मुख्य मजकुरावर जा

Egypt बद्दल बायबलमधील वचने

328 वचने · 105 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. ते त्यांना म्हणाले, “याहवेह तुम्हाकडे पाहो व तुमचा न्याय करो! तुम्ही दोघांनी फारोह व त्याच्या अधिकार्‍यांसमोर आम्हाला किळसवाणे असे केले आहे आणि आम्हाला मारून टाकण्यासाठी त्यांच्या हाती तलवार दिली आहे.”

  2. मोशे याहवेहकडे जाऊन म्हणाला, “हे प्रभू, या लोकांवर तुम्ही अरिष्ट का आणले? यासाठीच तुम्ही मला पाठवले आहे का?

  3. मी तुमच्या नावाने फारोहला बोललो, तेव्हापासून त्याने त्यांच्यावर त्रास आणला आहे आणि तुम्ही आपल्या लोकांना सोडविले नाही.”

  4. मग इजिप्तमध्ये याहवेह मोशे व अहरोन यांच्याशी बोलले,

  5. “हा महिना तुमच्यासाठी पहिला महिना, वर्षाचा पहिला महिना असेल.

  6. तू इस्राएलाच्या सर्व समुदायाला जाहीर कर की, या महिन्याच्या दहाव्या दिवशी, प्रत्येकाने आपल्या कुटुंबासाठी एक कोकरू घ्यावे, प्रत्येक घराण्यासाठी एक कोकरू.

  7. जर एखादे कुटुंब एका कोकराच्या मानाने लहान असले तर शेजारच्या कुटुंबाबरोबर, त्यांच्यातील लोकांची संख्या लक्षात घेऊन प्रत्येक व्यक्ती किती खाईल यानुसार अंदाज घेऊन, किती कोकरे लागतील हे ठरवावे.

  8. एक वर्षाचे निर्दोष नर कोकरू असावे, आणि तुम्ही ते मेंढरांतून अथवा शेळ्यांतून घ्यावे.

  9. या महिन्याच्या चौदाव्या दिवसापर्यंत त्यांची काळजी घ्यावी आणि इस्राएली लोकातील सर्वांनी सायंकाळी ते कापावेत.

  10. ज्या घरांमध्ये ते खातील त्या घराच्या दोन्ही दारपट्ट्यांना व कपाळपट्टीला त्या कोकराचे रक्त घेऊन ते लावावे.

  11. त्या रात्री प्रत्येकाने त्या कोकर्‍याचे विस्तवावर भाजलेले मांस, बेखमीर भाकर व कडू भाजी यांच्याबरोबर खावे.

  12. मांस कच्चे किंवा पाण्यात उकळून खाऊ नये, तर विस्तवावर भाजून, त्याचे डोके, पाय व आतड्यांसह खावे.

  13. त्यातील काहीही सकाळपर्यंत राहू देऊ नये; जर काही सकाळपर्यंत उरले तर ते जाळून टाकावे.

  14. तुम्ही ते असे खावे: तुमच्या कंबरा बांधलेल्या, तुमची पायतणे पायात घातलेली व हातात काठी घेऊन ते घाईघाईने खावे. हा याहवेहचा वल्हांडण आहे.

  15. “कारण त्याच रात्री मी संपूर्ण इजिप्त देशामधून संचार करेन व सर्व मनुष्यांचे व जनावरांचे प्रथमवत्स मारून टाकेन आणि त्यांच्या सर्व दैवतांवर न्याय आणेन; मी याहवेह आहे.

  16. तुम्ही राहत असलेल्या घरांच्या दारांवर असलेले रक्त हे तुमच्याकरिता चिन्ह असेल, जेव्हा मी ते रक्त पाहीन, तेव्हा मी तुम्हाला ओलांडून पुढे जाईन. जेव्हा मी इजिप्तला तडाखा देईन, तेव्हा कोणतीही विनाशी पीडा तुम्हाला स्पर्श करणार नाही.

  17. “हा दिवस तुम्ही याहवेहचा सण म्हणून पिढ्यान् पिढ्यांपर्यंत सर्वकाळच्या नियमाने पाळावा.

  18. सात दिवस तुम्ही खमीर नसलेली भाकर खावी. पहिल्या दिवशी आपल्या घरातून खमीर काढून टाकावे, कारण जे कोणी या सात दिवसात खमीर घातलेल्या वस्तू खाईल, त्याला इस्राएलातून बेदखल करण्यात यावे.

  19. पहिल्या दिवशी एक पवित्र सभा भरवावी आणि सातव्या दिवशी दुसरी सभा. या दिवसात प्रत्येकाने खाण्यासाठी अन्न तयार करण्याशिवाय इतर कोणतेही काम करू नये.

  20. “बेखमीर भाकरीचा सण पाळावा, कारण याच दिवशी मी तुमच्या सैन्यांना इजिप्तमधून बाहेर आणले. पिढ्यान् पिढ्यांपर्यंत सर्वकाळच्या नियमाने तो पाळावा.

  21. पहिल्या महिन्यात चौदाव्या दिवसाच्या संध्याकाळपासून एकविसाव्या दिवसाच्या संध्याकाळपर्यंत तुम्ही खमीर नसलेली भाकर खावी.

  22. या सात दिवसात तुमच्या घरात खमीर सापडू नये. आणि कोणीही, तो परदेशी असो वा देशात जन्मलेला असो, जो खमीर घातलेले पदार्थ खाईल तर त्याला इस्राएलाच्या समाजातून वाळीत टाकले जावे.

  23. खमीर घातलेले काहीही खाऊ नये. तुम्ही कुठेही राहत असला तरी तुम्ही बेखमीर भाकरीच खावी.”

  24. मग मोशेने इस्राएलातील वडीलजनांना बोलाविले व म्हटले, “तुम्ही लगेच जा व आपआपल्या कुटुंबाप्रमाणे कोकरू निवडून घ्या व वल्हांडणाच्या कोकराचा वध करा.

  25. एजोबाची जुडी घेऊन ती पात्रात घेतलेल्या रक्तात बुडवा व त्याने ते रक्त घराच्या दरवाजाच्या बाजूंवर व कपाळपट्टीवर लावा. तुम्हापैकी कोणीही सकाळ होईपर्यंत आपल्या घराबाहेर पडू नये.