मुख्य मजकुरावर जा

circa 1446–1406 BC

The Wilderness Years

Forty years of wandering in the desert test Israel's faith and prepare a new generation to enter the promised land.

2,247 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. अनुवाद २२:१०सुमारे इ.स.पू. १४५१

    एकाच नांगराला बैल व गाढव यांना एकत्र जुंपून नांगरणी करू नये.

  2. अनुवाद २२:११सुमारे इ.स.पू. १४५१

    लोकर व ताग यांचे मिश्रण असलेली वस्त्रे घालू नका.

  3. अनुवाद २२:१२सुमारे इ.स.पू. १४५१

    आपल्या अंगरख्याच्या चारही कोपर्‍यांना गोंडे लावावीत.

  4. अनुवाद २२:१३सुमारे इ.स.पू. १४५१

    एखाद्या पुरुषाने पत्नी केली आणि तिच्याशी समागम केल्यानंतर ती त्याला आवडेनाशी झाली

  5. अनुवाद २२:१४सुमारे इ.स.पू. १४५१

    आणि तिची निंदा केली आणि तिच्या नावाची बदनामी करून म्हटले, “मी या स्त्रीसोबत लग्न केले, पण जेव्हा मी तिच्याजवळ गेलो तेव्हा तिच्यात मला कौमार्याबद्दलचा पुरावा आढळला नाही,”

  6. अनुवाद २२:१५सुमारे इ.स.पू. १४५१

    तर मुलीच्या आईवडिलांनी तिच्या कौमार्याबद्दलचा पुरावा, त्या नगराच्या वेशीत वडील मंडळीपुढे साजरा करावा.

  7. अनुवाद २२:१६सुमारे इ.स.पू. १४५१

    तिच्या वडिलांनी त्यांना असे सांगावे, “मी माझी कन्या या मनुष्याला त्याची पत्नी व्हावी म्हणून दिली, परंतु आता ती त्याला आवडत नाही.

  8. अनुवाद २२:१७सुमारे इ.स.पू. १४५१

    आता त्याने तिची निंदा केली आणि म्हणाला, ‘मला तुमच्या कन्येमध्ये कौमार्याबद्दलचे पुरावे आढळले नाही.’ पण हे पाहा आमच्या कन्येच्या कौमार्याबद्दलचा पुरावा.” मग तिच्या आईवडिलांनी ते वस्त्र नगराच्या वडीलांपुढे सादर करावे,

  9. अनुवाद २२:१८सुमारे इ.स.पू. १४५१

    आणि मग नगरातील वडील मंडळीने त्या पुरुषाला घ्यावे आणि त्याला शिक्षा द्यावी.

  10. अनुवाद २२:१९सुमारे इ.स.पू. १४५१

    शंभर चांदीची नाणी दंडादाखल त्याच्याकडून वसूल करावी आणि मुलीच्या वडिलांना द्यावीत, कारण त्या तरुणाने एका इस्राएली कुमारिकेची बदनामी केली. ती त्याची पत्नी म्हणून राहील; तो जिवंत असेपर्यंत त्याने तिला कदापि घटस्फोट देऊ नये.

  11. अनुवाद २२:२०सुमारे इ.स.पू. १४५१

    परंतु आरोप सत्य असल्यास आणि तिच्या कौमार्याबद्दलचा पुरावा आढळला नाही,

  12. अनुवाद २२:२१सुमारे इ.स.पू. १४५१

    तर मात्र नगराच्या वडिलांनी त्या कन्येला तिच्या वडिलांच्या घराच्या दारापर्यंत न्यावे व तिथे नगरातील लोकांनी तिला मरेपर्यंत धोंडमार करावी. आपल्या आईवडिलांच्या घरात राहत असताना, व्यभिचारिणी होऊन तिने इस्राएलात घृणास्पद कृत्य केले आहे. अशा रीतीने तुमच्यामधील दोष काढून टाकण्यात यावे.

  13. अनुवाद २२:२२सुमारे इ.स.पू. १४५१

    एखादा पुरुष दुसर्‍या पुरुषाच्या स्त्रीबरोबर व्यभिचार करीत असताना आढळला, तर तिच्यासोबत झोपलेला पुरुष आणि स्त्री दोघांनाही जिवे मारावे. अशा रीतीने इस्राएलमधून कलंक दूर करून शुद्ध करावे.

  14. अनुवाद २२:२३सुमारे इ.स.पू. १४५१

    ज्या कुमारिकेचा वाङ्निश्चय झालेला आहे, अशा कुमारिकेला जर एखाद्या नगरात एखाद्या पुरुषाने भ्रष्ट केले,

  15. अनुवाद २२:२४सुमारे इ.स.पू. १४५१

    तर त्या दोघांनाही नगराच्या वेशीच्या बाहेर घेऊन जावे आणि मरेपर्यंत धोंडमार करावा—त्या कुमारिकेला अशासाठी की नगरात असताना तिने मदतीसाठी आरडाओरडा केला नाही आणि त्या पुरुषाला अशासाठी की त्याने दुसर्‍या पुरुषाच्या स्त्रीला भ्रष्ट केले. अशा रीतीने तुमच्यामधून कलंक दूर करून शुद्ध करावे.

  16. अनुवाद २२:२५सुमारे इ.स.पू. १४५१

    परंतु एखाद्या पुरुषाने वाङ्निश्चय झालेल्या कुमारिकेला बाहेर शेतात गाठून तिच्यावर बलात्कार केला, तर असे करणार्‍या पुरुषाला ठार मारावे.

  17. अनुवाद २२:२६सुमारे इ.स.पू. १४५१

    त्या कुमारिकेला काही करू नये; तिला मरणदंड मिळावा असे पाप तिने केले नाही. एखाद्याने आपल्या शेजार्‍यावर हल्ला करून त्याला ठार मारावे त्याप्रमाणे हे आहे,

  18. अनुवाद २२:२७सुमारे इ.स.पू. १४५१

    कारण त्या पुरुषाने त्या एकट्या कुमारिकेला शेतात शोधून काढली आणि मदतीसाठी ती ओरडलीच असेल, परंतु ते ऐकण्यासाठी आणि तिची सुटका करण्यासाठी त्या ठिकाणी कोणीही नव्हते.

  19. अनुवाद २२:२८सुमारे इ.स.पू. १४५१

    जर एखाद्या पुरुषाने जिचा वाङ्निश्चय झालेला नसेल, अशा कुमरिकेवर बलात्कार केला आणि ते करीत असताना तो आढळला,

  20. अनुवाद २२:२९सुमारे इ.स.पू. १४५१

    तर त्याने मुलीच्या वडिलांना पन्नास चांदीची नाणी दंड म्हणून दिली पाहिजेत आणि त्या कुमारिकेशी विवाह केला पाहिजे, कारण त्याने तिला भ्रष्ट केले. तो जिवंत असेपर्यंत तिला घटस्फोट देऊ शकत नाही.

  21. अनुवाद २२:३०सुमारे इ.स.पू. १४५१

    कोणाही पुरुषाने आपल्या पित्याच्या पत्नीशी विवाह करू नये; त्याने आपल्या पित्याच्या अंथरुणास भ्रष्ट करू नये.

  22. अनुवाद २३:१सुमारे इ.स.पू. १४५१

    जो भग्नांड आहे किंवा ज्याच्या लिंगाचा छेद झाला आहे त्याने याहवेहच्या सभेत प्रवेश करू नये.

  23. अनुवाद २३:२सुमारे इ.स.पू. १४५१

    निषिद्ध विवाहबंधनापासून जन्मलेला अथवा त्यांच्या वंशातल्या अगदी दहाव्या पिढीपर्यंत कोणीही याहवेहच्या सभेत प्रवेश करू नये.

  24. अनुवाद २३:३सुमारे इ.स.पू. १४५१

    तसेच दहाव्या पिढीनंतर कोणाही अम्मोनी अथवा मोआब्याने याहवेहच्या सभेत कधीही प्रवेश करू नये.

  25. अनुवाद २३:४सुमारे इ.स.पू. १४५१

    कारण जेव्हा तुम्ही इजिप्त देशातून बाहेर आला, तेव्हा हे मार्गात अन्न व पाणी घेऊन तुम्हाला भेटण्यास आले नाहीत, एवढेच नव्हे तर अराम-नहराईम येथील पथोर नगरात राहणारा बौराचा पुत्र बलामास द्रव्य देऊन तुम्हाला शाप देण्यासाठी आणले.