Skip to content

King बद्दल बायबलमधील वचने

74 वचने · 18 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्याचप्रमाणे सातव्या दिवशी तुम्ही तसेच करावे जर कोणी नकळत भोळेपणाने किंवा अज्ञानात पाप केले; तर मंदिरासाठी तुम्ही ते प्रायश्चित करावे.

  2. “ ‘पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी तुम्ही वल्हांडण सण पाळावा, तो सण सात दिवसांचा असावा, त्यात तुम्ही खमीर नसलेली भाकर खावी.

  3. त्या दिवशी राजपुत्राने स्वतःसाठी व देशातील सर्व लोकांच्या पापार्पणासाठी एक गोर्‍हा द्यावा.

  4. सणाच्या सात दिवसाच्या दरम्यान दररोज त्याने सात निर्दोष गोर्‍हे व सात एडके होमार्पण म्हणून याहवेहसमोर आणावे, त्याचप्रमाणे पापार्पणासाठी एक बोकड आणावे.

  5. धान्यार्पण म्हणून त्याने प्रत्येक गोर्‍ह्याबरोबर एक एफाह व एका मेंढ्याबरोबर एक एफाह द्यावा, त्याचबरोबर एका एफाहमागे एक हीन जैतुनाचे तेल आणावे.

  6. “ ‘त्याचप्रमाणे सात दिवसांच्या सणाच्या दरम्यान, ज्याची सुरुवात सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी होते, त्याने पापार्पणे, होमार्पणे व धान्यार्पणे आणि तेल आणावे.

  7. शब्बाथ दिवशी राजपुत्र जे होमार्पण म्हणून याहवेहसाठी आणेल, ते सहा कोकरे आणि एक एडका असून ते सर्व निर्दोष असावे.

  8. एका एडक्यासह दिलेले अन्नार्पण एक एफाह असावे आणि कोकर्‍याबरोबरचे धान्य त्याच्या आवडीनुसार एका एफाहसाठी एक हीन जैतून तेलाबरोबर द्यावे.

  9. अमावस्येच्या दिवशी त्याने एक गोर्‍हा, सहा कोकरे आणि एक एडका हे द्यावे, ते सर्व निर्दोष असावे.

  10. त्याने एका गोर्‍ह्यामागे एक एफाह व एका एडक्यामागे एक एफाह असे धान्यार्पण आणावे, आणि कोकर्‍याबरोबर आपल्या आवडीनुसार एक एफाह एक हीन तेलाबरोबर आणावे.

  11. जेव्हा राजपुत्र प्रवेश करतो, त्याने द्वाराच्या देवडीकडील मार्गाने जावे आणि त्याच मार्गाने त्याने परत यावे.

  12. “ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: जर राजपुत्राने त्याच्या एका मुलासाठी आपल्या वतनातून काही भेट म्हणून दिली, ती त्याच्या वंशजांच्या मालकीची होईल; वारसानुसार ती त्यांची मालमत्ता होईल.

  13. तथापि, जर त्याने आपल्या वतनातून त्याच्या एखाद्या चाकराला काही भेट म्हणून दिले, तो चाकर स्वतंत्र होण्याच्या वर्षापर्यंत ती भेट ठेवू शकतो; मग ती पुन्हा राजपुत्राची होईल. राजपुत्राचे वतन केवळ त्याच्या मुलांच्याच मालकीचे आहे; ते त्यांचेच आहे.

  14. राजपुत्राने लोकांच्या वतनातून काही घेऊ नये, त्यांची मालमत्ता त्यांच्यापासून हिरावून घेऊ नये. त्याने त्याच्या मुलांना त्यांचा वाटा स्वतःच्या मालमत्तेतून द्यावा, म्हणजे माझ्या लोकांतून कोणीही त्यांच्या मालमत्तेपासून वंचित केला जाणार नाही.’ ”

  15. तर आता महाराज, या फर्मानावर शिक्कामोर्तब करा आणि ते लिखित स्वरुपात द्या म्हणजे ते बदलता येणार नाही—म्हणजे मेदिया व पारसीच्या कायद्यानुसार जो रद्द करता येणार नाही.”

  16. तेव्हा दारयावेश राजाने या फर्मानावर सही केली.

  17. मग ते राजाकडे गेले आणि त्याच्यासोबत त्याच्या फर्मानाबद्दल बोलले: तुम्ही फर्मान काढले नाही काय की येणार्‍या तीस दिवसांमध्ये कोणीही, महाराजांऐवजी इतर कोणत्याही देवाकडे किंवा मनुष्याकडे प्रार्थना करेल, तर त्याला सिंहाच्या गुहेत टाकण्यात यावे? राजाने उत्तर दिले, “हे फर्मान कायम आहे—मेदिया व पारसीच्या कायद्यानुसार जो रद्द करता येणार नाही.”

  18. नंतर ते राजाला म्हणाले, “महाराज, यहूदी कैद्यांपैकी दानीएल, तो आपली किंवा आपल्या फर्मानाची मुळीच पर्वा करीत नाही. तो आताही दिवसातून तीन वेळा प्रार्थना करतो.”

  19. जेव्हा राजाने हे ऐकले, तेव्हा तो फारच अस्वस्थ झाला; दानीएलला यातून वाचवावे असा त्याने निश्चय केला आणि त्याने सूर्यास्त होईपर्यंत दानीएलला कसे सोडवावे याचे सर्वतोपरी प्रयत्न केले.

  20. नंतर लोक जमावाने राजाकडे आले आणि त्यांना म्हटले, “महाराज, मेदिया व पारसीच्या कायद्यानुसार राजा जे फर्मान काढतो त्याला ते रद्द करता येणार नाही.”

  21. जर मी मृत्यूस पात्र असे काही केले असेल, तर मी मरण्यास नकार देत नाही परंतु यहूदी माझ्यावर जे आरोप करतात, ते जर खरे नाहीत, तर कोणालाही मला यांच्या स्वाधीन करण्याचा अधिकार नाही. मी कैसराजवळ न्याय मागतो!”

  22. त्यावर फेस्ताने आपल्या सल्लागारांची मसलत घेऊन जाहीर केले, “ठीक आहे. तू कैसराजवळ न्यायाची याचना केली आहेस, तर तू कैसरापुढेच जाशील!”

  23. तर सर्वात प्रथम मी विनंती करतो की, सर्व मनुष्यांसाठी विनंत्या, प्रार्थना, रदबदल्या आणि उपकारस्तुती करावी.

  24. अशाच प्रकारे राजांसाठी आणि अधिकार्‍यांसाठी करावी, यासाठी की आपण पूर्ण सुभक्तीने व गंभीरपणाने शांतीचे व स्वस्थपणाचे आयुष्यक्रमण करावे.