- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1446–1406 BC
The Wilderness Years
Forty years of wandering in the desert test Israel's faith and prepare a new generation to enter the promised land.
या कालखंडातील वचने
- अनुवाद २०:३सुमारे इ.स.पू. १४५१
त्याने म्हणावे: “हे इस्राएली लोकहो, ऐका: जेव्हा आज तुम्ही लढण्यासाठी तुमच्या शत्रूविरुद्ध पुढे जात आहात; मन कचरू देऊ नका वा भयभीत होऊ नका; त्यांना घाबरू वा भिऊ नका.
- अनुवाद २०:४सुमारे इ.स.पू. १४५१
कारण याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाबरोबर जात आहेत. ते तुमच्यासाठी तुमच्या शत्रूविरुद्ध लढतील आणि तुम्हाला विजय प्राप्त करून देतील.”
- अनुवाद २०:५सुमारे इ.स.पू. १४५१
नंतर सेनाधिकारी आपल्या सैनिकांना म्हणतील: “तुम्हामध्ये असा कोणी आहे का, की ज्याने नुकतेच नवीन घर बांधले असून, तो अद्याप त्या घरात राहिला नाही? तर त्याने घरी जावे, कारण या युद्धात तो कदाचित मारला गेला तर दुसरा कोणीतरी त्या घरात राहू लागेल.
- अनुवाद २०:६सुमारे इ.स.पू. १४५१
तुम्हापैकी असा कोणी आहे, ज्याने द्राक्षमळा लावला, पण त्याचे फळ अद्याप खाल्लेले नाही? तर त्याने घरी जावे. कदाचित युद्धात तो मारला जाईल आणि दुसरा कोणी त्याचा आनंद घेईन.
- अनुवाद २०:७सुमारे इ.स.पू. १४५१
तुमच्यापैकी कोणाचा वाङ्निश्चय झालेला असून त्याचा अद्याप विवाह झाला नाही असा आहे का? त्याने घरी जावे आणि विवाह करावा. कदाचित युद्धात तो मारला जाईल आणि दुसरा कोणी तिच्याशी विवाह करेल.”
- अनुवाद २०:८सुमारे इ.स.पू. १४५१
मग सेनाधिकारी पुढे म्हणेल, “तुम्हापैकी कोणी भेकड वा भित्रा आहे का? जर असेल, तर इतर सैनिकांना घाबरवून टाकण्यापूर्वी त्याने घरी निघून जावे.”
- अनुवाद २०:९सुमारे इ.स.पू. १४५१
जेव्हा सेनाधिकारी आपले बोलणे संपवतील, ते सैनिकांवर सेनापती नियुक्त करतील.
- अनुवाद २०:१०सुमारे इ.स.पू. १४५१
युद्ध करण्याकरिता तुम्ही एखाद्या शहरावर हल्ला करण्यास पोहोचला, तर प्रथम तेथील लोकांना शांतीचा प्रस्ताव द्या.
- अनुवाद २०:११सुमारे इ.स.पू. १४५१
जर त्यांनी तो मान्य केला आणि शहराच्या वेशी तुमच्यासाठी उघडल्या, तर त्या शहरातील सर्व रहिवासी तुमचे दास बनतील आणि तुमची सेवा करतील.
- अनुवाद २०:१२सुमारे इ.स.पू. १४५१
परंतु त्यांनी तह करण्याचे नाकारले व तुमच्याशी युद्ध करण्याची तयारी केली तर त्या शहराला तुम्ही वेढा घालावा.
- अनुवाद २०:१३सुमारे इ.स.पू. १४५१
जेव्हा याहवेह तुमचे परमेश्वर ते शहर तुमच्या ताब्यात देतील, तेव्हा त्यातील सर्व पुरुषांना तुम्ही तलवारीने ठार मारावे.
- अनुवाद २०:१४सुमारे इ.स.पू. १४५१
पण त्या शहरातील सर्व स्त्रिया, मुले, गुरे व सर्व संपत्ती तुम्ही स्वतःकरिता ठेवावी. ही संपत्ती जी याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्या शत्रूकडून तुम्हाला देतील तिचा तुम्ही स्वतःसाठी उपयोग करावा.
- अनुवाद २०:१५सुमारे इ.स.पू. १४५१
तुमच्यापासून दूर असलेल्या व निकटवर्ती नसलेल्या राष्ट्राच्या सर्व शहरांच्याबाबतीत तुम्ही असेच वागावे.
- अनुवाद २०:१६सुमारे इ.स.पू. १४५१
कारण याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला देत असलेल्या वचनदत्त देशात असणार्या शहरातील कोणालाही तुम्ही जिवंत ठेऊ नये.
- अनुवाद २०:१७सुमारे इ.स.पू. १४५१
हिथी, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी—यांचा समूळ नायनाट करावा—ही आज्ञा याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला दिली आहे.
- अनुवाद २०:१८सुमारे इ.स.पू. १४५१
नाहीतर ते त्यांच्या दैवतांची उपासना करताना ज्या किळसवाण्या चालीरीती करतात त्या तुम्हाला शिकवतील व तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराविरुद्ध पाप कराल.
- अनुवाद २०:१९सुमारे इ.स.पू. १४५१
तुम्ही एखाद्या शहराला बरेच दिवस वेढा द्याल आणि ते हस्तगत करण्यासाठी त्याच्याविरुद्ध युद्ध कराल, तेव्हा तेथील झाडांचा कुर्हाड चालवून त्यांचा नाश करू नये. झाडांवरील पाहिजे तेवढी फळे तुम्ही खावी; पण झाडे मात्र तोडू नयेत. झाडे मनुष्य आहेत का त्यांना तुम्ही वेढा घालावा?
- अनुवाद २०:२०सुमारे इ.स.पू. १४५१
परंतु जी झाडे फळे न देणारी आहेत हे तुम्ही जाणता, त्यांचा वापर तुमच्याशी युद्ध सुरू असलेले शहर पडेपर्यंत वेढा बांधण्यासाठी करू शकता.
- अनुवाद २१:१सुमारे इ.स.पू. १४५१
याहवेह तुमच्या परमेश्वराने वतन म्हणून दिलेल्या देशात तुम्ही आल्यावर एखाद्या शेतामध्ये वध झालेला मनुष्यदेह तुम्हाला आढळला व त्याला कोणी मारले हे समजले नाही,
- अनुवाद २१:२सुमारे इ.स.पू. १४५१
तर वडीलजनांनी आणि न्यायाधीशांनी तिथे जाऊन त्या मृतदेहापासून आजूबाजूच्या प्रत्येक नगरापर्यंत अंतर मोजावे.
- अनुवाद २१:३सुमारे इ.स.पू. १४५१
नंतर मृतदेहाच्या सर्वात जवळ असलेल्या नगरातील वडीलजनांनी, कधीही कामास न लावलेली आणि पूर्वी कधीही जू न ठेवलेली अशी एक कालवड घ्यावी
- अनुवाद २१:४सुमारे इ.स.पू. १४५१
आणि तिला वडिलांनी ज्या भूमीची कधी नांगरणी अथवा पेरणी केलेली नाही, अशा सतत पाणी वाहत असलेल्या खोर्यात नेऊन तिथे कालवडीची मान मोडावी.
- अनुवाद २१:५सुमारे इ.स.पू. १४५१
यानंतर लेवी वंशातील याजक जवळ येतील, कारण याहवेह तुमच्या परमेश्वराने त्यांना आपल्यासमोर सेवा करण्यासाठी याहवेहच्या नावाने आशीर्वाद देण्यासाठी व वाद आणि हल्ला यांचे निर्णय घेण्यासाठी निवडलेले आहे.
- अनुवाद २१:६सुमारे इ.स.पू. १४५१
मग मृत माणसाच्या देहाच्या सर्वात जवळ असलेल्या नगरातील सगळे वडीलजन आपले हात खोर्यात मान मोडून टाकलेल्या त्या कालवडीवर धुतील,
- अनुवाद २१:७सुमारे इ.स.पू. १४५१
आणि त्यांनी हे घोषित करावे, “आमच्या हातांनी हा रक्तपात केलेला नाही किंवा आमच्या डोळ्यांनी तो पाहिलेला नाही.