Miraculous Gifts of the Holy Spirit बद्दल बायबलमधील वचने: Foretold
Foretold बद्दल वचने
भयभीत अंतःकरणाच्या लोकांना सांगा, “बलवान व्हा, घाबरू नका; तुमचे परमेश्वर येतील, ते सूड घेण्यास येतील. दैवी प्रतिफळ देऊन तुम्हाला वाचवण्यासाठी येतील.”
तेव्हा आंधळ्यांचे डोळे उघडतील आणि बहिऱ्यांचे कान उघडले जातील.
तेव्हा पांगळे हरिणाप्रमाणे उड्या मारतील, आणि मुकी जीभ आनंदाने ओरडेल. अरण्यामध्ये पाणी आणि वाळवंटात झरे उफाळून वर येतील.
“आणि त्यानंतर, मी माझा आत्मा सर्व लोकांवर ओतेन. तुमचे पुत्र व तुमच्या कन्या भविष्यवाणी सांगतील, व तुमचे वृद्ध स्वप्ने पाहतील, तुमचे तरुण दृष्टान्त पाहतील.
माझ्या दासांवर म्हणजेच, स्त्री आणि पुरुष दोघांवरही, त्या दिवसांत मी माझा आत्मा ओतेन.