मुख्य मजकुरावर जा

Egypt बद्दल बायबलमधील वचने

328 वचने · 105 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मग मोशेने आपला हात समुद्रावर उगारला आणि याहवेहने रात्रभर पूर्वेचा वारा वाहवून समुद्राचे पाणी मागे हटवून ती कोरडी जमीन केली व पाणी दुभागले.

  2. तेव्हा इस्राएली लोक, त्यांच्या उजवी व डावीकडे पाण्याची भिंत उभी असताना, समुद्रामधून कोरड्या भूमीवरून चालत गेले.

  3. इजिप्तच्या लोकांनी इस्राएली लोकांचा पाठलाग केला आणि फारोहचे घोडे, रथ व स्वार त्यांच्यामागे समुद्राच्या मध्ये गेले.

  4. पण पहाटेच्या वेळी अग्निस्तंभामधून व मेघस्तंभामधून याहवेहने इजिप्तच्या सेनेकडे पाहिले आणि त्यांचा गोंधळ उडविला.

  5. त्यांच्या रथांची चाके गच्च केली की त्यांना पुढे जाणे कठीण होऊ लागले. तेव्हा इजिप्तची लोक म्हणू लागले, “इस्राएलच्या लोकांपासून आपण दूर जाऊ या! कारण याहवेह त्यांच्यावतीने इजिप्तविरुद्ध लढत आहेत.”

  6. मग याहवेह मोशेला म्हणाले, “आपला हात समुद्रावर लांब कर म्हणजे समुद्राचे पाणी पूर्ववत होऊन इजिप्तचे सर्व सैन्य, त्यांचे रथ व घोडेस्वार यांच्यावर येईल.”

  7. मोशेने आपला हात समुद्रावर लांब केला आणि पहाटेच्या वेळी समुद्र त्याच्या ठिकाणी परत गेला. इजिप्तचे लोक त्याच्याकडे धावत असताना याहवेहने त्यांना समुद्रात बुडवून टाकले.

  8. पाणी परत वाहू लागले व फारोहचे सर्व सैन्य, घोडेस्वार व रथ—फारोहचे संपूर्ण सैन्य, ज्यांनी इस्राएली लोकांचा समुद्रामध्ये पाठलाग केला ते पाण्याखाली गेले. त्यांच्यातील एकही जिवंत राहिला नाही.

  9. वयाच्या तेविसाव्या वर्षी यहोआहाज राजा झाला आणि त्याने तीन महिने यरुशलेमात राज्य केले, त्याच्या आईचे नाव हमूटल असे होते; ती लिब्नाह येथील यिर्मयाहची कन्या होती.

  10. त्याने आपल्या पूर्वजांच्या प्रमाणे याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते केले.

  11. त्याने यरुशलेमात राज्य करू नये म्हणून फारोह नखोने त्याला हमाथातील रिब्लाह येथे बेड्या घालून ठेवले. फारोह नखोने यहूदीयावर शंभर तालांत चांदी आणि एक तालांत सोने असा कर लादला.

  12. फारोह नखोने योशीयाहचा पुत्र एल्याकीमला त्याच्या पित्याच्या जागी राजा केले आणि एल्याकीमचे नाव बदलून यहोयाकीम ठेवले. परंतु त्याने यहोआहाजाला इजिप्तमध्ये नेले आणि तिथे तो मरण पावला.

  13. यहोयाकीमने फारोह नखोने मागितलेले सोने आणि चांदी दिली. असे करण्यासाठी त्याने जमिनीवर कर लावला आणि तेथील लोकांकडून चांदी व सोने वसूल केले.

  14. नदीचे पाणी वाळून जाईल, आणि नदीचे पात्र कोरडे आणि शुष्क होईल.

  15. कालव्यांना दुर्गंधी येईल; मिसरचे झरे ओसरतील आणि कोरडे होतील. लव्हाळे आणि वेळू सुकून जातील,

  16. तसेच नाईल नदीच्या काठावरील, नदिमुखावरील झाडेसुद्धा, नाईल नदीच्या काठावर पेरणी केलेले प्रत्येक शेत कोरडे होईल व उडून नाहीसे होईल.

  17. जे नाईल नदीत आकड्या टाकतात, ते सर्व कोळीसुद्धा रडतील आणि विलाप करतील; जे पाण्यावर जाळे टाकतात ते झुरणीस लागतील.

  18. जे तागाच्या सूतकताईचे काम करतात ते निराश होतील, विणकर आशा हरवतील.

  19. कापडकामाचे कारागीर उदास होतील, आणि सर्व मजुरी करणाऱ्यांची अंतःकरणे रोगट होतील.

  20. सोअन येथील अधिकारी निरुपयोगीच नाहीत तर मूर्ख आहेत; फारोह राजाचे शहाणे सल्लागार निरर्थक सल्ला देतात. तुम्ही फारोहला कसे म्हणू शकता, “ज्ञानी लोकांपैकी एक मी आहे, प्राचीन राजांचा मी एक शिष्य आहे?”

  21. आता तुमची ज्ञानी माणसे कुठे आहेत? त्यांनी तुम्हाला दाखवावे किंवा तुमच्यापुढे यावे आणि माहीत करून द्यावे, कि सर्वसमर्थ याहवेह यांनी इजिप्तविरुद्ध काय योजना केली आहे.

  22. सोअनचे अधिकारी मूर्ख बनले आहेत, मेम्फीसच्या पुढाऱ्यांची फसवणूक झाली आहे; तिच्या लोकांच्या कोनशिलांनी इजिप्तला भरकटून टाकले आहे.

  23. याहवेहनी त्यांच्यामध्ये भोंवळ येण्याचा आत्मा ओतला आहे; त्यामुळे इजिप्तच्या सर्व कामात ती लटपटते, जसा मद्यपी, त्याने केलेल्या ओकारी भोवती फिरतो.

  24. त्या दिवशी इजिप्तमधील पाच शहरे कनान देशाची भाषा बोलतील आणि सर्वसमर्थ याहवेह यांच्याबरोबर एकनिष्ठतेची शपथ घेतील. त्यापैकी एकाला सूर्याचे शहर म्हटले जाईल.

  25. त्या दिवशी इजिप्तच्या मध्यभागी याहवेहसाठी वेदी असेल आणि त्यांच्या सीमेवर याहवेह यांचे स्मारक असेल.