मुख्य मजकुरावर जा

Egypt बद्दल बायबलमधील वचने

328 वचने · 105 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. म्हणून त्यांनी इस्राएली लोकांवर गुलाम मुकादम ठेवले व त्यांच्याकडून जुलमाने फारोहसाठी पीथोम व रामसेस ही भंडारांची नगरे बांधून घेतली.

  2. परंतु जेवढा त्यांच्यावर अत्याचार केला गेला, तेवढे ते जास्त बहुगुणित झाले आणि पसरले; म्हणून इजिप्तच्या लोकांना इस्राएली लोकांचे भय वाटू लागले.

  3. इजिप्तचे लोक इस्राएली लोकांकडून कठोरपणे कष्ट करून घेऊ लागले.

  4. विटा व चुन्यातील कष्टाच्या कामाने त्यांचे जीवन कठीण केले आणि शेतातील प्रत्येक प्रकारच्या कष्टाच्या कामात त्यांच्याशी इजिप्तचे लोक कठोरतेने वागले.

  5. इजिप्तच्या राजाने शिफ्राह व पुआह नावाच्या दोन इब्री सुइणींना अशी सूचना दिली की,

  6. “इब्री स्त्रियांची प्रसूतीच्या तिवईवर मदत करीत असताना जर मुलगा जन्मला तर त्याला मारून टाका, परंतु मुलगी असली तर तिला जगू द्या.”

  7. पण त्या सुइणी परमेश्वराचे भय धरणार्‍या होत्या, म्हणून त्यांनी इजिप्तच्या राजाने सांगितल्याप्रमाणे केले नाही; तर मुलांनाही जिवंत राहू दिले.

  8. तेव्हा इजिप्तच्या राजाने त्या सुइणींना बोलावून विचारले, “तुम्ही असे का केले? तुम्ही मुलांना का जिवंत राहू दिले?”

  9. सुइणींनी फारोह राजाला उत्तर दिले, “इब्री स्त्रिया इजिप्तच्या स्त्रियांप्रमाणे नाहीत; त्या सशक्त आहेत आणि आम्ही तिथे पोहचण्या आधीच बाळंत होतात.”

  10. म्हणून परमेश्वराने त्या सुइणींना आशीर्वाद दिला आणि इस्राएली लोक बहुगुणित झाले व संख्येने फार अधिक झाले.

  11. या सुइणींनी परमेश्वराचे भय धरल्यामुळे परमेश्वराने त्यांची कुटुंबे स्थापित केली.

  12. मग फारोहने आपल्या सर्व लोकांना हुकूम दिला, “इब्य्रांना होईल तो प्रत्येक मुलगा नाईल नदीत फेकून द्यावा, परंतु प्रत्येक मुलीला जिवंत राहू द्यावे.”

  13. फारोहची कन्या नाईल नदीवर स्नान करण्यासाठी गेली व तिच्या दासी नदीच्या कडेने चालत होत्या. तिने लव्हाळ्याजवळ एक टोपली पाहिली; तेव्हा ती टोपली आणण्यासाठी तिने आपल्या एका दासीला पाठविले.

  14. तिने ती टोपली उघडली आणि त्यात एक बाळ रडत असल्याचे तिला दिसून आले. तिला त्याचा कळवळा आला. “हे बालक इब्री आहे,” ती म्हणाली.

  15. तेवढ्यात त्या बाळाची बहीण फारोहच्या राजकन्येला म्हणाली, “या बाळाला दूध पाजण्यासाठी एखादी इब्री दाई मी तुमच्यासाठी शोधून आणू का?”

  16. “होय, जा,” फारोहची कन्या तिला म्हणाली. त्या मुलीने जाऊन बाळाच्या आईला आणले.

  17. फारोहची कन्या तिला म्हणाली, “या बाळाला घेऊन जा आणि माझ्यासाठी त्याला दूध पाज; याचे वेतन मी तुला देईन.” ती बाई त्या बाळाला आपल्या घरी घेऊन गेली व तिने त्याचे संगोपन केले.

  18. पुढे बाळ मोठा झाल्यावर तिने त्याला फारोहच्या कन्येकडे आणले आणि तो तिचा पुत्र झाला. तिने त्याचे नाव मोशे असे ठेवले, कारण ती म्हणाली, “मी त्याला पाण्यातून बाहेर काढले.”

  19. तिथे त्याला एका झुडूपात अग्निज्वालेमधून याहवेहचा दूत प्रकट झाला. झुडूप तर पेटले आहे, पण ते जळत नाही असे जेव्हा मोशेने पाहिले,

  20. तेव्हा मोशेने विचार केला “ते झुडूप का जळत नाही, हे विचित्र दृश्य मी त्याजवळ जाऊन बघेन.”

  21. मोशे ते झुडूप पाहण्यासाठी गेला हे याहवेहने पाहिले, तेव्हा परमेश्वराने त्याला झुडूपातून आवाज दिला, “मोशे, मोशे!” मोशे म्हणाला, “हा मी येथे आहे.”

  22. परमेश्वर त्याला म्हणाले, “आणखी जवळ येऊ नकोस. आपली पायतणे काढ, कारण ज्या भूमीवर तू उभा आहेस ती पवित्र भूमी आहे.”

  23. मग ते म्हणाले, “मी तुझ्या पूर्वजांचा परमेश्वर आहे, म्हणजे मी अब्राहामाचा परमेश्वर, इसहाकाचा परमेश्वर आणि याकोबाचा परमेश्वर आहे.” तेव्हा मोशेने आपला चेहरा झाकला, कारण परमेश्वराकडे पाहण्यास तो घाबरला.

  24. नंतर याहवेहने त्याला सांगितले, “इजिप्त देशातील माझ्या लोकांचे हाल मी बघितले आहे. त्यांच्या मुकादमांच्या त्रासामुळे त्यांचे रडणे मी ऐकले आहे आणि त्यांच्या दुःखाविषयी मला चिंता आहे.

  25. त्यांना इजिप्तच्या गुलामगिरीतून सोडवून चांगल्या व विस्तीर्ण देशात, दूध व मध वाहत्या देशात घेऊन जाण्यासाठी मी खाली आलो आहे. त्या देशात कनानी, हिथी, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी हे लोक राहतात.