मुख्य मजकुरावर जा

Miraculous Gifts of the Holy Spirit बद्दल बायबलमधील वचने

46 वचने · 17 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. भयभीत अंतःकरणाच्या लोकांना सांगा, “बलवान व्हा, घाबरू नका; तुमचे परमेश्वर येतील, ते सूड घेण्यास येतील. दैवी प्रतिफळ देऊन तुम्हाला वाचवण्यासाठी येतील.”

  2. तेव्हा आंधळ्यांचे डोळे उघडतील आणि बहिऱ्यांचे कान उघडले जातील.

  3. तेव्हा पांगळे हरिणाप्रमाणे उड्या मारतील, आणि मुकी जीभ आनंदाने ओरडेल. अरण्यामध्ये पाणी आणि वाळवंटात झरे उफाळून वर येतील.

  4. “आणि त्यानंतर, मी माझा आत्मा सर्व लोकांवर ओतेन. तुमचे पुत्र व तुमच्या कन्या भविष्यवाणी सांगतील, व तुमचे वृद्ध स्वप्ने पाहतील, तुमचे तरुण दृष्टान्त पाहतील.

  5. माझ्या दासांवर म्हणजेच, स्त्री आणि पुरुष दोघांवरही, त्या दिवसांत मी माझा आत्मा ओतेन.

  6. त्या दिवशी पुष्कळजण मला म्हणतील, ‘प्रभूजी, प्रभूजी आम्ही तुमच्या नावाने भविष्यवाणी केली नाही काय, तुमच्या नावाने भुते घालविली नाहीत काय, तुमच्या नावाने मोठे चमत्कार केले नाहीत काय?’

  7. तेव्हा मी त्यांना स्पष्टपणे सांगेन, ‘मी तुम्हाला कधीच ओळखत नव्हतो. अहो दुष्टांनो, माझ्यापासून दूर निघून जा.’

  8. परंतु, मी जर परमेश्वराच्या आत्म्याने भुते काढतो, तर परमेश्वराचे राज्य तुमच्यावर आले आहे.

  9. कारण खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेष्टे उदय पावतील आणि मोठी चिन्हे व अद्भुते करून, साधेल तर, निवडलेल्या लोकांनाही फसवतील.

  10. मग शिष्य सर्वत्र संदेश सांगत फिरले, प्रभू त्यांच्याबरोबर कार्य करीत होते आणि जी चिन्हे झाली त्यावरून त्यांचे वचन सत्य असल्याची खात्री होत होती.

  11. जेव्हा पेंटेकॉस्टचा दिवस आला, त्यावेळी ते सर्व एका ठिकाणी जमले होते.

  12. एकाएकी स्वर्गातून प्रचंड सोसाट्याच्या वार्‍यासारखा आवाज आला आणि ज्या घरात ते बसले होते ते सर्व घर त्याने भरले.

  13. त्यावेळी अग्नीच्या जिभांसारख्या दिसणार्‍या जिभा वेगवेगळ्या होऊन प्रत्येकावर एकएक अशा स्थिरावताना त्यांना दिसल्या.

  14. तिथे उपस्थितीत असलेले सगळे जण पवित्र आत्म्याने भरले आणि आत्म्याने हे करण्यास त्यांना समर्थ केल्यामुळे ते वेगवेगळ्या भाषेत बोलू लागले.

  15. मग पेत्र व योहानाने आपले हात त्यांच्यावर ठेवले आणि त्यांना पवित्र आत्मा प्राप्त झाला.

  16. शिमोनाने पाहिले की प्रेषितांनी हात ठेवले म्हणजे पवित्र आत्म्याचे दान मिळते, तेव्हा त्याने प्रेषितांना पैसे देऊ केले

  17. पेत्राने उत्तर दिले: “तुझ्या पैशांचा तुझ्याबरोबर नाश होवो, कारण परमेश्वराचे दान पैशाने विकत घेता येईल असा तू विचार केला!

  18. पेत्र हे वचन बोलत असतानाच, सर्व संदेश ऐकणार्‍यांवर पवित्र आत्मा उतरला.

  19. पेत्राबरोबर आलेले विश्वासणारे, ज्यांची सुंता झाली होती ते आश्चर्यचकित झाले, कारण त्यांनी पाहिले की गैरयहूदी लोकांवरसुद्धा पवित्र आत्मा ओतून दिला आहे.

  20. कारण त्यांनी त्यांना अन्य भाषांमधून बोलताना आणि परमेश्वराची स्तुती करताना ऐकले. मग पेत्र म्हणाला,

  21. तरी देखील पौल व बर्णबाने तिथे बराच काळ घालविला, ते धैर्याने प्रभूसाठी बोलत राहिले, त्यांनी कृपेचा संदेश चिन्हे व अद्भुते यांच्याद्वारे सिद्ध केला.

  22. मग पौलाने आपले हात त्यांच्यावर ठेवले, त्यावेळी पवित्र आत्मा त्यांच्यावर आला आणि ते अन्य भाषेत बोलू लागले आणि भविष्यवाणी करू लागले.

  23. चिन्हे आणि झालेली अद्भुते पवित्र आत्म्याच्या शक्तीने झाली. अशा रीतीने मी यरुशलेमपासून तो इल्लूरिकमापर्यंत सर्वत्र ख्रिस्ताच्या शुभवार्तेची घोषणा पूर्णपणे केली आहे.

  24. निरनिराळ्या प्रकारची दाने आहेत, परंतु ती दाने वाटून देणारा पवित्र आत्मा एकच आहे.

  25. सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, पण प्रभू एकच आहे.