Skip to content

King बद्दल बायबलमधील वचने

74 वचने · 18 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. राजाचा क्रोध म्हणजे मृत्यूचा दूत, परंतु सुज्ञ मनुष्य तो क्रोध शमवेल.

  2. जेव्हा राजाचा चेहरा चमकतो, याचा अर्थ जीवदान आहे; त्याची कृपा वसंतऋतूमध्ये आलेल्या पावसाच्या ढगासारखी आहे.

  3. राजाच्या दरबारातील भ्रष्ट अधिकारी काढून टाका आणि मग त्याचे राज्य न्यायीपणामुळे स्थिर राहील.

  4. राजाच्या समक्षतेत प्रौढी मिरवू करू नकोस, आणि त्याच्या प्रतिष्ठित व्यक्तीमध्ये स्थान ग्रहण करण्याचा दावा करू नकोस;

  5. हे लमुवेला, राजांसाठी हे अयोग्य आहे— मद्य पिणे हे राजांसाठी योग्य नाही किंवा मदिरेची इच्छा बाळगणे हे राजांना शोभत नाही.

  6. असे होऊ नये की, त्यांनी मद्य प्राशन करावे आणि त्यांना दिलेला हुकूमनामा विसरून जावे, आणि सर्व जाचलेल्यांना त्यांच्या अधिकारापासून वंचित करावे.

  7. मी म्हणतो, राजाच्या आज्ञेचे पालन करा, कारण तशी तुम्ही परमेश्वरासमोर शपथ घेतली आहे.

  8. राजाची उपस्थिती सोडण्याची घाई करू नका. परंतु एखाद्या वाईट गोष्टींच्या बाजूने उभे राहू नका, कारण राजा त्याला योग्य वाटेल ते करतो.

  9. कारण राजाच्या वाणीत अधिकार आहे, “हे तू काय करतो” असे त्याला कोण म्हणणार?

  10. त्याच्या आज्ञांचे पालन करणार्‍यांना इजा होणार नाही, आणि सुज्ञ माणसाच्या अंतःकरणाला योग्य वेळ आणि प्रक्रिया माहीत होईल.

  11. यहूदीयाचा राजा, सिद्कीयाह, याने सर्व गुलामांची मुक्तता करण्याचा यरुशलेममधील लोकांशी करार केल्यानंतर यिर्मयाहला याहवेहकडून हे वचन आले.

  12. प्रत्येकाने आपआपले इब्री दास व दासी यांना मुक्त करावे; कोणत्याही यहूदी मनुष्याने दुसर्‍या यहूदी मनुष्यास बंदी बनवून ठेऊ नये.

  13. सर्व अधिपतींनी व लोकांनी हा करार स्वीकारला की ते त्यांच्या दास व दासींना मुक्त करतील व यापुढे त्यांना बंदी बनवून ठेवणार नाहीत. त्यांनी हे मान्य केले व सर्व दास व दासींना मुक्त केले.

  14. पण नंतर त्यांनी आपले मन बदलले व मुक्त केलेल्या आपल्या सेवकांना पुन्हा गुलाम केले.

  15. “ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात, अहो इस्राएलाच्या राजपुत्रांनो, तुम्ही फार पुढे गेला आहात! तुमचा आतंक आणि अत्याचार टाकून द्या आणि जे नीतिपूर्ण व योग्य ते करा. माझ्या लोकांचे वतन काढून घेण्याचे थांबवा, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.

  16. तुम्ही अचूक काटा, अचूक एफाह आणि अचूक बथ वापरावा.

  17. एफाह आणि बथ एकाच मापाचे असावे, म्हणजे बथमध्ये होमेरचा दहावा भाग व एफाहमध्ये होमेरचा दहावा भाग असावा; होमेर हे दोन्ही मापांसाठी एकच माप असावे.

  18. शेकेलमध्ये वीस गेराह असावे. वीस शेकेल आणि पंचवीस शेकेल आणि पंधरा शेकेल हे एक मीना समान आहेत.

  19. “ ‘तुम्ही अर्पण करावी ती विशेष भेट ही आहे: गव्हाच्या प्रत्येक होमेरातून एक एफाहचा सहावा भाग आणि जवाच्या प्रत्येक होमेरातून एक एफाहचा सहावा भाग.

  20. बथने मापलेले जैतुनाच्या तेलाचा नेमलेला भाग, जो प्रत्येक कोर मधून एक बथचा दहावा भाग आहे (ज्यात दहा बथ किंवा एक होमेर मावते, कारण दहा बथ हे एका होमेरसमान आहेत).

  21. इस्राएलमधील पुष्कळ पाणी असलेल्या कुरणातील कळपातून दोनशे मेंढरांमागे एक मेंढरू द्यावे. याचा उपयोग लोकांचे प्रायश्चित करावे म्हणून धान्यार्पणे, होमार्पणे आणि शांत्यर्पणे यासाठी केला जावा, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.

  22. देशातील सर्व लोकांनी ही विशेष अर्पणे इस्राएलच्या राजपुत्राला देणे आवश्यक आहे.

  23. हे राजपुत्राचे कर्तव्य असावे की त्याने इस्राएलच्या सर्व नेमलेल्या सणांच्या वेळी; म्हणजेच अमावस्या आणि शब्बाथाच्या वेळी होमार्पणे, धान्यार्पणे आणि पेयार्पणे आणावी. त्याने पापार्पणे, धान्यार्पणे, होमार्पणे आणि शांत्यर्पणे आणून इस्राएली लोकांसाठी प्रायश्चित करावे.

  24. “ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही एक निर्दोष गोर्‍हा घेऊन पवित्रस्थान शुद्ध करावे.

  25. याजकाने पापार्पणातील काही रक्त घेऊन मंदिराच्या द्वार पट्टीवर, वेदीच्या वरील बैठकीच्या चार कोपर्‍यांना आणि आतील अंगणाच्या द्वार पाट्यांवर लावावे.