मुख्य मजकुरावर जा

Egypt बद्दल बायबलमधील वचने: Moses adopted and brought up by Pharaoh's daughter

6 वचने · 105 पैलू

Moses adopted and brought up by Pharaoh's daughter बद्दल वचने

  1. फारोहची कन्या नाईल नदीवर स्नान करण्यासाठी गेली व तिच्या दासी नदीच्या कडेने चालत होत्या. तिने लव्हाळ्याजवळ एक टोपली पाहिली; तेव्हा ती टोपली आणण्यासाठी तिने आपल्या एका दासीला पाठविले.

  2. तिने ती टोपली उघडली आणि त्यात एक बाळ रडत असल्याचे तिला दिसून आले. तिला त्याचा कळवळा आला. “हे बालक इब्री आहे,” ती म्हणाली.

  3. तेवढ्यात त्या बाळाची बहीण फारोहच्या राजकन्येला म्हणाली, “या बाळाला दूध पाजण्यासाठी एखादी इब्री दाई मी तुमच्यासाठी शोधून आणू का?”

  4. “होय, जा,” फारोहची कन्या तिला म्हणाली. त्या मुलीने जाऊन बाळाच्या आईला आणले.

  5. फारोहची कन्या तिला म्हणाली, “या बाळाला घेऊन जा आणि माझ्यासाठी त्याला दूध पाज; याचे वेतन मी तुला देईन.” ती बाई त्या बाळाला आपल्या घरी घेऊन गेली व तिने त्याचे संगोपन केले.

  6. पुढे बाळ मोठा झाल्यावर तिने त्याला फारोहच्या कन्येकडे आणले आणि तो तिचा पुत्र झाला. तिने त्याचे नाव मोशे असे ठेवले, कारण ती म्हणाली, “मी त्याला पाण्यातून बाहेर काढले.”