्याने त्याची वाहवा केली. या जगाचे लोक त्यांच्यासारख्यांशी व्यवहार करताना फार धूर्ततेने वागतात. प्रकाशाच्या लोकांना मात्र तसे वागता येत नाही.

  23. येशू म्हणाले, “कोणी एक श्रीमंत मनुष्य होता. तो दररोज जांभळी आणि सुंदर वस्त्रे परिधान करीत असे आणि चैनीत राहत असे.

  24. त्याच्या फाटकाजवळ लाजर नावाचा भिकारी पडून होता, तो फोडांनी भरलेला होता.

  25. त्या श्रीमंत मनुष्याच्या मेजावरून खाली पडलेला चुरा मिळावा या आशेने तो तिथे पडलेला असताना कुत्री येऊन त्याचे फोड चाटीत असत.