- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Egypt बद्दल बायबलमधील वचने: Pharaoh pursues Israel and is miraculously destroyed
Pharaoh pursues Israel and is miraculously destroyed बद्दल वचने
जेव्हा इजिप्तच्या राजाला सांगितले गेले की ते लोक पळून गेले, फारोहने व त्याच्या अधिकार्यांनी त्यांच्याविषयी आपले मन बदलले व ते म्हणाले, “आपण हे काय केले? आपण इस्राएली लोकांना जाऊ दिले व त्यांची सेवा गमावली!”
मग त्याने ताबडतोब आपला रथ जोडून आपले सैन्य सोबत घेतले.
सहाशे सर्वात उत्तम असे रथ व त्याबरोबर इजिप्तचे बाकी सर्व रथ व त्यावरील अधिकारी त्याने घेतले.
याहवेहने इजिप्तचा राजा फारोह याचे हृदय कठीण केले म्हणून इस्राएली लोक जे मोठ्या धैर्याने इजिप्तमधून जात होते, त्यांचा त्याने पाठलाग केला.
इजिप्तच्या लोकांनी—फारोहचे सर्व घोडे व रथ, घोडेस्वार व सैन्य यांच्यासह—इस्राएली लोकांचा पाठलाग केला आणि बआल-सफोनासमोर असलेल्या पी-हाहीरोथ, जिथे ते तळ देऊन होते तिथे त्यांना गाठले.
फारोह जसा जवळ आला, इस्राएली लोकांनी पाहिले की इजिप्तचे सैन्य त्यांच्यावर चालून येत आहे. ते फार घाबरले व मोठ्याने याहवेहकडे आरोळी मारली.
ते मोशेला म्हणाले, “इजिप्त देशात कबरा नव्हत्या म्हणून तू आम्हाला या रानात मरायला आणले काय? इजिप्तमधून आम्हास बाहेर आणून तू हे काय केले?
आम्हाला असेच राहू दे; आम्हाला इजिप्त लोकांची सेवा करू दे, असे आम्ही तुला इजिप्तमध्ये असताना म्हणालो नव्हतो काय? या रानात मरण्याऐवजी इजिप्त लोकांची गुलामी करणे आम्हाला बरे होते!”
मोशे लोकांना म्हणाला, “घाबरू नका. स्तब्ध राहा व आज याहवेह तुम्हाला अद्भुतरित्या कसे सोडविणार आहे ते पाहा. हे इजिप्तचे लोक जे तुम्हाला आज दिसतात ते पुन्हा दिसणार नाहीत.
याहवेह तुमच्यासाठी लढतील; तुम्ही केवळ स्तब्ध राहा.”
मग याहवेह मोशेला म्हणाले, “माझ्याकडे का रडतोस? इस्राएली लोकांना पुढे जायला सांग.
समुद्रातील पाणी दुभागावे म्हणून तुझ्या हातातील काठी समुद्रावर उगार म्हणजे इस्राएली लोक समुद्रामधून कोरड्या जमिनीवरून जातील.
मी इजिप्तच्या लोकांची मने कठीण करेन आणि ते त्यांच्यामागे समुद्राच्या आत येतील. मग फारोह, त्याचे सर्व सैनिक, रथ व घोडेस्वार यांच्याकडून मी माझे गौरव करून घेईन.
आणि जेव्हा फारोह, त्याचे रथ व त्याचे घोडेस्वार यांच्याकडून मला गौरव मिळेल, तेव्हा इजिप्तचे लोक जाणतील की मी याहवेह आहे.”
मग परमेश्वराचा दूत, जो इस्राएलांपुढे प्रवास करीत होता, तो आता त्यांच्या मागच्या बाजूला गेला. मेघस्तंभ देखील त्यांच्यापुढून निघून त्यांच्यामागे गेला,
आणि इजिप्तचे सैन्य व इस्राएली लोक यांच्यामध्ये आला. त्या रात्रभर मेघांनी एका बाजूने प्रकाश तर दुसर्या बाजूने अंधकार आणला; म्हणून रात्रभर एक दल दुसर्यापर्यंत पोहोचला नाही.
मग मोशेने आपला हात समुद्रावर उगारला आणि याहवेहने रात्रभर पूर्वेचा वारा वाहवून समुद्राचे पाणी मागे हटवून ती कोरडी जमीन केली व पाणी दुभागले.
तेव्हा इस्राएली लोक, त्यांच्या उजवी व डावीकडे पाण्याची भिंत उभी असताना, समुद्रामधून कोरड्या भूमीवरून चालत गेले.
इजिप्तच्या लोकांनी इस्राएली लोकांचा पाठलाग केला आणि फारोहचे घोडे, रथ व स्वार त्यांच्यामागे समुद्राच्या मध्ये गेले.
पण पहाटेच्या वेळी अग्निस्तंभामधून व मेघस्तंभामधून याहवेहने इजिप्तच्या सेनेकडे पाहिले आणि त्यांचा गोंधळ उडविला.
त्यांच्या रथांची चाके गच्च केली की त्यांना पुढे जाणे कठीण होऊ लागले. तेव्हा इजिप्तची लोक म्हणू लागले, “इस्राएलच्या लोकांपासून आपण दूर जाऊ या! कारण याहवेह त्यांच्यावतीने इजिप्तविरुद्ध लढत आहेत.”