Miraculous Gifts of the Holy Spirit बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
कार्य निरनिराळ्या प्रकारचे आहेत, परंतु त्या सर्व गोष्टींमध्ये आणि प्रत्येकामध्ये कार्य करणारे परमेश्वर एकच आहेत.
आता प्रत्येकाला आत्म्याचे प्रकटीकरण सार्वजनिक कल्याणासाठी होते.
एकाला आत्म्याद्वारे ज्ञानाचा संदेश, तर तोच दुसर्याला बुद्धीचा संदेश एकाच आत्म्याद्वारे देतो.
त्याच आत्म्याद्वारे एकाला विश्वास, तर त्या एका आत्म्याद्वारे दुसर्याला रोग बरे करण्याची दाने मिळतात.
तोच आत्मा काही जणांना चमत्कार करण्याचे सामर्थ्य देतो, तर इतर काही जणांना संकल्प सांगण्याचे, तर कित्येकांना आत्मे ओळखण्याचे सामर्थ्य देतो. आणखी काहींना तो अन्य भाषा बोलण्याचे ज्ञान देतो; आणि त्याचप्रमाणे इतरांना अन्य भाषेचे स्पष्टीकरण करण्याची क्षमता देतो.
ही सर्व कार्ये एक आणि एकच आत्मा करतो आणि आपल्या निर्धारानुसार प्रत्येकाला वाटून देतो.
आणि परमेश्वराने सर्वात प्रथम मंडळीत प्रेषित, दुसरे संदेष्टे, तिसरे शिक्षक, मग चमत्कार करणारे, तसेच रोग बरे करण्याचे दान प्राप्त झालेले, इतरांना मदत करणारे, मार्गदर्शन करणारे, आणि शेवटी वेगवेगळी भाषा बोलणारे.
तेव्हा अधिक उच्चदानांची इच्छा बाळगणे चांगले. आणि आता मी तुम्हाला सर्वोत्कृष्ट मार्ग दाखवितो.
जर मी मनुष्यांच्या आणि देवदूतांच्या भाषेमध्ये बोलत असलो, पण माझ्याठायी प्रीती नसली, तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणार्या झांजेसारखा आहे.
मला परमेश्वराचे संकल्पनिवेदन करण्याचे दान असले, सर्वप्रकारच्या रहस्यांचे गहन अर्थ आकलन होत असले आणि सर्व ज्ञान असले आणि जरी डोंगर हालविण्याइतका मजजवळ विश्वास असला, पण माझ्याठायी प्रीती नसली, तर मी काहीच नाही.
भविष्यनिवेदन करण्याचे दान समाप्त होईल, वेगवेगळी भाषा बोलण्याचे दान स्तब्ध होईल आणि बुद्धीचे ज्ञान नाहीसे होईल; परंतु प्रीती अखंडपणे टिकून राहील.
प्रीतीचा मार्ग अनुसरा, तरीपण आत्म्याच्या देणग्यांची इच्छा बाळगत राहा, विशेषतः संदेश सांगण्याचे.
तुमच्याबाबतीत असेच आहे. ज्याअर्थी तुम्ही आत्मिक दानांसाठी उत्सुक आहात, तर मग मंडळीची वृद्धी व्हावी यासाठी ती दाने विपुल प्रमाणात मिळावी म्हणून नेहमी प्रयत्न करा.
या कारणासाठी एखादा अन्य भाषेत बोलतो, तर त्याने आपण काय बोललो याचा अर्थ सांगता यावा म्हणून प्रार्थना करावी.
संदेशाला तुच्छ मानू नका.
सैतान कशाप्रकारे कार्य करतो त्यानुसार अनीतिमानाचे येणे असेल. तो विलक्षण सामर्थ्याच्याद्वारे खोटी चिन्हे आणि अद्भुते करून दाखवेल,
मंडळीच्या वडिलांनी तुझ्यावर हात ठेवले असता, संदेशाद्वारे जी आध्यात्मिक कृपादाने तुला दिली, त्याची उपेक्षा करू नको.
म्हणूनच तुझ्यावर मी हात ठेवल्याने, परमेश्वराची जी देणगी तुला मिळाली, त्या देणगीला तू नव्याने प्रज्वलित केले पाहिजे. याची मी तुला आठवण देत आहे.
परमेश्वराने चिन्हे, अद्भुते व नाना प्रकारचे चमत्कार करून साक्ष दिली आणि पवित्र आत्म्याद्वारे त्यांच्या इच्छेनुसार विशिष्ट दाने वाटून दिली आहेत.
त्याने महान चमत्कार केले, सर्वांच्या डोळ्यांदेखत आकाशातून पृथ्वीवर अग्निज्वाला आणल्या.
कारण पहिल्या पशूच्या प्रतिनिधी प्रमाणे या पशूने अद्भुत चिन्हे करून पृथ्वीवरील रहिवाशांना फसविले. तलवारीने प्राणांतिक जखम होऊनही पुन्हा जिवंत झालेल्या त्या पहिल्या पशूची मोठी मूर्ती उभारावी, असा त्याने जगातील लोकांना हुकूम केला.